मुलीसाठी नावं सुचवा..!!

Submitted by PankajSaner on 20 September, 2019 - 07:16

मायबोलीकर नमस्कार..!

अनंत चतुर्दशी ला आमच्या घरी लक्ष्मी च्या रूपाने कन्या रत्नाचा जन्म झाला..!

कृपया सगळ्यांनी बाळासाठी दोन अथवा चार अक्षरी नावं सुचवा..!!
(गणपतीशी निगडीत असतील तर उत्तम)
उदा. रिद्धी, सिद्धी, पारिजात इ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकून २ धागे पडलेत वाटतं. असो.
______
अभिनंदन!!

विद्या, कीर्ति, विभावरी, देवसेना, अनाहता, मनोरक्षा, कनकाभा - देवी सहस्रनामातील ही नावे आहेत
मला स्वतःला विभावरी व अस्मि, रिया, वृंदा ही नावे खूप आवडतात. वृंदा ला एक नाद आहे. विभा ला ऑलमोस्ट स्वतः ची झळाळी (आभा) आहे
रिया ला नाद आहे असे मला वाटते.

मनोरक्षा एक फार शुभ नाव वाटते.

अनन्तचतुर्दशी हा अनन्तव्रताचा दिवस असतो. गणपतीपेक्षा श्रीविष्णु-लक्ष्मीशी अधिक संबंधित. अनंतपद्मनाभ श्रीविष्णु हे शेषनागावर योगनिद्रेत पहुडले असल्याच्या स्थितीत त्यांची पूजा केली जाते. कलशरूपात लक्ष्मीचीही पूजा करतात. तेव्हा श्रीविष्णु-लक्ष्मीशी संबंधित नावही उचित ठरेल. रमा, सारा ही नावे सध्या लोकप्रिय आहेत. रमा ह्या नावाला पुन्हा उजाळा मिळाला आहे.

अभिनंदन!
माझेही काही आणे!

१. श्रद्धा
२. मेघा
३. महाश्वेता
४. शिवली
५. सिद्धी
६. उर्मिला
७. शुभांगी
८. मधुरा
९. अस्मिता
१०. अमिता
११. अथेना
१२. मनिषा
१३. स्वप्नाली
१४. दिप्ती
१५. अंकिता
१६. जास्वंदी
१७. पल्वली
१८. सुलक्षा
१९. प्रज्ञा
२०. विद्या
२१. बागेश्री
२२. मोना
२३. दीपाली
२४. प्राची
२५. अर्लिना
२६. ॲमी
२७. मयुरा
२८. वाचिका
२९. कोमल
३०. नम्रता
३१. प्राची
३२. वैशाली
३३. अनुराधा
३४. रश्मी
३५. मेघना
३६. दिया
३७. दिव्या
३८. पूर्वी
३९. आर्या
४०. सोनाली
४१. शीतल
४२. पूर्वी
४३. स्मिता
४४. वैष्णविका
४५. अपर्णा

अन्वी हे लक्ष्मीचे नाव आहे बरोबर. सध्या जे सान्वी नाव ठेवतात त्याची फोड "सः अन्वी" आहे असे कुठेसे वाचले होते.

अन्वी......
अर्थ....लक्ष्मी, वनदेवता