सफल झाली जीवन यात्रा...

Submitted by दत्तप्रसन्न on 17 October, 2019 - 20:39

सफल झाली जीवन यात्रा
आला क्षण समीप
दुर क्षितिजावरती हिमशिखरे देती साद.

माझ्या मुखी ठेवशील ना
तूच तुळशीचे पान
तीर्थाचे पाणीही तूच दे सखे.

नको आणू आसवे जातांना
तुझी आनंदाची साथ
शेवटला निरोपहि गोड हंसूनि दे.

राम राम घे माझा
माळूनी हातात हात
अखेरची उब तुझी अनुभवू दे.

सापडेन मी कवितेत माझ्या
जेव्हा घालशील साद
तुझ्याशी बोलींन मी त्या शब्दांसवे, बोलींन मी त्या शब्दांसवे.

Group content visibility: 
Use group defaults