मुका मार आणि फूट ड्रॉप बद्दल माहिती हवी आहे

Submitted by वेब on 25 September, 2019 - 14:38

15 जुलै ला माझी मैत्रीण( वय 51, US मध्ये)अडखळून फार जोरदार पडली. तिच्या सोबत 24 वारशाचीतिची मुलगी होती. तिथे असलेल्या एका व्यक्तीने उचलले आणि गाडीत ठेवताना म्हटले की इथे जे लाकडे आहेत ते त्यामुळे लोक पडतील असे मी कितीदा सांगतो
Emergency ला नेले,10 X rays काढले . Fracture sprainअसे काहीही नाही असे म्हणाले.
फॅमिली dr म्हणाले 1 महिना वाट बघ नाहीतर orhtho dr कडे जा
ती लंगडत चालते पण 2 mile चालू शकते पाऊल बरेच ठिकाणी सारखे दुखत असतो आणि बोट आणि पाऊल वर च्या dir ने उचलत नाही
परवा ती pedologi st। गेली असता त्यांनी सांगितले तू पडली नाही तुला स्ट्रोक आला होता त्यामुळे तुझे ड्रॉप फूट आहे. तिला diabetis आहे .
पण त्या दिवशी तिच्या मते तिला स्ट्रोक आलं नव्हता कारण 30 मिन आत ती emergancy होती आणि तिथल्या dr गेल्या गेल्या काशी पडली याच संपूर्ण चौकशी केली
आता MRI
करायला सांगितलं आहे
पण कुणाल ड्रॉप फूट बद्दल आणि मुका मार बद्दल अजून माहीत असल्यास कृपया द्यावी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तसा मुकामार किंवा contusion सामान्य निरोगी व्यक्तीस झाल्यास तीनेक महिन्यात सुधारते. पण डाईबेटीज रुग्णास वेळ जास्त लागतो. हीसुद्धा एक आंतरिक जखमच असते. साखरेचे प्रमाण कमी ठेवायला हवे.

पायाचा कंट्रोल कुठून होतो ? मेंदूत त्या एरियाचा खासदार असतो , म्हणजे अपर मोटर न्यूरॉन

त्यांमन्तर मग पाठीच्या कण्या तुन मज्जारज्जू जातो , मग मणक्यातून लहान लहान नसा बाहेर येतात व त्या मांडी ते पाय सप्लाय करतात,

फूट ड्रॉप झाला म्हणजे या सगळ्यात कुठेतरी प्रॉब्लेम आहे, फूट ड्रॉप एका बाजूला आहे की दोन्ही ?

मेंदू व मणक्यापर्यंत कुठेतरी दोष असेल तर सी टी अथवा एम आर आय करतात , पायाच्या नसेत दोष असेल तर नर्व्ह कंडक्शन स्टडी वगैरे करतात , निदान लवकर करून लवकर उपचार करावेत,
https://en.m.wikipedia.org/wiki/Foot_drop

लक्षण एक सारखी असली तरी त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात .
त्या मुळे dr सर्व शक्यतांचा विचार करून अंतिम निर्णय घेतात .
डॉक्टर च निष्कर्ष काढतील नक्की कशामुळे त्रास होत आहे त्याचा

या केसची गुंतागुंत माहीत नाही. फुट ड्रॉप हेही माहित नाही. गावाकडे मुका मार लागला व काळे निळे त्वचा दिसू लागली तर रगतरोडा आणि आंबेहळद उगाळून लेप लावतात. नसा मोकळ्या होऊन बरे वाटते. कुठल्याही वनौषधी मिळणाऱ्या दुकानात या गोष्टी मिळतात.

आंबेहळद आणि रक्तचंदन amazon मागवून तीन ते चार वेळा लेप देते आहे फूट ड्रॉप कायअसत ते आता google केल्यानंतर समजले. मला सुद्धा हा शब्द नवीन आहे आणि मराठी याला काय म्हणतात हे पण माहिती नाही

पण कुणाल ड्रॉप फूट बद्दल आणि मुका मार बद्दल अजून माहीत असल्यास कृपया द्यावी.
काही माहीती नाही पण काळजी घ्या.

बऱ्याचदा मुका मार लागला तर जांघेत गाठी येतात, त्याला ओळंबा आला असं म्हणतात. अशा गाठी आल्या तर लाकडी लाटणं विस्तवावर तापवून कपड्यांवरून शेक द्यायचेत पुर्वी गावाकडे. पाय लचकला असावा.

Sprain म्हणजे मुरंगळणे पण 10 x rays काढले त्यात कुठेही sprain fracture नाही पण 2 महिन्यानंतरही ती लंगडत चा चालते आणि ज्या पद्धतीने चालते त्याला इथे ड्रॉप फूट म्हणतात ,पण ती सांगते की अडखळून इतकी जबरदस्त पडली परत गुडघ्यातून चालू शकू की नाही असे वाटत होते
You ट्यूब वर अनेक विडिओ बघितले ड्रॉप फूट दीर्घकाळ असतो असे लक्षत आले

पायाची सवेदना जाणे .
आणि पायाचे कार्य वर आपले नियंत्रण नसणे म्हणजे मज्जा तंतू मेंदू कडून आदेश घेवून पायाच्या स्नायूंना देण्यास सक्षम नाहीत असे समजावे लागेल .
पडल्या मुळे स्नायू किंवा हाडाला दुखापत झाली असेल तर आपण पायाचा वापर तर करू शकू पण तीव्र वेदना होतील .
असे वर्गीकरण करता येईल.