खडतर आयुष्य ! तीच-९

Submitted by रिना वाढई on 5 October, 2019 - 01:58

हॅलो अभय ! तुला एक गोष्ट सांगायची आहे . खूप विचित्र आहे पण तरी तू ऐकशील का ?
हो ग , तुला मी कधी नाही म्हटलं आहे का .
दुसऱ्या दिवशी डोळे चोळतच तिने अभय ला फोन केला .
रविवार दोघांनाही सुट्टी असल्यामुळे आज ते निवांत बोलू शकणार होते .

मला काल रात्री जे स्वप्न पडलं ते खरचं खूप धक्कादायक होत अभय .
काय स्वप्न होत ?मी होतो कि नाही तुझ्या स्वप्नात ! अभयने विचारलं .
तशी ती सांगायला सुरुवात केली . अभय तू घरी विचारतोस लग्न करायचं आहे म्हणून . पण माझ्याबद्दल सांगितल्यावर घरचे आपल्या लग्नाला विरोध करतात . मग तू मला माझ्या घरी विचारायला सांगतोस . पण माझं शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीच मी घरी काही विचारू शकत नाही . पण माझं घरी न विचारणं तुला खटकते आणि तू नको तेवढे संशय घेतोस माझ्यावर . आपलं बोलणं देखील बंद होते . एक दिवस तू माझ्या घरी तुझ्या लग्नाची पत्रिका पाठवतोस , आणि मला भेटायला सुद्धा येतोस . मी खूप चिडलेली असते तुझ्यावर म्हणून तू सॉरी म्हणतोस पण मी तुझं सॉरी ऍसेप्ट नाही करत . तू जातोस आणि तुझं लग्न जेमेतेम दोन - तीन महिन्यावर आलेलं असते .
बापरेर्रर्रर्रर्र . तू असे स्वप्न कशी बघतेस . अभय ला आश्चर्याचा धक्काच बसतो .
अ रे पडतात रे स्वप्न कधी कधी . सारखं तू मला सोडून जाशील कि काय अशी भीती मनात असते . म्हणून काही पण दिसत असेल स्वप्नात .
बाई ग ... हे स्वप्न फक्त स्वप्नापुरतेच राहो अशी इच्छा आणि मी तुला कधीच सोडून जाणार नाही .
जवळ जवळ एक वर्ष झाला त्यांच्या relationship ला. तीच शिक्षण झालच होत .

सुट्ट्यांमध्ये दोघेही घरी आले होते . अभय ने आपल्या घरी सांगितलं आणि तिनेसुद्धा आपल्या घरी अभयबद्दल सांगितलं . अभय ला नाही म्हणायचं काही कारण नव्हतंच तिच्या घरी पण प्रश्न समोर होता तो म्हणजे अभय ची कास्ट . आजच्या पिढीनुसार चालणारी , त्यांना समजून घेणारी तिच्या घरच्यांची वृत्ती असल्यामुळे त्यांनी अभय ची कास्ट देखील स्वीकार केली .
इकडे अभय कडे तर काहीच प्रॉब्लेम नव्हता . आपल्या च पाह्ण्यातली मुलगी वरून फॅमिली बॅकग्राऊंड चांगला असल्यामुळे अभय च्या घरच्यांनी लवकरात लवकर लग्न संपन्न करायचे ठरविले .
अभय आणि ती आपल्या येणाऱ्या भविष्याचे स्वप्न डोळ्यात साठवून जगत होते . अभय तर खूप आतुर झाला होता लग्नासाठी . कारण तिच्या मनातली भीती त्याला कायमची मिटवायची होती . कि आपण कधी तिला एकटीला सोडून जाणार नाही .
समोर चांगलं मुहूर्त बघून त्यांच्या लग्नाची तारीख पक्की करणार होते .
अभय च्या सुट्ट्या संपल्यामुळे तो परत जाण्यासाठी निघाला , जाताना तिला भेटून लवकरच आपण अजून येणार आहोत तेव्हा साखरपुडा करायचं ठरवलं आहे घरच्यांनी . तयार राहा मॅडम .
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यात भरून तिने त्याला सार केलं .
एक महिना लोटला, अभय साखरपुड्यासाठी येणार होता . घरच्या घरीच हे कार्यक्रम होणार होत . लग्न मात्र धुमधडाक्यात करायचं ठरलं होत .
अभय ऑफिस मधून लवकर खोलीवर आला . आज त्याला गावाकडे जायचं होत म्हणून त्याने लवकर सुट्टी काढली होती . पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने बाहेर रिमझिम पाऊस पडत होता . अभय खोलीवर आला तसा पावसाने जोर चढविला .
अभयची कपडे छतावर वाळत होते , पण पाऊस जोराचा आल्याने ते भिजून ओलेचिंब कधीचे झाले होते . तो छतावर गेला आपले कपडे काढण्यासाठी , तोच आकाशात ढगांचा गडगडाट झाला .
अभय आपले कपडे घेऊन आत जाणारच तेवढ्यात सर्र्र्रर्र्र करत वीज कोसळली त्याच्या अंगावर .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभय काहीना काही करुन कथेत मरणार हे आधीच कळालं होत..पण म्हणुन काय डायरेक्ट वीज पडुन मेला?? Lol Lol
या भागाचा शेवट हास्यास्पद झालाय..

मन्या +११
किती ती घाई बिचार्‍याला मारायची..