सावरकरांनो मका माफ करा

Submitted by andy.rock on 17 October, 2019 - 08:16

सावरकरांना भारतरत्न देणं म्हणजे शहिदांचा अपमान : कन्हैयाकुमार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देणं म्हणजे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंगांसह क्रांतिकारकांचा अपमान ठरेल,” असं धक्कादायक मत विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कन्हैयाकुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. कन्हैयाकुमार गुरूवारी अहमदनगरमध्ये होता. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने हे विधान केलं.(news from loksatta)

आता या माकडाला काय बोलावे ते समजत नाही.
तुम्हाला काय वाटते ते सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तो काय बोलतो याचे त्याला काही देणे घेणे नसते...फक्त लोकांनी त्याला विसरू नये म्हणून असे विचित्र विधान करून कॉनट्रावर्सी मध्ये राहून स्वतःची पब्लिसिटी करणे एवढाच हेतू अशा लोकांचा..त्याला तर सावरकर भगतसिंग राजगुरू अशा देशभक्तानी काय केले देशासाठी हे ही माहित नसेल... लोकांनी दुर्लक्ष करावे अशा मूर्खा कडे

त्याला माकड म्हणणे म्हणजे माकडाचा अपमान आहे. कुठलाही प्राणी या मुर्खापुढे श्रेष्ठ ठरेल. आधी स्वतःची डिग्री पूर्ण कर म्हणावे. कम्युनीस्ट पक्षात पूर्वी अभ्यासु लोक होते सोमनाथ चटर्जींसारखे आता काय मज्जाच आहे.

भारताचे हजार तुकडे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि अफजल गुरू सारख्या अतिरेक्याचे समर्थन करणाऱ्या या देशद्रोह्याकडे दुर्लक्ष करा. याला व याचे समर्थन करणाऱ्यांना जनतेने मतपेटीतून लाथ घातली आहे.

सावरकर भारतरत्न मिळाल्याने महान थोडीच ठरणार आहेत. ते महान होतेच. त्यांनी जगलेलं जीवन, त्यांचे विचार, देशभक्ती हे भारतरत्नावर अवलंबून नव्हतं. पुरस्कारांसाठी त्यांनी हे केलेलं नव्हतं.
सावरकर, शिवाजी महाराज, लोकमान्य, फुले, शाहू महाराज हे त्या काळातील व्यवस्थेनुसार काळाच्या पुढे चालले. त्या वेळी ते योग्य होते. आता फक्त त्यांच्या विचारांना आचरणात आणणे आवश्यक आहे. भांडणं करून उपयोग नाही.

सावरकरांचं व्यक्तिमत्व आणि कर्तुत्व इतकं टोलेजंग आहे कि त्यांचा द्वेष केवळ एखादा अडाणी किंवा त्यांच्याविषयी असुया बाळगणारा माणुसंच करु शकतो. भारतरत्न पुरस्कारापेक्षा सावरकर खुप मोठे आहेत; तो दिल्याने या पुरस्काराचाच सन्मान होईल (जो मागे विटाळलेला काहिं महाभागांना देऊन) आणि गेलेली प्रतिष्ठा पुर्नप्रस्थापित होण्यास मदत होईल...

कधीकधी वाटते कन्हैया कुमार आणि रागा सारखे लोक भाजपला जिंकून देण्यासाठीच प्रचार करत असावेत. महाराष्ट्रात येऊन निवडणुकीच्या वेळेस असे विधान करून जिंकून येऊ असे ज्याला वाटत असेल तो नक्कीच अक्कलशून्य असणार. याचा फायदा विरोधी पक्षालाच होणार

>>काय बोलतो याचे त्याला काही देणे घेणे नसते...फक्त लोकांनी त्याला विसरू नये म्हणून असे विचित्र विधान करून कॉनट्रावर्सी मध्ये राहून स्वतःची पब्लिसिटी करणे एवढाच हेतू अशा लोकांचा..

म्हटलंच आहे येनकेनप्रकारेण पुरुषो प्रसिध्दो भवेत. हा त्यातलाच प्रकार. सगळेच राजकारणी ह्याचा अवलंब करत आलेले आहेत. दुर्लक्ष केलं की असल्या गोष्टी आपोआप बंद होतील.

त्याची डिग्री पूर्ण झाली कधीच,

अशुद्ध लेखनासाठी सावरकर नक्कीच तुम्हाला माफ करणार नाही

ते कोकणी असावे बहुतेक >>>>>तरीही अशुद्धच लिहिले आहे. ते कोकणी /मालवणी चुकीचे लिहिले तरी चालते आजकाल, इथे आहेत काही जे उगीच मालवणीत लिहून पिडत असतात. (त्यांना आम्ही कधीच माफ केले आहे ...हे अलाहिदा)

सावरकरांचं व्यक्तिमत्व आणि कर्तुत्व इतकं टोलेजंग आहे कि त्यांचा द्वेष केवळ एखादा अडाणी किंवा त्यांच्याविषयी असुया बाळगणारा माणुसंच करु शकतो. भारतरत्न पुरस्कारापेक्षा सावरकर खुप मोठे आहेत; तो दिल्याने या पुरस्काराचाच सन्मान होईल (जो मागे विटाळलेला काहिं महाभागांना देऊन) आणि गेलेली प्रतिष्ठा पुर्नप्रस्थापित होण्यास मदत होईल...

Submitted by राज on 17 October, 2019 - 11:५७ >> बरोबर राज, पुरस्कार खर तर खूप आधी द्यायला हवा होता पण आजकाल उगीच राजकीय उपयोगासाठी कधी कोण कोणत्या हुतात्य्माचा उपयोग करून घेईल हे सांगता येत नाही.

Andy.Rock Sir,

प्लीज, जर एडिट करायची वेळ संपली नसेल तर धाग्याचे नाव एडिट करा.