लग्नाची वाईफ, वेडिंगची बायकु - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 3 October, 2019 - 08:54

तर या चर्वितचर्वण करायला न पिसं काढायला!
२१ ऑक्टोबर पासून चालू होतेय. रानादा टाटा करणार बहुतेक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा मान बा संपली तरी नवीन येणारी मालिका तिच्या तोडीस तोडच असेल. लेखक , दिग्दर्शक इत्याची चमु तोच असेल. किंवा तसाच असेल. मग
मान बा संपली काय किंवा नाही संपली काय , काय फरक पडतो? या वरच्या मालिकेच्या नावावरून तर ही मालिका मानबाच्या वरताण असेल असं वाटतंय.
झीने आपल्या प्रेक्षकांचं पाणी बरोबर जोखलेलं आहे.

राणाची सिरीयल अतिशय फालतु होतेय दिवसेंदिवस. पांचटपणा चालुये काहीच्याकाही.
पण एक सिरीयल संपवुन दुसरी आणली तरी काय उजेड पडणार आहे? नगास नग सिरीयली असतात झीच्या.

लग्नाची वाईफ, वेडिंगची बायकु>>> हे फॉरेनची पाटलीण टाईप काही असावं असा माझा अंदाज.

तेच तर. उगाच नव्या सीरियलच , त्यातल्या पात्रांचा अभ्यास करू न मग त्यांचा कीस पाडा आणि पिसं काढा यापेक्षा आहे ते काय वाइट आहे? Wink

झीच्या मार्केट रिसर्च वाल्यांना हा धागा दिसला असणारच. आपण अगदी योग्य मार्गा ने चाललो आहोत याची पावती त्यांच्यासाठी
लोक मालिका आवडते म्हणून बघतात की पिसं काढायला, याने त्यां च्या टीआरपीला काय फरक पडतो?

झीच्या मार्केट रिसर्च वाल्यांना हा धागा दिसला असणारच. आपण अगदी योग्य मार्गा ने चाललो आहोत याची पावती त्यांच्यासाठी >>> Lol

लोक मालिका आवडते म्हणून बघतात की पिसं काढायला, याने त्यां च्या टीआरपीला काय फरक पडतो? >>> खरं आहे.

टीआरपी वरच कोणत्याही सीरियल चे यश मोजले जाते .
गहन विषय असलेल्या मालिका लोक बघत नाहीत म्हणून असल्या उथळ मालिका चालव ने भाग पडत .
ऑक्सर विजेते चित्रपट थिएटर मध्ये चालत नाहीत मग कोण विनाकारण संकट ओढवून घेईल

ही मालिका मराठवाड्याची वाटते.. निदान भाषेवरुन तरी तसे वाटत आहे. तसेही झीकडकडेराठवाडी शिरेल नव्हती.. त्याची कसर ही लग्नाची वाईफ अन वेडींगची बायकु भरुन काढेल असे वाटते.

मला तर आजकाल झी मराठीच्या कुठल्याच मालिका दर्जेदार वाटत नाहीयेत. कधी तरी चांगल्या विषयांवर सिरियल येईल, किंवा काही नव्या कल्पना आणि कथा घेऊन येतील अशी आशा आहे. Happy

नुकताच ह्याचा प्रोमो बघितला. हि सिरियल सुद्दा दोन बायकान्ची असणार वाटत. Sad हिरोच्या बाजूला बसलेल्या बाईला तो गिफ्ट देताना ' लग्नाची बायको' म्हणतो. तिच्या गळयात मन्गळसूत्र असत. नन्तर घरात एका फॉरिनर मुलीची एन्ट्री होताच तिचा एक वयस्कर बाई ( हिरोची आई असावी) ' वेडिन्गची बायको' असा उल्लेख करते.