काळजी - (शतशब्दकथा)

Submitted by Yogita Maayboli on 23 September, 2019 - 04:29

रोज नवीन दिवशी नवीन विचार येतात त्या मनात.... कालची दुःख कालची काळजी कालचे टेन्शन विसरण्याचा प्रयत्न करतो नवीन दिवस....मनाला वाटते बहुतेक यशस्वी झालो....पण नंतर कळून चुकते कि काही नाही विसरलो....... तेच दुःख तेच टेन्शन तेच विचार मनात पुन्हा घर करतात....मनाचा भुगा होतो....मेंदूच्या शिरा फाटतात.... आजूबाजूचे जग वेगळ्याच जगात असते.... आपण त्यांच्यात असतोही आणि नसतोही ..उगाचच स्मित हास्य देऊन त्यांच्यात असण्याचे पुरावे द्यायचे.....उगाचच वेगळे विषय काढून विषय वाढवायचे...... पण तो मूळ विषय मनात तसाच राहतो....ते दुःख नाही सोडत तुम्हाला ..... हवी असलेली गोष्ट नाही मिळत याचे दुःख नसते....पण नको असलेली गोष्टच कशी आपल्या पदरात पडते....हाच विचार सारखा भेडसावतो...मग त्यावर नवीन विचार मात करतो...तो असा कि हे दिवसही जातील आणि चांगले येतील....आणि मग ते चांगले विचार मनात स्वनासारखे घर करू लागतात....

पण पुन्हा तेच.... नकारार्थी विचार पुन्हा त्या गोड स्वप्नावर मात करतात...आणि पुन्हा नवीन दिवस उजाडतो ....तीच काळजी घेऊन......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users