जिभेचे चोचले

Submitted by Yogita Maayboli on 3 October, 2019 - 08:48

जिभेचे चोचले तर सर्वच पुरवतात. पण काही लोकांना विचित्र गोष्टी खाण्याची सवय असते . हा धागा त्यांच्यासाठी

विचित्र गोष्टी यासाठी कि त्यातील सर्वच गोष्टी खाण्याजोगी नसतात. पण त्यांना खाण्याचे जणूकाही डोहाळे लागले असतात.

अशा काही गोष्टी खालीलप्रमाणे
१) पाटीवरची पेन्सिल
२) खडू
३) तांदूळ
४) धान्यातले मातीचे खडे
५) गुलाबी मिसरी
६) धना डाळ
७) काळी माती
८) मुलतानी माती

हे लिहीत असताना नकळतच तोंडाला पाणी आले

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ताची बी, जी पसरट असते आणि मधे चारोळी सारखं बी असतं ते खायचो आम्ही, आणि घाणेरीच्या फुलांच्या नंतर काळी फळं येतात ती खायचो

पापड बनवण्या पुर्वी त्याची छोटी लाटी बनवतात, त्या कित्तेक लाट्या आम्ही फस्त करायचो लहानपणी..>>>>वाचतानाच पाणी सुटलं

माझ्या एका आत्याने कच्चे गहू चावत राहून त्याचं चिंगम बनवायला शिकवलेलं

साबुदाण्याच्या फेण्या(?) बनवताना त्या मेणकापडावर उन्हात वाळवायला लागतात. एका बाजूने सुकल्या की उलट करून दुसरी बाजू सुकत ठेवायची. तर ही उलटापालट करताना मी त्या कच्च्या, एका बाजूने लिबलिबित फेण्या मटकवायचो

पापडाच्या लाट्या तर एकदम फेवरेट

गवताचे तुरे ओढून काढायचे (मुळापासून नाही), त्याचा खालचा कोवळा भाग चावून खातो

चिंचेचा कोवळा पाला, गवती चहाची पात, तुळशीची पानं येता जाता चावायला आवडतात

एकदा उडदाच्या पापडाच्या लाट्या खायचे व्यसन पापडाच्या दिवसात लागले. मग नंतरच्या महिन्यात तलफ आली की जीव कासावीस व्हायला लागला. मग घरातल्या वाळवणातल्या कच्च्या पापडांवर डल्ला मारायला सुरुवात केली. पातेल्यात १०~१५ पापड भिजवायचे अन फडशा पाडायचा. वर्षाचा स्टाॅक महिन्यात संपल्याने चोरी उघडी पडली. खाल्लेले पापडाच्या पिठ जेवढे कुटले नसेल त्याच्या दहापट आईने कुटले मला.

टूथपेस्ट.

वाटणासाठी तेलावर खरपूस भाजलेला कांदा.

लहानपणी - मेंदीच्या फुलांच्या स्ट्रॉरूपी देठातून त्यातला मध किंवा जे काय असेल ते. (आमच्या सोसायटीला ज्या झुडुपांची कुंपणं बनवली होती,ती मेंदीची आहेत असं सांगितलं गेलं होतं)

पाथफाईंडर Happy

३-४ वर्षापुर्वी बडिशोप येताजाता खायची इतकी सवय लागली की नुसती आठवण आली एक विचित्र आत्ताच्या आत्ताच्या हवी खायला अशी भावना शरीरभर धावायची. इतकं अस्वस्थ व्हायचं की काय सांगु. तेव्हा जाणवले की ड्रग्स घेणार्‍या माणसाला काय होत असेल? मग मनावर खुपखुप ताबा ठेऊन बडिशेप विकत आणणे बंदच केले. मग सुटली सवय.
तसेच खडुची पण लागली होती मोठेपणी. ती पण कशीबशी सोडवली... Sad

उन्हाळ्यात पिकलेल्या चिंचा फोडून, त्याला वर्षभरासाठी आई साठवत असे. आम्ही मुले त्यातील चिंचोके घेऊन भाजून खात असू. इथे विकत मिळतात आता ते.

शीतल, अती बडिशेप पण चांगली नसते असं कुठेशी वाचलं होतं, त्याचे परिणाम वगैरे म्हणुन बंद केली. आता क्वचित इच्छा झाल्यास खाते.

गुलामोहराची लाल पांढरी नाक्षीवाली पाकळी
चिंचेची फुलं
छोटी रंगीत रानफुलं असतात त्याची काळी फळं(एक विशिष्ट जातच, ही विषारी नसते
उपमा/पिठलं खरवड
तूप बेरी ब्राऊन खमंग

चिकूच्या बीसोबत कधी कधी थोडा पांढरा सुकलेला चिक असतो. तो अगदी दिवसभर चघळायला पुरे. जेवण्यापूर्वी तो टाकून देताना जिवावर येई.

कच्ची पपई <<< हो चांगली लागते. तशीच कच्ची टोमॅटो, कच्ची देशी वांगी.. एखादी फोड तोंडात टाकल्यावर थांबवत नाही. कच्ची टोमॅटो आणि वांगी खाण्याची सवय लहानपणी योगायोगाने लागली. रानात फोडणीचा भात आणि कालवण करायचा बेत आयांनी (आई: अनेकवचन) घातला होता. आम्हाला पुढे जाऊन ओल्या / हिरव्या भाज्या जमवायला सांगितले. पण काही अनपेक्षित आलेली कामे आटोपून त्यांना तिथे पोचायला बराच उशीर झाला. तोपर्यंत आम्ही मुले भुकेने कासाविस झालो. शेवटी न राहून कुणीतरी कच्चा टोमॅटो चावून बघितला आणि बघता बघता फस्त केला. मग त्या टोपीवाल्याच्या गोष्टीतल्या माकडांप्रमाणे सगळे टोमॅटोंवर तुटून पडले. नाविन्य म्हणून मग कोणीतरी कच्चे वांगेही चावून बघितले. आणि अहो आश्चर्यम्... ते तर टोमॅटोपेक्षाही हटके निघाले!

वर पद्म यांनी दुकानातले विकायला ठेवलेले बियाणे खायचो लिहिलेले वाचून आठवले, माझ्या मुलीच्या एका मैत्रिणीच्या बाबांचे किराणा दुकान होते, ती सुट्टीवर असताना घरी गेली की दुकानात जाऊन बसायची आणि एकेक बरणी खाली करायची Happy Happy

Pages