प्रेम कि मैत्री? भाग ५

Submitted by मनवेधी on 20 September, 2019 - 07:01

त्या दिवसानंतर सार्थक आणि श्रेयामधील मैत्री खूपच खुलत होती... ते नेहमी एकमेकांसोबत असत.... ते एकमेकांचे खूपच जवळचे मित्र बनले होते.... एकमेकांशी न बोलता त्यांना करमायचे नाही.... त्यांना प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगायची असायची... सोबत त्यांची भांडण देखील सुरूच असायची...भांडणाशिवाय मैत्री ती कसली???
जगासमोर ती दोघही खूप strong असायची... पण त्यांचं खर मन फक्त त्या दोघांसमोर च उघडायच... अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत गप्पा व्हायच्या त्या दोघांमध्ये.... आणि तितकेच मतभेद देखील... कारण दोघांचे स्वभाव अत्यंत वेगळे.... सार्थक चे लहानपणी पासून चे आत्तापर्यंत च्या सगळ्या गमतीजमती, सगळे किस्से, सगळे मित्र, सगळे crush श्रेया ला माहीत असायचे.... आणि सार्थक परत परत त्याच गोष्टी तिला सांगायचा.... तिला सगळं पाठ असून देखील ती त्याला थांबवायची नाही... त्याला बोलू द्यायची... कारण तिला माहिती होत की सार्थक फक्त तिच्याजवळ च इतकं बोलायचा... सगळ्यांना तो खूप शांत आणि reserve आहे असं वाटायचं.... पण श्रेया च्या सोबत तो एक वेगळा भासायचा....
सार्थक च्या आवडीनिवडी सगळ्या श्रेया ला माहीत असायच्या.... घरी त्याच्या आवडीची भाजी केली असेल तर ती मुद्दाम जास्त घेऊन यायची.... आणि सार्थक बाजारात गेला तर त्याला आवडत नसताना चॉकोलेट घेऊन यायचा... कारण श्रेया ला चॉकलेट खूप आवडायचे...
असच एकदिवस कॉलेज ला आल्यावर सार्थक पार्किंग मध्ये श्रेया ची वाट बघत बसला होता...
"lecture सुरु झाल तरी अजून कशी काय आली नाही ही", सार्थक वैतागून बोलला.... व तिला कॉल करतो... खूप वेळ रिंग झाल्यावर शेवटी समोरून कॉल उचलला जातो...
"हॅलो... मंद मुली कुठे आहेस अजून.... lecture सुरू झालं बावळट", सार्थक तिच्यावर ओरडतोच....
"हॅलो", समोरून वेगळा च आवाज येतो....
"हॅलो... कोण बोलतंय.?.. मी श्रेया ला लावला होता कॉल... चुकून wrong नंबर लागला का?" स्वतःच्या फोन कडे बघत तो बोलतो...
"हो.... हा त्यांचाच नंबर आहे... त्यांचा accident झाला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये admit आहेत... ",
हे ऐकून सार्थक ला धक्का च बसतो... तो हॉस्पिटल चा पत्ता विचारतो व तडक हॉस्पिटल ला पोहोचतो...
तिथे तिचे आई बाबा व तिचे जवळचेे काही मित्र मैत्रिण म्हणजे अक्षय, रिया आणि अभी अगोदर च आलेले असतात... सार्थक श्रेया चा बेस्ट फ्रेंड असाल्यामुळे अर्थातच ते सर्व एकमेकांना ओळखत असतात.....
"रिया, काय झालं ग श्रेया ला", सार्थक काळजीने बोलला...
"अरे तिचं नेहमीच.... चक्कर येऊन पडली गाडीवरून..... नशीब गाडी च स्पीड कमी होत.... नाहीतर काही खर नव्हतं..", रिया बोलली....
"आता कुठे आहे ती", सार्थक चिडून च बोलला....
"तिच्या काही टेस्ट करायच्या आहेंत... त्यासाठी नेलंय तिला...", अभी बोलला...
श्रेया ला हा त्रास अगोदर पासुनच होत होता.... सारख्याच चक्कर, अशक्तपणा, ताप, हे सारखच सुरू असायचं... पण ह्यामुळे आज तिचा मोठा accident होता होता राहिला होता... सगळ्याना च तिची काळजी वाटत असायची...
तिच्या सगळ्या टेस्ट झाल्यावर तिला परत तिच्या रूम मध्ये आणलं गेलं....
"श्रेया.... बस झालं आता.... उद्यापासून गाडी बंद..... आता बस ने जायचं कॉलेज ला", तिचे बाबा बोलले..
"पण बाबा बस मध्ये मळमळत मला...", श्रेया हळू आवाजात बोलली..
"हो म्हणून च आजपर्यंत इतक्या लांब तुला गाडी ने जायची परमिशन दिली होती... आता नाही", तिची आई रडतच बोलली...
श्रेया ला माहीत होतं... आता काहीच बोलून फायदा होणार नव्हता.... मळमळ हे फक्त कारण असायचं... तिला bike वरून फिरायला खूप आवडायचं.. तिचा चेहेरा पडला होता....
"काका, इथून पुढे मी तिला कॉलेज ला घेऊन जाईन बाईक ने... म्हणजे तिला मळमळ पण होणार नाही... आणि काही त्रास झाला तरी मी सोबत असेन..... उगाच बस ने तिला जास्तच त्रास होईल", सार्थक काकांना समजावत बोलला...
श्रेया ला सार्थक च थोडं बोलणं ऐकून हायस वाटलं... पण श्रेया चे बाबा काही ऐकायला तयार नव्हते... पण कसबस सार्थक ने त्यांना समजावलं... व ते तयार झाले...
थोड्या वेळाने श्रेया च्या आई बाबा ना डॉक्टरांनी बोलावलं म्हणून ते निघून गेले.... ते बाहेर पडताच सगळ्या मित्रांनी तिच्यावर ओरडायला सुरवात केली... श्रेया गप्प ऐकून घेत होती.... आणि सार्थक ला तिच्याकडे बघून दया येत होती आणि हसूही येत होतं....
"म्हशे.... आता काय बोलत नाही तुला... नंतर बघतो... ", सार्थक बोलला...
श्रेया सगळ्यांच गप्प ऐकून घेत होती.... तिचे आई बाबा आल्यावर त्या सगळ्यांना घरी जायला सांगितले... पण श्रेया चे मित्र ते... ज्याप्रमाणे श्रेया त्यांच्यावर जीव लावत होती त्याप्रमाणे त्यांचा ही तिच्यावर खूप जीव होता.... संध्याकाळ पर्यन्त थांबायचं अस त्यांनी ठरवलं... संध्याकाळपर्यंत हॉस्पिटल च्या त्या रूम चे एका मैत्री कट्ट्यामध्ये रूपांतर झाले होते... तिथेही ते मस्ती करत होते... संध्याकाळ झाल्यावर ते आपापल्या घरी गेले... सार्थक सुद्धा गेला... पण त्याच मन लागेना... त्याने परत तिला फोन केला व ते तासभर बोलत बसले...
जोपर्यंत श्रेया हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत रोज सार्थक हॉस्पिटलमध्ये जायचा... व घरी आल्यावर परत फोन वर बोलत बसायचा... त्यांना करमत च नव्हतं एकमेकांशिवाय...
.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
___________
ह्म्म्म प्रेम की मैत्री? थोडं थोडं लक्षात येतय कथेचे शीर्षक.