खडतर आयुष्य ! तीच-६

Submitted by रिना वाढई on 28 September, 2019 - 06:13

अभय त्या रात्री झोपूच शकला नाही , आपण कदाचित तिच्या आयुष्यामध्ये उशिरा आलो असे त्याला मनातच वाटत होते .
कारण ती आता फक्त एक मैत्रीण नाही राहिली होती त्याच्यासाठी . तो तिला पसंत करू लागला होता .
ज्या दिवशी पहिल्यांदा तिला बघितला त्याच दिवशी तिने त्याच्या मनात घर केलं होत .
आपल्या भावना सांगायच्या आधीच तुडवल्या गेल्या असे अभय ला वाटत होते .
इकडे तीला मात्र आज खूप फ्री वाटत होत .मनावरचं एक मोठं दडपण उतरल्यासारखं वाटत होत तिला .
अभय ला हि गोष्ट किती दिवसापासून सांगायची होती पण उगाचच विरलेल्या आठवणी उकरून काढायच्या नव्हत्या तिला .
दुसऱ्या दिवशी अभय च्या बोलण्यात एक जडपणा जाणवला तिला .
काय रे काही झालं का तुला , रोजच्यासारखा बोलत नाही आहेस आज तू . तिने विचारलं
काही नाही ग , ए पण एक सांग , त्याला तू अजूनही पसंत करतेस काय ?
ती- अजूनही म्हणजे काय ? मी त्याला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नाही शकत अभय .
अभय - आणि मग लग्नही त्याच्यासोबतच करशील का ?
ती- काय रे अजून तेच , तुला म्हटले ना मी, कि तो नाही पसंत करत मला , नाही आवडत रे मी त्याला . ती आता थोडी भावुक झाली होती .
अभय मला एक सांग , मी का नसेल आवडत त्याला ? म्हणजे दिसायला नाही मी खूप सुंदर ,पण एवढी वाईट दिसते का मी ,कि कोणी मला ... आणि ती थांबली .

नाही ग , तो तुला ओळखूच शकला नसेल . आणि फक्त गोरा रंग पाहून कोणी प्रेम करते का ?
पण त्याने किमान हे बरं च केलं कि तुला नाही म्हटलं , नाहीतर आपली मैत्री कशी झाली असती आणि... अभय चा बोलण्याचा सूर बदलला होता .
आपल्या मैत्रीसाठी त्याला कुरबान केलास रे तू ,ती आता थोडी मस्करी करत बोलत होती .
अभय अजून काही विचार करून परत तिच्याशी बोलत होता .
मी हि एका मुलीच्या प्रेमात पडलो आहे , पण हे तिला कस सांगू कळत नाही आहे ग .
तूच सांग ती मुलगी माझ्यावर प्रेम करू शकेल काय ?
अभय दिसायला देखणा होताच पण मन हि खूप साफ होते त्याचे .
ती-तुला का बरं असे वाटते अभय
तू एवढा छान आहेस कि कोणतीहि मुलगी तुला सहज हो म्हणेल .
पण काय रे कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलास , आणि मला सांगितलं देखील नाही तू .
ती त्याची खिल्ली उडवत होती.

अभय अजूनही विचारच करत होता , कि आपण तिला प्रेमात पडल्याचं सांगितलं पण तिला जराही या गोष्टीचा दुःख झाला नसेल , किती casual वागत होती ती .
म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नाहीत . ती अजूनही त्याला विसरली नाही पण मी तिला प्रपोस केलं तर हो म्हणेल का ती? अभय स्वतःलाच प्रश्न विचारत होता आणि या प्रश्नाच उत्तर स्वतःच देऊन त्याने तिला दुसऱ्या दिवशी प्रपोस करायचं ठरवलं .
आज जरा लवकर अभयने तिला फोन केला .
बोल रे एवढ्या सकाळी सकाळी फोन केलास , मी अजून उठायचीच आहे . मी करू का थोड्या वेळात फोन तुला , ती पूर्ण आळस देऊन बोलत होती .
नाही फोन नको ठेवूस , मला बोलायचं आहे तुझ्याशी .
काल मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो असं म्हटलं ती ...
त्याच वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तिने त्याला थांबवलं .
अभय मी तुला मूर्ख वाटते का रे .
मला कळलं नसेल ती मुलगी कोण आहे ते .

मागील काही दिवसांपासून मी तुला notice करत आहे ,जेव्हा मी तुला त्याच्याबद्दल सांगितलं तेव्हा तू एक वाक्य बोलला होतास ... "बरं झालं त्याने तुला नाही म्हटलं " तेव्हाच मला समजलं तुझ्या मनात काय चाललं ते .
अभय हे बघ मला तुला दुखवायचं नाही आहे पण मी आता या सगळ्या गोष्टीचा विचार नाही करू शकत . तू चांगला आहेस , तुला खरंच छान मुलगी मिळेल .
"पण तू नाही ना ती मुलगी " , अभय शांतपणे बोलला .
त्याने तुला जस नाही म्हटलं तू हि मला तशीच नाही म्हणत आहेस .
तू तरी कुठे समजून घेत आहेस मला . आता मी हि तुझ्या आठवणींमध्ये स्वतःला विसरून जाणार . असच ना .

तिला काही सुचतच नव्हते काय बोलावं अभय शी आता . तो बोललेला एक एक शब्द जरी खरा वाटला तरी तिला ते चुकीचं वाटत होत .
काल रात्री जेव्हा अभय ने तिला प्रेमात पडल्याचं सांगितलं तेव्हा तिला ख़ुशी झाली होती पण रात्री जेव्हा तिने या सगळ्या गोष्टीचा विचार केला तेव्हा कळून चुकलं होत कि ती मुलगी आपणच आहोत .
आणि अभय केव्हाही आपल्याला हे बोलून दाखवेल . काय उत्तर द्यायचं त्याला .
दोन तीन दिवस दोघेही थोडे अवघडल्यासारखेच बोलत होते . ती अभय बद्दल विचार करत होती , आपल्यासोबत जसे झाले तसे अभयसोबत नाही व्हायला पाहिजे . अभयला नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं पण ती त्याला विसरू शकत नव्हती .
पण किती दिवस आपण त्याच्यासाठी झुरायच . त्याने आपला उत्तर दिला आहे आणि काहीही झालं तरी त्याच उत्तर बदलणार तर नाहीच आहे ना .
तिच्या मनाची उथलपुथल चालली होती . ती एकही निर्णय ठामपणे घेऊ शकत नव्हती .
तिने अभय ला आपण मित्र च राहू असे सांगून टाकले . अभय ला तिचा निर्णय मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हताच .

तिला गमवायचे नव्हते त्याला आणि एक दृढ विश्वास होता कि ती कधीतरी आपल्याला हो म्हणेल .
त्यांच्या मैत्रीला बरेच दिवस झाले आणि या दिवसांमध्ये अभय तिच्यासाठी सर्वस्व झाला होता .
अभय ला ती प्रत्येक गोष्टीत गृहीत धरत होती . अभय साठी तर हे चांगलंच होत .
एक दिवस तिने अभय ला म्हटलंच ,"i like you अभय ". अभय तर या दिवसाची आतुरतेने वाटच पाहत होता , तो दिवस त्याच्या साठी सुवर्णदिवस ठरण्यासारखं होत .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank you