सावळी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 September, 2019 - 14:53

सावळ्या रातीचं दुधाळ चांदणं
दिलंय आभाळानं तुलाच आंदण
बहरे तुळस सारल्या अंगणी
तसंच वाटे तुझं गं बोलणं

नजर तुझी शांत आसमंत सारा
सांजंच्या पारंला जणू फुलतो मोगरा
काळ्याशार केसांत जीवच अडतो
खट्याळ तुझं हसू जणू मोर तो नाचरा..

चेहरा गं तुझा पाडी चांदव्याला खळं
पाहून तुझ्याकडं सये जीव त्याचा जळं
नाजूक जिवणी तुझी उमलती कळी
लोभस गं रूप तुझं लावी नजरेला टाळं

रात रात न ये झोप सये फक्त तुझी याद
कसा लागलाय जणू माझ्या जिवा तुझा नाद
रुपानं या तुझ्या मांडलाय असा छळ
फक्त तूच की समोर काय दिस काय रात

- राव पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Sundar!!!

छान