कोण कुणाशी जुळला आहे? (मतला बंद गजल )

Submitted by निशिकांत on 14 October, 2019 - 00:49

कोण कुणाशी जुळला आहे? (मतला बंद गजल )

यत्न करूनी मला न कळले कोण कुणाशी जुळला आहे
स्वागत करण्या बाहू पसरुन जो तो फसवे हसला अहे

"जे दिसते ते तसेच असते" गैर्समज का रुजला आहे?
आले नाही मला बाळसे, जरा चेहरा सुजला आहे

जसा निघालो यात्रेला मी, अल्ला मिष्किल हसला आहे
शंभर चूहे खाउन बिल्ली आज निघाली हजला आहे

ओठामधुनी शब्द फुटेना उरात आशय दबला आहे
व्यक्त व्हावया जराजराशा लिहितो आता गझला आहे

दिवा कसा हा मला मिळाला? कधी न तो पाजळला आहे
अंधाराला भिऊन वेडा जळण्या आधी विझला आहे

तिच्या घराच्या खिडकीचा का हळूच पडदा हलला आहे?
डोकाउन ती बघता माझ्या मनी ताटवा फुलला आहे

पदर ढाळला का तो ढळला? प्रश्न आजही पडला आहे
प्रसंगात त्या घुटमळण्याचा, छंद जिवाला जडला आहे

हिंमत नसता बेमानीचा मार्ग कुणा का रुचला आहे?
मजबूरीने म्हणून भित्रा भला आदमी बनला आहे

"निशिकांता" चल प्रवास इथला अता कदाचित सरला आहे
नकोस अडकू, तुझा आपुला एक तरी का उरला आहे?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यत्न करूनी मला न कळले कोण कुणाशी जुळला आहे
स्वागत करण्या बाहू पसरुन जो तो फसवे हसला अहे

मस्तच निशिकांतजी!

मस्त!
काही शेर वाचून 'वाह' उमटले!
Happy

ओठामधुनी शब्द फुटेना
उरात आशय दबला आहे
व्यक्त व्हावया
लिहीतो आता
जराजराशा गजला आहे
>>> वाह!
मस्तच!

>>>>> जसा निघालो यात्रेला मी, अल्ला मिष्किल हसला आहे
शंभर चूहे खाउन बिल्ली आज निघाली हजला आहे>>>>>>>> आह्हाअ!!! मस्तच!! Happy
___________
>>>> पदर ढाळला का तो ढळला? प्रश्न आजही पडला आहे
प्रसंगात त्या घुटमळण्याचा, छंद जिवाला जडला आहे>>>>> मजा आली!!

अप्रतिम गझल आहे .

एकदम मस्त
दुसरी ओळ शेवटचा शब्द "आहे" असा करावा
गैर्समज शब्द गैरसमज असा करावा