.
मी - नमस्कार आपल्या रोजच्या रगाड्यातून, रडगाण्याच्या रुटीन मधून व प्रोग्रॅम मधून वेळ काढून इथे आल्याबद्दल आभार मानते.
.
हृदय - कसचं कसचं! रडगाणं तर नेहमीचं आहे. पण मुलाखतीची अशी सुवर्णसंधी क्वचितच येत. मीच आपला आभारी आहे.
.
मी - तर मुलाखतीला सुरुवात करू यात? मला आपला दिनक्रम सांगाल का? म्हणजे तसं बराच ऐकून आहे आपल्या चिकाटी बद्दल पण from horse 's mouth ..
.
हृदय - हो सांगतो ना जरूर . तर सकाळी उठल्यापासून एकंदर झोपेपर्यंत मी धावतो. इकडे फेरी मार, तिकडे रपेट घे, कधी वेगाने धडधड धडधड धावत सुट, वाटेत ठेचकाळून पड. हां ठेचकाळून पडणे ही तर नित्याचीच बाब आहे. मला सवयच होउन गेली आहे.
.
मी - बाप रे मग लागत नाही?
.
हृदय - लागतं ना. मग थोडा काळ रडगाण्याचे शो फुल्टू करतो , परत ये रे माझ्या मागल्या. हो अभिमानाच आहे मला कोणत्याही अनावस्था प्रसंगातून bounce back होण्याचा.
.
मी - वा! आपले कौतुकच आहे. बरं आम्ही असे ऐकले आहे की क्वचित दुसरं एखादं हृदय तुम्हाला भेटतं. काय होतं मग पुढे?
.
हृदय - हां अगदी क्वचित म्हणजे असे होणे अति दुर्मिळच असते परंतु जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा एकदम पार्टी असते. म्हणजे आम्ही दोघे अगदी हातात हात घालून, गुजगोष्टी करतो. सैरावैरा धावणं त्या काळात एकदम बंद होते . आनंदी कवितांच्या फुलबाज्या आम्ही पेटवतो, जग सुंदर भासणे, साधे प्यायचे पाणीही "चढणे" या गोष्टी होतात. अगदी स्वर्गातच विहरतो आम्ही.
.
मी - अरे वा वा. बरं असा कालावधी किती काळ रहातो मग?
.
हृदय - that depends प्रत्येकाची involvement , प्रकृती वेगवेगळी असते. काही भंवरे आणि फुलपाखरे याचा हात धर, सोडून दे, त्याचा हात पकड , सोडून दे असे करतात. मात्र आम्ही कवी लोकांचे असू तर आयुष्यभरही झुरतो. मग sad गाणी ऐकणे व स्वत:चे रडगाणे गाणे या दोन कृती आलटून पालटून करतो. कविता बर्याच होतात या काळात. फरक एवढाच की दु:खी असतात. स्वर्गातून, ढगातून एकदम पृथ्वीवर पडल्याने बुड शेकून निघते.
.
मी - वा! बरेच प्रकार आहेत तर तुमच्यात. असं होतं का हो की तुम्ही खास शोधायला जाता आणि तिथे दुसरं हृदय च नसतं, म्हणजे अगदी ठक्क पोकळी असते.
.
हृदय - होतं होतं आम्ही मारे धावतो आणि पोकळी असते, एकदम पायात फास अडकुन, उलटे टांगले जातो बघा.किंबहुना काय की अशी पोकळी असलेल्या ठिकाणीच धावायची हौस असते आम्हाला. आवड आपली आपली. हेहेहे!! मग तेव्हा शेरांच्या टिकल्या आणि शायरीचे भुईनळे फुटतात.
.
मी - किती छान विस्तृत व प्रांजळ उत्तरे दिलीत . बाकी मुलाखत आवरती घेण्यापूर्वी एकाच प्रश्न विचारते सध्या काय प्रोग्रॅम?
.
हृदय - परवाच ठेचकाळण्याचं शतक गाठलं. यावेळीही रडगाण्याचे कार्यक्रम जोमाने सुरु आहेत.पण शतक झाल्याने सवय जबरी झाली आहे, तेव्हा लवकरच bounce back करेन.
<पडदा पडतो>
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
छान.
छान.
मात्र आम्ही कवी लोकांचे असू
मात्र आम्ही कवी लोकांचे असू तर आयुष्यभरही झुरतो. मग sad गाणी ऐकणे व स्वत:चे रडगाणे गाणे या दोन कृती आलटून पालटून करतो.
>> कवी आणि इमोशनल व्यक्ती. पटलं एकदम. छान लिहिलंय.
भारीय
भारीय
छान लिहलय
छान लिहलय
रिलेट झालं. कारण मीपण एक
रिलेट झालं. कारण मीपण एक ह्रूदयच आहे की.
छान लिहीलय
छान लिहीलय
छान कल्पना
छान कल्पना
अॅमी, अमर, अज्ञानी, राजेश,
अॅमी, अमर, अज्ञानी, राजेश, अक्कु, साद आणि मानव, सर्वांचे खूप खूप आभार.
मजेशीर
मजेशीर
धन्यवाद सुनिधी.
धन्यवाद सुनिधी.
मजेदार!
मजेदार!
धन्यवाद srd
धन्यवाद srd
(No subject)
सामो, तुम्हीतर हृदयाला
सामो, तुम्हीतर हृदयाला त्याच्या आऊट ऑफ सिलॅबसचे प्रश्न विचारले कि..
मन्या टु गुड!!!
मन्या टु गुड!!! बुचकळ्यात पाडलं त्याला.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्त
मस्त
भारी आहे.
भारी आहे.
कुमार, किल्ली धन्यवाद.
कुमार, किल्ली धन्यवाद.