Submitted by स्वप्ना_राज on 22 September, 2019 - 02:35
'हॅलो, मी ७६, कांचन अपार्टमेंटमधून बोलतेय. ह्या रूटवर पेपर टाकायला नवा माणूस ठेवलाय का?’
‘मॅडम...’
‘परवा पेपर टाकला नाही आमच्याकडे. काल पण टाकला नव्हता. दोन्ही दिवस तुमच्या स्टॉलवर येऊन नोकराने पेपर नेला. तुम्हाला delivery charges कशाला देतो दर महिन्याला?’
‘ऐकून तर घ्या’
‘काय ऐकायचं? आज तर उलटीच तऱ्हा. तीन पेपर्स टाकलेत.’
‘मॅडम, आज पहाटे कामावर येताना प्रदीपच्या बाईकला एका ट्रकने उडवलं. जागीच गेला तो. आम्ही दुसर्या माणसाला पाठवतोय आत्ता delivery साठी?’
‘काय? अहो हे कसं शक्य आहे?’
तिने टेबलवर तसाच टाकलेला पेपरचा गठ्ठा उलगडला. पहिल्यावर आजची तारीख होती - बुधवार १८ सप्टेंबर.
दुसर्यावर गुरुवार, १९ सप्टेंबर.
आणि तिसर्यावर शुक्रवार, २० सप्टेंबर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही!!!! जमलीये.
जमलीये.
जमलीये.
भारीच जमलीये अन लगेच
भारीच जमलीये अन लगेच समजलीसुद्धा
मस्तय
मस्तय
Khihi कळले नाही प्लीज कोणी
Khihi कळले नाही प्लीज कोणी सांगेल का
प्रदीपला 2 दिवसांपूर्वी अपघात
प्रदीपला 2 दिवसांपूर्वी अपघात झाला व आज पहाटे तो गेलयावर त्याने 3 दिवसांची ड्युटी एकत्रित केली अश्या अर्थाची गोष्ट असती तर जास्त परिणामकारक झाली असती हेमावैम. पहिल्या वाचनात मला असेच वाटले. म्हणून परत वाचले तेव्हा लक्षात आले की आधीचे 2 दिवस त्याची दांडी होती ती इतर कारणांमुळे.
पुढच्या तारखांचे वर्तमानपत्र
पुढच्या तारखांचे वर्तमानपत्र आधीच मिळाले आणि ते कोणी टाकले हे गूढ आहे का. मग आधी दोन दिवस का नाही मिळाले वर्तमानपत्र.
साधना +१
साधना +१
प्रदिपच्या भुताने भविष्यातल्या दोन दिवसांचे पेपर्स टाकण्यातली मेख नाही समजली.
प्रदिपच्या भुताने
प्रदिपच्या भुताने भविष्यातल्या दोन दिवसांचे पेपर्स टाकण्यातली मेख नाही समजली>>>मागचे 2 दिवस टाकला नाही न पेपर मग आता काही नाही तर पुढच्या 2 दिवसातले तरी टाकू,तेवढाच गिल्ट कमी होईल असे वाटले असेल भुताला
आदु
आदु
मलाही सेम प्रश्न पडलाय..
गेल्या 2 दिवसाचे पेपर टाकले असते तर ठिक होत..पण पब्लिश न झालेले पेपर कसे टाकले?!
पुढच्या दोन दिवसाचे भविष्य
पुढच्या दोन दिवसाचे भविष्य सांगुन गेला का शहराचे / देशाचे किंवा तीचे ?? असे काही आहे का??
मला वाटतेय, भूत प्रामाणिक
मला वाटतेय, भूत प्रामाणिक वाटतेय. मेल्यावर सुद्धा नावं ठेवू नयेत म्हणून पुढच्या दोन दिवसाचे आधीच दिले.
—
तरी मेली मायबोलीकरांना कौतुक नाही( इति भूत स्वगत).
ह. घ्या.
साधना, माधव, मन्या ऽ तुम्ही
साधना, माधव, मन्या ऽ तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कथा सुपरनॅचरल करायच्या नादात भविश्यातले पेपर्स टाकले असं केलं ते चुकलंच. असो. कथा फसली म्हणायची. सगळ्यांचे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार! पुढल्या वेळी नीट विचार करून लिहेन
>>>>मलाही सेम प्रश्न पडलाय..
>>>>मलाही सेम प्रश्न पडलाय..
गेल्या 2 दिवसाचे पेपर टाकले असते तर ठिक होत..पण पब्लिश न झालेले पेपर कसे टाकले?!>>>+१११
बरोबर आधीच्या दोन दिवसांचे पेपर टाकले आजच्या पेपर बरोबर असे म्हटले असते तर कथा परफेक्ट आहे .. एखाद्यावेळी फसते कथा पण लिहीत रहा स्वप्ना
गणेशोत्सवात इतके अगम्य शशक
गणेशोत्सवात इतके अगम्य शशक आल्या होत्या, सो मला वाटले ह्यात ही काहीतरी विश्लेषण आहे, जसे त्याला भविष्य कळले वगैरे अन तसे नसेल तर स्वप्ना किंवा हाब उकल करतीलच