'वसंत' प्रेमाचा

Submitted by Suryakant Majalkar on 8 October, 2019 - 07:50

'वसंत' प्रेमाचा ऋतू आणि आपल्या कथा नायकाचं नाव सुद्धा. वसंत तसा त्याच्या समवयस्क मित्रांसारखाच वाढला, बालपण, शाळा,कॉलेज, मित्रमैत्रिणी वयानुरूप आणि परिस्थितीनुरूप झालं.

प्रत्येकाचं आयुष्य जसं कॉपी टू कॉपी नसत.तसच वसंतचंही होत. त्याच्या वयाची मुलं जेंव्हा मैदानात खेळ खेळायची.गल्ल्या घेत फिरायची. चकाट्या करत बसायची. तेंव्हा हा कुठल्यातरी पुस्तकात डोकं खुपसून असायचा.शाळेत त्याच्या मराठी प्रेमाचं खूप कौतुक होत. त्याच्या कविता, नाटक यांनी शाळेबरोबरच कॉलेजही त्यानं गाजवलं.मराठी विभागाचं साहित्य मंडळाचं अध्यक्ष पद देऊन प्रोफेसर शेटकर यांनी त्यांचं कौतुक केलं होत. खूप सांगता येईल वसंतबद्दल.पण आपल्या कथेचा तो हेतू नाही. त्यांचा स्वभावाचा पिंड कळला, एवढं खूप झालं.

वसंतच गल्ली, शाळा, कॉलेज मधलं प्रेम हे वयाचे मानसिक चोचले पुरविण्यापलीकडे गेलं नाही. त्यांचं साहित्यवाचन, लेखन हौसीपुरतं चालू होत. कुठे छोट्या छोट्या कळ्या उमलत होत्या. त्यात वसंताचं जीवन प्रेममय होण्यापेक्षा दुःखमय होऊ लागलं होत. एकंदरीत प्रेमाच्या बाबतीत वसंताचा ग्रीष्मऋतु चालू होता.

शैक्षिणिक पातळीवर वसंत सर्वसाधारण होता. प्रेमातही बरा. आणि कौटुंबिक पातळीवर?

आपण त्या विषयावरच आता येणार आहोत. दोन बहिणींची लग्न झाल्यावर वसंताच्या लग्नाबद्दल चर्चा होऊ लागली. तिशीत पाऊल टाकलेला वसंत स्वतःहून काही प्रयत्न करेल असं चिन्हही दिसत नव्हतं. आईचा स्पष्ट स्वभाव हा नव्या सुंबाईला जाचत ठरू शकतो , असं वाटल्याने स्थळ येत नव्हती.

वसंत मानसिकरीत्या खचला होता. त्यात मामेभावाच्या लग्नात त्याने प्रीतीला पाहिलं. मग मामाकडे चौकशी वैगरे झाली. आणि एका गोरज मुहूर्तावर वसंतच लग्न झालं. कुंडली वसंताच्या प्रेमाने ठरवली होती.

प्रीतीची रीत वसंतच्या लक्ष्यात येत नव्हतं. नव्या नवरीचा कोणताही लक्षणं तिच्यात नव्हतं. चार दिवस लग्नाचे, सोपस्काराचे ठीक गेले. पण जेंव्हा वसंताला कळलं कि प्रीतीला लग्नाचं करायचं नव्हतं, तेव्हा त्याच्या पायाखालची सरकली.

प्रीती नांदायला तयार नव्हती. वसंत मात्र लग्न करून फसला. मामापर्यन्त हे प्रकरण गेलं. वसंताची आई तर प्रचंड चिडली होती. आबांना काय करावं हे सुचत नव्हतं. आपल्या मुलाचं लग्नाचं वय निघून चाललेलं आणि हि ग्रहदशा.

प्रीतीला सोडायला तो तय्यार नव्हता. वसंताचं प्रेम होत तिच्यावर. प्रेम होत कि नुसतं आकर्षणाचं?

नवीन लग्नाच्या रीतीभाती पूर्ण करणं भाग होत. वसंत प्रीतीला सोडायला तयार नव्हता. एके संध्याकाळी प्रीतीची मावशी प्रीतीला घेऊन जायला आली. चार दिवस माहेरी मुक्काम करून परत नव्या संसाराला लागायचं, अशी फार पूर्वी पासूनची पद्धत आहे.

पण प्रीती गेली ती आलीच नाही. तेव्हा काकांच्या सांगण्यावरून वसंत आणायला गेला. प्रीतीला यायचं नव्हतं. म्हणे सासूशी पटत नव्हतं. करणं मात्र सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट होत. पण वसंत एकतर्फी आंधळं प्रेम आडवं आलं. वसंताने प्रीतीला घरी आणलं. पण प्रीतीला नांदायचं कुठे होत.

लग्नापूर्वी प्रीती एका खाजगी कंपनीत कामाला होती. आपल्या मैत्रिणीबरोबर यायचं आणि जायचं, या शिवाय दिवसभर एकत्र कामाला. यामुंळे तिची मैत्रीण , फिलॉसॉफर, गाईड , सर्व मीनाचं झाली होती. हे मीना नावाचं ब्याद पुढे भारी पडलं...

(क्रमश:)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults