अशी पाखरे येती.....३ (हुर्डा पार्टी)

Submitted by हरिहर. on 24 September, 2019 - 15:00

पक्षी निरिक्षणाचे वेड एकदा लागले की मग काही खरे नसते हे या काही दिवसात अगदी पटले. नेमकी हा छंद जडायला आणि कामांची धांदल उडायला एकच वेळ झाली. स्वतःचा व्यवसाय असल्याने जेंव्हा वाटेल तेंव्हा या छंदासाठी वेळ काढता येत असला तरी दिवस कामाचे असल्याने ते शक्य नव्हते, आणि रोज एकतरी पक्षी दिसल्याशिवाय चैनही पडत नव्हती. अशातच एक शोध लागला की सकाळी चालायला जाताना जर देवराईतील शेताजवळ निवांत बसलो तर सकाळच्या कोवळ्या उन्हात अगदी शेजारी शेजारी बसुन वेगवेगळे पक्षी निवांत नाष्टा करताना दिसतात. अर्थात मग दुसऱ्या दिवसापासुन चालण्याला सुट्टी दिली आणि देवराई जवळ केली. फक्त शेतातल्या कणसांवर बसलेले पक्षीच दिसत असल्याने एक तोटा मात्र व्हायला लागला. येथे मला शाकाहाराला प्राधान्य देणारे पक्षीच दिसले. म्हणजे मुनिया, साळूंकी, बुलबुल वगैरे.

याला अपवाद म्हणजे एक दिवस मला कणसावर बसलेला खाटीक (Shrike) दिसला. मला खुप आश्चर्य वाटले. हा लहान पण निष्णात शिकारी असलेला पक्षी बाजरीच्या कणसावर काय करतो आहे? मी सगळे लक्ष त्याच्यावरच ठेवले. काही वेळातच माझ्या लक्षात आले की हा खाटीक काही दाणे खायला आला नाहीए. शेताच्या कडेला असलेल्या सगळ्यात उंच कणसाचा उपयोग हा वॉच टॉवर सारखा करत आहे. त्याने बराच वेळ कणसावर बसून खालील हिरवळीवर लक्ष ठेवले व अचानक सुर मारुन एक सरडा पकडला व बाजूच्या बाभळीवर जाऊन बसला. अर्थात त्याची शिकार किडे, सुरवंट, सरडे असल्याने इतर पक्ष्यांना त्याचा काही त्रास होत नव्हता पण जेंव्हा जेंव्हा शिक्रा बाजूच्या लिंबाच्या झाडावर येवून बसायचा तेंव्हा मात्र सगळे शेत काही सेकंदात रिकामे व्हायचे. सगळा किलबिलाट थांबायचा. काही मुनियांना मी शेतातच मुरताना पाहिले. शिक्रा गेल्यावर मात्र ज्या वेगात शेत रिकामे होई त्याच वेगात पुन्हा सगळे हजर होत.

या शेतामधे मी बरीच मजेदार निरिक्षणे नोंदवली आहेत. त्यावर पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिन. हा धागा फोटोंसाठी असल्याने येथे फक्त फोटो देत आहे. (पक्ष्यांची ओळख आणि नावे यासाठी शशांकदा (पुरंदरे) आणि त्यांनी ओळख करुन दिलेल्या पक्षीतज्ञ मित्राची खुप मदत होते. ते सांगत नाही तसे स्पष्ट पण मी त्यांना या बाबत खुप त्रास देतो. Happy )

या धाग्यातील बहुतेक फोटो हे शेतातील असल्याने याला हुर्डा पार्टी म्हणायला हरकत नाही. Happy

प्रचि: १ नेहमीची चिमणी (House Sparrow. Female)

प्रचि: २ चिमणी (नर)

प्रचि: ३

प्रचि:४ सुगरण (Baya Weaver. Female)

प्रचि:५

प्रचि:६ सुगरण (नर)

प्रचि: ७

प्रचि:८

प्रचि:९ शिपाई बुलबुल (Red Whiskered Bulbul)

प्रचि: १०

प्रचि:११

प्रचि: १२ लालबुड्या बुलबुल (Red Vented Bulbul)

प्रचि: १३ साळूंकी (Common Myna)

प्रचि: १४

प्रचि:१५ राखी वटवट्या (Ashy Prinia)

प्रचि: १६

प्रचि: १७

प्रचि: १८ ठिपकेवाली मनोली (Scaly Breasted Munia)

प्रचि: १९

प्रचि: २०

प्रचि: २१

प्रचि: २२

प्रचि: २३

प्रचि: २४ काळ्या डोक्याची मनोली (Tricoloured Munia)
(या तिरंगी मुनियाचे फोटो आमच्या गावाकडील शेतात काढले आहेत.)

प्रचि: २५

प्रचि: २६ माळ मुनिया (Indian Silverbill)

प्रचि: २७ नकल्या खाटीक (Long Tailed Shrike)

प्रचि: २८ हा खाटीक पकडलेली शिकार काट्याला टोचून ठेवतो व भुक लागेल तेंव्हा लचके तोडून खातो. खाटकासारखे शिकार टांगुन ठेवतो म्हणून याला हे नाव पडले आहे.

प्रचि: २९ हा बोनस स्नॅप. फोटो काढताना एक मनोली अगदी पुढ्यात येवून पंख साफ करत बसली. तिचे खुप फोटो काढले पण तिने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे हवा तसा क्लोजप काढता आले.

आज सकाळी या पिवळ्या परिटाचे दर्शन झाले. या अगोदर हा कधी देवराईमधे दिसला नव्हता. हा पक्षीही किडे खातो. त्यासाठी तो बगळ्यासारखा गुरांच्या मागे मागे फिरत असतो. पण मला तो बाजरीच्या कणसावर बसलेला दिसला. (माहिती आणि नाव वावेंनी सांगितले)
पिवळा परिट (Yellow Wagtail)

.

प्रचि: ३० या मोत्याच्या दाण्यांसाठी सर्व पक्ष्यांची धडपड सुरु असते दिवसभर.

शिक्रा (Shikra) हा शिकारी पक्षी आहे. हा झाडावर येवून बसला की सगळीकडे शांतता पसरते. याला मी अजुन शिकार करताना पाहिले नाही. शिक्रा हा काही हुरडा पार्टीतला पक्षी नसला तरी त्याचा या हुर्डा पार्टीवर चांगलाच वचक असतो. त्यामुळे त्याचे काही फोटो देतो आहे.
प्रचि: ३० शिक्रा (Shikra)

प्रचि: ३१ "पहातोंय हां मी कोण कोण दंगा करतोय तें" असं काही म्हणत असेल हा बहुतेक. Happy
या शिक्राची पाठ फिरली की पुन्हा दंगा सुरु.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाली सर्व फोटो नेत्रसुखद आहेत. तो १० व्या फोटोतला बुलबुल हिरो आहे एकदम!! पॉप्युलर असणार तो त्याच्या बुलबुल मैत्रिणींत Wink

किती मंत्रमुग्ध करणारं....

बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा

सगळेच फोटो मस्त. देवराई भारीच दिसतेय.

त्या कणसांवर आता 'व्हर्नल हॅंगिंग पॅरट (पिचू पोपट)' पण दिसतायत का? पुण्याच्या आसपासचे फोटो दिसतायत आता सगळ्यांचे.

सगळ्यांचे आभार!
@आऊटडोअर्स होय, पिचू पोपटाचे सासवड परिसरात काढलेले फोटो सध्या मित्राकडून येत आहेत. देवराईत पोपटांचा (Rose-ringed Parakeet) खुप मोठा थवा आहे पण त्यांना अजुन कणसांवर बसलेले पाहिले नाही. फोटो भरपुर काढले आहेत पण मला येथे फक्त शेतातले फोटो घ्यायचे होते त्यामुळे ते पॅराकिटचे फोटो घेतले नाहीत.

शालीदा
फोटो एकदम झकास
यायलाच पाहिजे हुर्डा पार्टीला

एकदम भारी फोटो आलेत.... मस्तच सगळे!!

रच्याकने, शिर्षक वाचून वाटलं कि आप्पांनी हुरडा पार्टी केली न कळवता Wink

मस्त आहेत फोटो Happy
रच्याकने, शिर्षक वाचून वाटलं कि आप्पांनी हुरडा पार्टी केली न कळवता +११११११

परवा आमच्या खिडकीत sunbird आला होता त्याचा फोटो काढेपर्यंत पळापळ झाली..तुम्ही फारच सुंदर फोटो काढता अन तेही क्लोजअप Happy

कडक फोटो! ह्या शिक्रांचे एक जोडपे नागपुरला घरासमोर येउन राहिले होते, त्यांनी धमाल केलेली, पण नेमका मी उशिरा गेल्यामुळे म्हणजे मे संप्ल्यावर, तेव्हा फक्त ज्युनिअर मंडळींनी फोटो काढु दिलेत!

मस्त फोटो आहेत सगळे.

आता मॉडेल मात्र बदला... ह्या पक्ष्यांना चांगले निरखून झाले.

तुम्हाला घराशेजारीच निवांत ही सगळी गम्मत बघत बसायला मिळते, भाग्यवान आहात.

सगळ्यांचे खुप धन्यवाद!

आबा हुर्डापार्टी केली तर तुला सांगितल्याशिवाय राहीन का मी?
किल्ली हुर्डापार्टी केली तर तुला सांगेन का कधी मी? Lol

चनस सनबर्डचे फोटो काढने तसे अवघडही आहे अन सोपेही. त्यांच्या खान्याच्या वेळात ते अजिबात स्थिर नसतात. सकाळी १०/११ च्या दरम्यान एखादया झाडाच्या फांदीवर खुप शांत बसतात तेंव्हा फोटो मिळतात त्याचे छान.

रॉनी ज्युनियर मंडळींचे फोटो टाका की येथे.

साधनाताई मॉडेल म्हणजे पक्षी बदलू म्हणतेय का तू? ते कसे करणार? आता विंटर सिजनचे पक्षी येतील तेंव्हा आपोआप मॉडेल्स बदलतील. जे पक्षी दिसतायेत ते फोटो काढू देत आहेत हे काय थोडे झाले.
आज सकाळी यलो वॅगटेल दिसला होता. त्याचे फोटो अॅड करतो हवे तर. म्हणजे एक वेगळे मॉडेल पहायला मिळेल. Happy

येस, अजून वेगवेगळे पक्षी येउदेत. छान वाटते बघायला.

तुम्हाला बघून पक्षी स्वतःच येऊन पोझ देऊन बसत असतील. Happy Happy

हायला, इतके दिवस चिमण्या पहातेय. नर आणि मादी तला फरक आज कळला Happy मस्त पक्षी आहेत सारे. आणि फोटो पण. शेतात कायकाय निरिक्षणं नोंदवलीत त्यावर कधी लेख लिहिताय ह्या प्रतिक्षेत आहे.

Pages