खडतर आयुष्य ! तीच-५

Submitted by रिना वाढई on 23 September, 2019 - 08:37

हिवाळ्यातली ती गुलाबी थंडी आणि अशात कुणाला बरे अंथरुणातून ६ वाजता उठावेसे वाटणार !
तिला तर अजिबात नाही !
६ काय ती तर ८ वाजता सुद्धा पहाटे ५ वाजता उठल्यासारखी आळस देत उठायची .
ती उठली आणि नेहमीप्रमाणे व्हरांड्यात बसली होती . "अ ग लवकर आवर आणि एक रांगोळी तरी टाक दारात ". आयला उठल्या उठल्या आईची बडबड झालीच वाटते सुरु . तिने मनातच पुटपुटल. आणि रांगोळी टाकायला दारात आली , तोच अभय एका लहान मुलाला घेऊन येताना दिसला . बाई , आता हा सकाळी सकाळी नाही आला पाहिजे म्हणजे झाल. अजून तिने मनातच बोललं आणि रांगोळी टाकू लागली . अभय एक हुशार मुलगा असल्याने तिचे बाबा त्याला जास्तच भाव देत होते , पण हे तिला आवडत नव्हतं .
तिच्या मनाविरुद्ध बाबानी त्याला चहा साठी बोलावलं . ती हि आत गेली . तुला कशाची मदत वैगेरे लागली कि सांग मला ... अभय तिला म्हणत होता . ती हम्म म्हणून मानेनेच होकार दिली . अभय ने स्वतःच त्याचा फोन नंबर तिला दिला तिने नाईलाजाने तो मोबाइल मध्ये सेव केला पण आपला नंबर त्याला द्यावे अशी इच्छा झाली नाही . अभय ने पुन्हा तिला तुझाही नंबर दे मला म्हणत तिचा नंबर घेतला . दोन-तीन दिवस सारखा तो तिच्या घरी कशा न कश्याच्या बहाण्याने येत होता .
तिच्याशी बोलू पाहत होता , त्याला काहीही करून तिच्याशी बोलायचं होत . तिचा असा शांत स्वभाव कुठेतरी त्याला टोचत होता . पण ती मात्र हाय , बाय च्या वर जास्त बोलत नव्हतीच त्याच्याशी . दिवाळीच्या सुट्या संपल्या आणि ती परत होस्टेल वर गेली . तो हि गेला होता .
घरून जाताना नेहमी तिला भरून येत होत , होस्टेल वर कितीही मैत्रिणी असल्या तरी घरच्यांची कसर भरून निघत नव्हतीच . आणि तिथे पोहचल्यावर तर आपण एखाद्या जैलात आलोय अशी कल्पना येत होती . दुसऱ्या दिवशी सकाळी उठली , आज कॉलेज चा पहिला दिवस होता एवढ्या सुट्यानंतर . मोबाइल वर message ची रिंग वाजली , नक्कीच एखाद्या कंपनीचा message आला असेल म्हणून वैतागूनच मोबाइल बघितला तर अभय ने तिला Hi म्हणून message केला होता .
तिने त्याला replay देत Hello म्हटलं .आणि आता कॉलेज ला निघायचं म्हणून Bye सुद्धा केलं .
दुसऱ्या दिवशी सकाळी अजून अभय चा एक message आला होता . "I want to friendship with you ,your ans please."
त्याचा हा असा message बघून तिला थोड आश्चर्य च वाटलं . तिने त्याला replay न केलेलंच बरं म्हणून तो message delete केला .
अभय ला ती कधी गृहीत धरलीच नव्हती , त्याच्या messages ला replay केलं काय किंवा नाही काय . फरक पडत नव्हता तिला . काही दिवसांनी ती अजून गावाकडे जात होती , अभय आणि तीच गाव एकच असल्यामुळे जाण्याचा रस्ता एकच होता . योगायोग अभय हि गावी जात होता , आणि त्याला ती दिसली .
तिचीही नजर पडलीच त्याच्यावर .कुठे घरी जात आहे का ? त्याने विचारलं तिला .
हो , म्हणत तिने उत्तर दिल . मागे केलेल्या message चा उत्तर नाही दिली तू . तुला राग आला होता का ? अभय तिला विचारत होता . अ हम्म नाही म्हणत कशीतरी बोलली ती .
चोरी करून पकडल्या गेल्यासारखे वाटले तिला . मग उत्तर का नव्हतं दिलंस , अभय ने अजून तिला विचारलं , माझ्या मोबाइल मध्ये बॅलन्स नव्हता तेव्हा असे सांगून ती मोकळी झाली .
अभय ला कळलं होत कि तिने जाणूनबुजून त्याला रिप्लाय केला नव्हता. आता तीच मन तिलाच खायला उठल होत . एक चुकीची भावना वाटत होती तिला , त्याच्याशी खोटे नव्हतो बोलायला पाहिजे आपण . ती स्वतःच आपल्या मनाला सांगत होती . तेवढ्यात अभय ने अजून विचारलं "would you like to friendship with me?"
मित्र बनायला काय हरकत आहे म्हणून तिने त्याला "हो " म्हटलं . होस्टेल वर परतल्यावर सारखे तिला अभय चे messages येत होते . आणि ती हि त्याला आता रिप्लाय देत होती . या सगळ्यांमध्ये अभय खूप जवळचा मित्र बनला होता तिचा . कधी अभ्यासात मदत करत होता तर कधी कुठले नोट्स मिळवून देत होता . या दिवसात ती पार त्याला विसरूनच गेली होती .
अभय च जॉब असल्यामुळे शक्यतो तो सकाळी आणि रात्रीच तिला message करायचा , आणि तिचंही कॉलेज असल्यामुळे ती दिवसभर कॉलेज मध्ये रमून जात होती . मात्र सायंकाळी खोलीवर आल्यावर अभय ने message केला कि नाही म्हणून आवर्जून मोबाइल बघत होती . तिच्या अपेक्षेनुसार त्याचा एक ना एक तरी message इनबॉक्स मध्ये राहातच होता .
काही दिवस message झाले आणि नंतर फोन येऊ लागले होते अभय चे . रात्री बराच वेळ बोलायचे ते . कधी लहानपणीच्या आठवणी तर कधी poly करत असताना घडलेले किस्से अभय तिला सांगायचा . आणि ते ऐकता ऐकता कधी झोपून जायची ती तिला कळायचं नाही . मात्र अभय इकडे हॅलो हॅलो करून थकून जात होता , तरी पलीकडून आवाज येत नसल्याने त्याला कळून जात होत कि ती झोपली आता .
तिच्या अशा झोपण्याचा अभय ला त्रास हि होत होता , म्हणून त्याने तिच्या एक दोन मैत्रिणीचा नंबर मागितला . जेणेकरून त्यांना फोन करून विचारता आलं पाहिजे कि हि बाई झोपली का ? तिने सपना आणि जया यांना विचारून त्यांचा नंबर अभय ला दिला .
आता कधी ती बोलता बोलता झोपली कि अभय सपना ला फोन करून खात्री करून घेत होता आणि मग तो हि झोपायला जात होता . आता दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली होती , ती अभय शी बोलते हे तिच्या आजूबाजूंच्या मुलींना माहित पडलं होत म्हणून ती फोनवर बोलताना दिसली कि बाकीच्या मुली तिला लगेच चिडवायला लागायच्या . तिने कधी त्यांचं चिडवणं देखील मनावर घेतलं नव्हतं , कारण ती अभय शी फक्त मैत्री या च नात्याने बोलत होती . तिच्या मनातून "तो" अजून हि गेलेला नव्हताच .
एक दिवस अभय ने तिला, नको तेच विचारलं , "तू कुणाला पसंत वैगेरे करते का" ?
तुला का बरं हे जाणून घ्यायचं आहे म्हणून तिने फोन कट केला . ती अभय चा फोन उचलतच नव्हती . मात्र तिकडे अभय फोन करून करून तिला, त्रासला होता . आणि सपना ला फोन करून तिला द्यायला सांगितलं .
"तू का माझा फोन उचलत नाही आहेस "? तुला माहित आहे काय मला किती टेंशन आलाय ते , अभय जरा वैतागूनच तिच्याशी बोलत होता .
अभय च्या त्या प्रश्नाने ती जरा दुखावलीच होती , एवढे दिवस ती स्वतःला सावरत त्याला विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता , मात्र अभय ने विचारताच तिला त्याची आठवण आली . खरतर अभय ची यात काहीही चुकी नव्हती तरी ती त्याचाशी काय बोलायचं , त्याने विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं म्हणून त्याच्याशी न बोलणेच पसंत केले होते . पण किती दिवस ? आता त्याने सपनाच्या मोबाइल वर फोन केला होता तर तिला अभय शी बोलावच लागलं होत .
तिला माहित होत कि अभय तिला कसहि करून तिच्याशी contact करेलच . तिने ठरवलं कि झालेला सगळं प्रकार अभय ला सांगून टाकायचं . नाहीतरी त्याला काय फरक पडणार असं विचार करून तिने तो फोन घेतला .
हॅलो अभय , माफ कर मला . मी जरा जास्तच भावुक झाले होते तुझ्या त्या प्रश्नाने .
अ ग निदान फोन तरी उचलायचस ना . किती काळजी वाटत होती मला , तू फोन उचलत नव्हतीस तर . अभय आताही काळजीच्या सुरात बोलत होता . आणि एखादी गोष्ट नाही आवडली कि सांगत जा पण यापुढे अशी वागू नकोस , आणि तो तिला ठणकावून सांगत होता .
तिला हि समजत होती त्याची नाराजी , आणि म्हणून च ती आता त्याला सांगत होती त्याच्याबद्दल . अभय, "हो, मला आवडतो कोणीतरी , पण त्याला मी नाही आवडत ".
असं म्हणून ती तिच्या मागील जीवनतला " तो" , त्याच्याबद्दल सगळं काही सांगून टाकली अभय ला . अभय तिचा एक एक शब्द कान लावून ऐकत होता . आणि त्याच्या नकळत अश्रू त्याच्या गालावर ओघळत होते .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users