खडतर आयुष्य ! तीच-३

Submitted by रिना वाढई on 21 September, 2019 - 01:41

सूना-सूना लम्हा-लम्हा
मेरी राहें तन्हा-तन्हा....

बेपनाह प्यार है, आजा
तेरा इंतज़ार है, आजा
ओ, बेपनाह प्यार है, आजा
तेरा इंतज़ार है, आजा
त्यावेळी आता सारखा स्मार्ट फोन नव्हता , कानात हेडफोन टाकून गाणी ऐकायला .
तिच्या घरी जुना डेक होता आणि त्यावर रेडिओ fm वरचे गाणे लागायचे . चार वाजले कि ती न चुकता डेक वर गाणे ऐकायची आणि वाट पाहायची कोणी आपल्या आवडत्या गाण्याची फर्माईश करते काय. दिवसातून एकदा तरी ती सुना सुना लम्हा - लम्हा हे गाणं ऐकायची .
तिला वाटायचं "हे गाणं लिहिणाऱ्यांनी कदाचित आपल्यासाठीच लिहिलं असावं ".
या गाण्यात एवढी तीव्रता होती कि तिला कळायचं देखील नाही ,ते गाणं ऐकता ऐकता कधी तिच्या डोळ्यातले अश्रू गालावर यायचे ते .
तो त्याचा उत्तर देऊन गेला होता, तरी तिला त्यावर विश्वास नव्हता .
एक दिवस नक्कीच त्याला आपलं प्रेम कळेल याच आशेवर ती होती .
जवळ - जवळ एक वर्ष झाला , त्यामध्ये तो गावाकडे येत नव्हता असे नाही , पण आधीसारखा तिला भेटत नव्हता . ती हि आता त्याचा नकार पचवू लागली होती . एखाद्यावेळेस चुकून भेट जरी झाली कि, दोघेही एकमेकांकडे फक्त अनोळख्या नजरेनेच बघायचे . तिला आतून वाटायचं कि बोलावं याच्याशी पण तो मात्र अशी काही इच्छा दर्शवत नसल्याने , ती सुद्धा पुढाकार घेत नव्हती .
बारावीचा वर्ष संपला आणि निकाल आला . तो निकाल नक्कीच चांगला नाही लागणार हे तिला माहित होत . जी मुलगी आधी पहिल्या क्रमांकाने पास होत होती , ती बारावीला किमान पहिल्या श्रेणीत सुद्धा पास नाही होऊ शकली . घरचे जरा नाराज झाले होते तिचा निकाल पाहून . पण झालं त्याला कोणी बदलवू नाही शकत म्हणून ते तिला काही बोलले नाही .
बारावीचे पेपर्स यायच्या आधीच तिने आपल्या पूजेचा उद्यापन केला होता . त्याचा उत्तर "नाही" हे ऐकून सुद्धा तिने आपली पूजा करणे सोडले नव्हते . वेळेनुसार बदलेल तो , आपण एवढ्या निस्वार्थ भावनेने ह्या पूजेचा उद्यापन केला आहे तर देव हि आपल्यासोबत काही वाईट नाही घडू देणार . हा एक अतूट विश्वास होता तिला . पण काहीच दिवसात तो विश्वास मावळला. त्याच्याकडून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती .
आता मात्र ती खूप दुखावली होती आणि म्हणूनच तिचा ना अभ्यासात मन लागत होता ना अजून दुसऱ्या गोष्टीत . तिच्या मैत्रिणी तिला या सगळ्यांमधून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करत होत्या, मात्र सगळे व्यर्थ... ती त्याला विसरूच शकत नव्हती , आणि तो आपल्याला विसरला असेल हे देखील स्वीकारत नव्हती .
आपल्या खराब निकालाचा दगड त्याच्या डोक्यावर फोडायचं नव्हतं म्हणून तिने तो निकालाचा विषय तिथेच थांबवला . आणि यापुढे आपण फक्त आपल्या घरच्यांचा विचार करायचं . अजून ती त्यांची चांगली मुलगी बनवून दाखवायचं असा निश्चय केला . बारावीमध्ये असताना CET चा फॉर्म भरला नसल्याने थेट अभियांत्रिकी ला जाणे शक्य नव्हते. पण तिला एक चांगली engineer बनायची इच्छा असल्याने तिने पॉलीटेकनिक ला प्रवेश घेतला .
बारावी झाल्यानंतर तब्बल एक महिना तिला घरीच राहावं लागलं होत , कॉलेज चालू व्हायला वेळ होता . पण हे दिवस तिच्यासाठी लवकर जातच नव्हते .
सारखे तिच्या मनात विचार यायचे , का त्याने आपल्याला नाही म्हटलं , आपण त्याच्या लायकीचे नाही कि अजून कोणी दुसरी मिळाली असेल त्याला . कदाचित गोरी असेल ती , आपण सावळे ना म्हणून त्याला खटकलं असेल . आता तिला तिचा रंग सावळा असल्याची खंत वाटू लागली होती . देवाने का आपल्यालाच सावळा रंग दिला असेल ? त्याला कळत नाही का या रंगामुळे कुणाचा आयुष्य कस उध्वस्त होत ते . (ती दिसायला खूप सावळी नव्हती तरी तिचे विचार आता काळ्या पाण्यासारखे झाले होते . )
कोणत्याच गोष्टीत तिला रस राहिला नव्हता . सगळं कस शांत आणि बेरंग असं झालं होत तिला .
न कोई उमंग है, न कोई तरंग है
मेरी ज़िंदगी है क्या, इक कटी पतंग है
कटलेली पतंग च आहोत आपण असंहि तिला वाटायला लागलं .
तीचा हसता - खेळता जीवन आता निरस झाला होता . पाहता पाहता एक महिना लोटला . जशी जशी तिच्या होस्टेल वर जायची वेळ जवळ येत होती तशी तिची आई भावुक होत होती . दहावीपासून आपल्या मुलीने घर सोडलं (बारावीचा शिक्षण तिने बाहेर राहूनच केलं होत . ) आता कुठे ती चार दिवस राहायला आली तर लगेच म्हणे कॉलेज चालू झाला आणि आता होस्टेल वर जावं लागेल लवकर .
तिचंही अंतःकरण भरून येत होता , कधी त्याच्या आठवणीने तर कधी आपल्या घरच्यांपासून दूर राहणाच्या विचाराने .
पण शिकायचं म्हटलं कि अशे छोटे छोटे कडू घोट प्यावेच लागतात हे तिला कळत होत .
उजाडला होता तो दिवस , तिला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्यासाठी . तिने फक्त ऐकलं होत कि होस्टेल वर एकदा तरी माणसाने राहून बघावे , जीवनाची मजा काही वेगळीच असते तिथे . आता ती हि ते प्रत्क्षत अनुभवणार होती ...
To be continue.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank you.

छान लिहिलाय हा भाग..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!! Happy

तिचा हसता खेळता जीवन आता निरागस झाला होता.>> याऐवजी निरस झाले होते.
असं हवंय का?

तिचा हसता खेळता जीवन आता निरागस झाला होता.>> याऐवजी निरस झाले होते.
असं हवंय का? हो.
दुरुस्ती केली आहे . धन्यवाद !

Very well

पुढच्या भागाची प्रतिक्षा