शेगावीचा राणा

Submitted by @गजानन बाठे on 20 September, 2019 - 11:44

||शेगावीचा राणा||

खूप जाहले व्याप जगाचे,
उसंत आता व्हावी थोडी,
कुठवर नेईल मज प्रपंचे,
तुज नामाची लागो गोडी.

तू विठ्ठल तू समर्थ माझा,
तिर्थनगरी मज शेगावी,
मी बंकट तू माझा राजा,
मुर्ती तुझी मज डोळा न्हावी.

पुष्पसूमने मी तुज अर्पितो,
निरंकार तू माझ्या देवा,
विनासये तू मजसी देतो,
भक्ती तुझी मज अमूल्य ठेवा.

उभ्या संकटा तारुणी नेसी,
स्मरण तुझे मज ऊर्जा देते,
पामर मी, तू ह्रृदय निवासी,
तू गण गण गणात बोते...

गजानन बाठे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानेय कविता..

प्रत्येक कडव्यानंतर स्पेस दिली तर सुटसुटीत दिसेल.. Happy