mistake = learning!

Submitted by पद्म on 20 September, 2019 - 10:06

नमस्कार मित्रांनो!
आपल्या जिवनात अनेकदा असे घडते, की दुसर्याच्या चुकांमुळे आपल्याला त्रास होतो, मनस्ताप होतो. पण घटना घडून गेल्यानंतर त्रागा करत बसून काहीच फायदा होणार नसतो. मग काय जे झालं ते विसरून जायचं? तर नाही... त्यातुन नक्कीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते म्हणतात ना, make the best of a bad bargain.

आता दुसर्यांच्या ज्या वागण्याने मला त्रास होतोय, जर त्याच प्रकारे मी दुसर्यांशी वागलो तर त्यांनाही त्रास होणारच. मग ज्या वेळी आपल्याला एखाद्याच्या वागण्यामुळे त्रास होत असेल, त्या वेळी रडत बसण्यापेक्षा नेमका कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतोय त्याचं मुळ शोधलं पाहिजे आणि ती गोष्ट भविष्यात आपल्याकडुन घडणार नाही ही खबरदारी घ्यायला हवी, ज्यामुळे मी कोणाच्या मनस्तापाचं कारण बनणार नाही.

आता काही दिवसांपुर्वीची गोष्ट सांगतो,
मी माझ्या काही मित्रांसोबत इंद्रायणी एक्स्प्रेसने मुंबईहून पुण्याला चाललो होतो. पहाटेची वेळ होती. त्यात एक मित्र वेळेवर आला नव्हता.
त्याला मी खूप फोन ट्राय केला, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी 'झोपला असेल' असा विचार करून तो येणार नाही असं गृहीत धरलं.
त्याच वेळी आमचे एक सर मला स्टेशनवर दिसले. तेही पुण्यालाच चालले होते. पण त्यांना रिझर्वेशन मिळालं नव्हतं. मी त्यांना सांगितलं, "आमच्याकडे एक तिकीट ज्यादा आहे, तुम्ही त्यावर येवू शकतात." त्यांनाही थोडं बरं वाटलं.
ट्रेन आली आम्ही सर्व व्यवस्थित बसलो, आणि गाडी निघाली. काही वेळात गाडी ठाण्याला पोहोचली आणि तिथे तो न आलेला मित्र डब्यात चढला आणि आनंदात म्हणाला, "सरप्राईज, सरप्राईज!! मी आलो!"
आता त्याच्या येण्याने आमचे सर awkward feel करत होते. आम्ही कसंतरी अ‍ॅडजस्ट केलं, पण त्याचं हे वागणं मला मुळीच आवडलं नव्हतं, पण त्या वेळी माझ्या मनात विचार आला की याच्या अश्या वागण्याने, मला त्रास होतोय, तर यापुढे मी असं वागायला नको; कारण त्यामुळे दुसर्या कुणालातरी त्रास होणार नाही.
त्याचा फोन चालू होता, फक्त आम्हाला धक्का देण्यासाठी तो फोन उचलत नव्हता आणि दादर त्याला जवळ असूनही आधी ठाण्याला गेला आणि आम्हाला असा धक्का दिला...

अजून एक किस्सा,
मी एकदा कॉलेजमध्ये शिकवताना, मुलांना काहीतरी प्रश्न विचारला गणिताशी निगडित, तर कुणालाच उत्तर आलं नाही. मी सहजच बोलून गेलो, "आजपर्यंत तुमच्याशी मॅथ शिकवण्यच्या नावाखाली फक्त चिटींग झालीये.." हे वाक्य मी बोलून तर गेलो, पण नंतर वाटलं की काही जणांचे आवडते सर जर गणिताचे राहिले असतील तर त्यांना कसं वाटलं असेल? दुसर्याच दिवशी मी मुलांना माझ्या या वाक्यासाठी माफी मागीतली.. (किती महान आहे ना मी Proud )

तर तुमच्याही आयुष्यात अश्या काही घटना असतील, ज्यात तुमच्यामुळे दुसर्याला किंवा दुसर्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल, तर त्या तुम्ही शेअर करू शकता ज्यामुळे आम्हाला काहीतरी शिकता येईल! मलाही अश्या काही घटना आठवल्या तर मीही लिहितो अजुन...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम आईसब्रेकर धागा. या विषयावर छान किस्से ऐकायला मिळतील अशी आशा करते. माझ्या आठवणीत कमीत कमी, असे २ प्रसंग आहेत मग याच प्रतिक्रियेत अपडेट करते.

तुमचा तो मित्र एकदम स्टुपिड वाटला मला. मी तर अशांना मित्रयादीतून कटापच करुन टाकतो. या प्रसंगात तो पूर्ण चुकीचं वागला आहे.

छान धागा.
माझ्या आठवणीतील प्रसंग.
१. एकदा माझ्याच एका उपद्व्यापामुळे अपघात होऊन चालताना प्रचंड त्रास व्हायचा. एकदा असाच बिस्कीट घ्यायला गेलो. आता त्या दुकानाची रचनाच अशी की वर पायऱ्या चढून गेल्यावर मेन दुकान आणि खाली छोट्या हातगाडीवर बिस्किटे वगैरे मांडलेले.
मी त्या हातगाडीवाल्या माणसाकडे गेलो, आणि गुड डे मागितला. त्यावर तो म्हणाला की वरून दुकानातून घ्या. मी म्हटलं पायऱ्या चढून जाऊ नाही शकत, पाय दुखतोय.
...तो बिचारा त्याच्या दोन कुबड्या घेऊन वर गेला, आणि बिस्कीट घेऊन आला.
आय एम शॉक! आणि खूप वाईट वाटलं.
लर्निंग - त्यापुढे काहीही वस्तू त्याच्याजवळ नसली, तर सरळ वर जायचं आणि वस्तू घ्यायची!

पद्म धागा नोट करुन ठेवला आहे... थोड महत्वाच काम चालु आहे...ते झाल की आपण इथे सविस्तर चर्चा करु.
अर्थातच तुमची परवानगी असेल तरच हा . Bw

आता दुसर्यांच्या ज्या वागण्याने मला त्रास होतोय, जर त्याच प्रकारे मी दुसर्यांशी वागलो तर त्यांनाही त्रास होणारच.
- perfect thought

माझ्या २ मानसकन्या आहेत, आता कोरोनामुळे मी गावी आलोय पण मुलींशी बोलणं होत नाहीये. एक - दोन वेळेस मी फोन करून बोललो, पण त्यांनी एकदाही मला फोन केला नाही. जवळपास रोजच मी त्यांच्या फोनची वाट पाहतो, पण फोन येत नाही...
आता मला कळतंय, माझी आई का मला रेगुलरली फोन का करायला सांगते! ते म्हणतात ना, जावे ज्याच्या वंशा तेंव्हा कळे!
आता मी तरी माझ्याकडून नेहमी खबरदारी घेईन! जर कोणी हे वाचत असेल, तर तुम्हीही तुम्हाला जीव लावणार्या व्यक्तींच्या सदैव काँटॅक्ट मधे रहा.. किमान अश्या परिस्थितीत तरी...!

छान धागा.

यापूर्वी मी “आपल्या चुका आपले गुरु” हा धागा इथे काढला होता.
https://www.maayboli.com/node/72496

त्यात माझा अनुभव लिहिला आहे.

धन्यवाद साद!
प्रोजेक्टर संबंधीची माहिती मलाही उपयोगात येईल... Happy