ऐक गृहचंडीके तुझी कहाणी.
.
एक आटपाट नगर होतं. या नगरात नातीवर अतिप्रेम करणारी सासू आणि विद्रोही टीनेजर मुलगी यांच्या तडाख्यात सापडलेली एक गरीब गाय रहात होती. टीनएजर मुलीच्या ऊठसूठच्या eye-rolling आणि उलट दुरुत्तरांनी ती अतिशय त्रासली होती. ती अशीच एकदा हापीसातून, माबोवरती पडीक असताना, आपल्या प्रिय मैत्रिणीच्या विपूत डोकावली. तिथे कोणीही विचारलेले नसतानाही नेहमीप्रमाणे तिने तिच्या त्रासाचे गाणे गायले.
.
विपूची मालकिण दुसर्या दिवशी लॉग इन झाली. तिला गरीब गायीची व्यथा लक्षात आली आणि आपल्या मैत्रिणीचे दु:खनिवारण करण्या करीता व स्वतःची विपू परत परत फ्लड होऊ नये या उदात्त हेतूने प्रेरित होऊन तिने गायीला गृहचंडीकेचे व्रत सांगीतले.
.
बाई बाई येत्या शुक्रवारच्या पे-डे पासून तू हे गृहचंडीकेचे व्रत मनोभावे कर. शुक्रवार असल्याने सारा दिवस यथेच्छ कॉफी प्यावी, माबोवरती मेगाबायटी प्रतिसाद टंकावे, जमल्यास धागे प्रसवावे मात्र संध्याकाळी घरी गेल्यावरती "हुश्श! किती दमले गं बाई" म्हणून खुशाल तंगड्या ताणून बसून रहावे. पसारा मी-मी म्हणेल, त्याला म्हणू द्यावे. सासू कानीकपाळी ओरडेल, स्वयंपाक करावा म्हणून टुमणे मागे लावेल, तू साफ दुर्लक्ष करावे. मुलगी पोहून आल्या आल्या भूक-भूक म्हणून त्राही माम करुन सोडेल पण तू ढिम्म हलू नये. तिला स्वतः करुन घे नाहीतर सिरीअल खा सांगून खुशाल यु-ट्युबवर गाणी लावून बसावे.
.
रात्री मुलगी नेहमीप्रमाणे दुसर्या दिवशीच्या अर्थात शनिवारच्या मैत्रिणींबरोबरच्या नाईट-आऊट विषयी भुंगा लावेल, तिला तू बधू नये. ती चेहरा कमालीचा रडवेला करुन इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल पण तू तुझे लोण्यासारखे वितळणारे, हृदय काबूत ठेवावे. थोड्याच वेळात सासूदेखील, मुलीची बाजू घेऊन तुझ्यावरती प्रेशर टाकण्याचे नेहमीचे तंत्र अवलंबेल पण तू कानाला लावलेले हेडफोन दूर करु नये.
.
रात्र झाल्यावर सासू तुला पंगतीस बोलावण्यास विसरेल, मुलगी तर तू गुन्हेगार असल्यासारखी तुझ्याशी वागेल पण तू गिल्टी वाटून न घेता, निर्लज्जपणे सासूने रांधलेल्या पदार्थांचा मिटक्या मारत समाचार घ्यावा. रात्री ८ नंतर मुलगी नेहमीप्रमाणे, अभ्यास सोडून एका मॉनिटरवर स्काइपवर मैत्रिणीशी गप्पा तर त्याच वेळी दुसर्या मॉनिटरवर माईन क्राफ्ट खेळत बसेल, तू नेहमीप्रमाणे करवदून तुझा रक्तदाब वाढविण्याऐवजी, कॉप्युटर सरळ टर्न ऑफ करुन टाकावा. मुलीने जास्त अकांडतांडव केले तर पॉकेटमनी बंद करुन त्या जागी ऊठता लाथ-बसता बुक्की खुराक चालू करेन अशी तिला धमकी द्यावी. तिच्या दुप्पट eye-rolling करुन दाखवावे. मुलीला तिची खोली , कपाट आवरावयास सांगावे, ऐकले नाही तर ... एकंदर मर्म तुझ्या लक्षात आले असेलच. ऐक असे १६ शुक्रवार झाले की उद्यापन म्हणून स्वतःला पॅम्पर करावे, मनमुराद शॉपिंग करुन नवर्याचा खिसा हलका करावा. स्पामध्ये जाऊन पेडी-मॅनी वगैरे हवे ते चोचले पुरवावे. मुख्य म्हणजे घरात मग्रुर व बेफिकीर रहावे.
.
गरीब गाय मनाशी निश्चय करुन घरी आली. आल्या शुक्रवारपासून तिने गृहचंडीकेचे व्रत बिनचूक सुरु केले.प्रथम घरात हलकल्लोळ उडाला, घरचे हबकले, रागावले, गायीच्या उर्मटपणावर स्तंभित झाले पण करतात काय, सांगतात कुणाला...हळूहळू घराची घडी परत बसली. अहो आश्चर्य टीनेजर मुलगी अर्ध्या वचनात राहू लागली, सिन्सियरली अभ्यास करु लागली. मुख्य म्हणजे eye-rolling आणि उलट दुरुत्तरे बंद झाली. उलट आपल्या कणखर मातेचा तिला अभिमानच वाटू लागला.
.
मग मात्र गायीने सासू व मुलगी दोघींना क्षमा केले, व हृदयाशी धरले. गृहचंडीकेने जसे तिला समर्थ करुन आनंदी केले तसे तुम्हा आम्हा करो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
कहाणी गृहचंडीकेची
Submitted by धनश्री- on 4 October, 2019 - 16:08
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
तिच्या दुप्पट eye-rolling करुन दाखवावे>>>>>>
मला हे वाचल्यावर सौ सुनारकी
मला हे वाचल्यावर सौ सुनारकी एक लुहारकी हा धडा आठवला. त्या धड्यातील मुलगा सहल गेली असताना साप चावल्याचे खोटं सांगून नाटक करतो व त्याला त्रास देणाऱ्या मुलांना अद्दल घडवतो.
पण आजकाल पालकांना मुलांना शिस्त लावण्यासाठी फार विचार करून वागावं लागतं, नाहीतर मुलं बंड करतात.
धन्स!!
त्या आग्गो बाई वाल्या
त्या आग्गो बाई वाल्या आसावरीला सांगा
भारी आहे....सासूबाईंनीपण
भारी आहे....सासूबाईंनीपण चंडीकेचं रूप घेतल तर मग घरात दांडीया गरबा व्हायला वेळ लागणार नाही....
>>>>> सासूबाईंनीपण चंडीकेचं
>>>>> सासूबाईंनीपण चंडीकेचं रूप घेतल तर मग घरात दांडीया गरबा व्हायला वेळ लागणार नाही>>>>>>> हाहाहा आता नाहीत पण माझ्या साबा फार गरीब होत्या

____
सर्वांना प्रतिसादांबद्दल, धन्स
गरीब सासू हा फार दुर्मिळ
गरीब सासू हा फार दुर्मिळ प्रकार आहे.

@श्रद्धा हाहाहा अगदी खरे आहे
@श्रद्धा हाहाहा अगदी खरे आहे
माझी आई माबोवर नाही हे
माझी आई माबोवर नाही हे माझ्यादृष्टीने बरंच आहे..
नाहीतर लेख वाचल्यानंतर आठवड्यातुन 1 दिवसापेक्षा कामाचे दिवस वाढले असते हे नक्की..