पार्कातला मेगा जिटीजी !!!

Submitted by Yo.Rocks on 13 April, 2009 - 02:41

मेगा जिटीजी.. (निमित्त मेगा म्हणजे काय असावं बरे हे बघण्यासाठी.. :))
स्थळ : गणेश उद्यान, शिवाजी पार्क
वेळ : ५.३० पिएम (एएम ला कोणी येणार होते म्हणे ! किती तो उदंड उत्साह !! Biggrin )
अपेक्षित उपस्थिती : ४०....... वजा ३६.. जल्ला हाय काय नाय काय !

गर्मीचे चटके अनुभवत, दादरच्या गजबजलेल्या रस्त्यांतुन वाट काढत भ्रमा नि यो शिवाजी पार्काकडे जाउ लागले.. कारण मेगा जिटीजी..! [भ्रमाने तर आज पोटापाण्याच्या प्रश्न्नाला नि आपल्या मिशीला बगल देत जिटीजीला (ते पण मेगा!!) उपस्थिती लावायची ठरवली होती.. चक्क दिडेक वर्षाच्या कालावधीनंतर भेटत होता.. ]

या दोघांना तसा किंचीत उशीर झाला होता पण इंद्राने या टांगारुंचा काही भरवसा नाही म्हणुनच फोनवरुन आधी खातरजमा करुन घेतली.. पार्कात पोहोचेपर्यंत स्वा चाही फोन आला.. बिचारी मेगा जिटीजीसाठी रेल्वेच्या मेगा ब्लॉकमध्ये अडकली होती..

काहि मिनीटातच गणेश उद्यान जवळ येवु लागले.. दोघांचा उत्साह वाढला..
डोळ्यासमोर दृश्य उभे राहु लागले.. मेगा जिटीजीचे !!
बहुतांशी सर्वांना भ्रमणध्वनीद्वारे संदेश गेला होता !
त्यामुळे भरपुर उत्सुकता होती.. अपेक्षा होती !
काय असेल ते दृश्य !!
नि खरच...
नेहमीच्या त्या कट्ट्यापाशी कोणीच नव्हते !! (तेव्हाच मेगा जिटीजीची चाहुल लागली !! :P)

बरं इथे कोणी नविन आयडी असतील तर कळणार कसे.. ! इथे तिथे नजर फिरवताच मंदिराच्या एका बाजुस त्रिकुट दिसले !इंद्रा, एश नि किशोर मुंढे ! मेगा जिटीजी कसा पार पाडावा याचेच भाव चेहर्‍यावर दिसत होते... जवळ जाताच किशोर यांच्या सौ. पण बाजुला बाकड्यावर बसलेल्या दिसल्या (कल्याणहुन थोडा वेळ का होईना पण या मेगा जिटीजीला उपस्थित रहावे ही विनंती या दोघांनी अतिशय नम्रपणे व आनंदाने स्विकारली होती ! खरच कौतुकास्पद !! )

यो काहि आनंदाची बातमी देतोय अशी नकोती आशा बाळगणार्‍या इंद्राला एश नेच "आपले जमलेय" ची चांगली बातमी सांगितली नि फार जवळच (थेट पनवेल !!) लग्न ठेवल्याचे सांगुन आम्हाला धक्का दिला !! तो धक्का भ्रमा नि यो लाच जास्ति बसला !! भ्रमाने तर 'दरवर्षीच्या वविप्रमाणेच बसची (पण एसीवाली) सोय करावी तरच येवु' असे प्रेमळ आश्वासन दिले ! Happy

अजुन कोणी NRI ते माहित नव्हते ! येतील हळुहळू अशी पुसट आशा होती ! सहकुटुंब येइन सांगणारे घारुअण्णा येणार नसल्याचे इंद्राने सांगितले! कदाचित खरेदीसाठी त्यांनी दादरऐवजी दुसरा पर्याय निवडला असावा Happy काही वेळातच अमर कुलकर्णी हा डोंबिवली फास्ट ने येउन थडकला !! नि संख्या ७ वर जाउन पोहोचली !! मेगा जिटीजीसाठी पुरेशे होती की !!
अजुन कोणी येणार तर नाही ना म्हणुन किंचीत प्रमाणात फोनाफोनी झाली !! दिवाणेखास पार्टिच्या महाव्यवस्थापकांना फोन केला असता ते आजही कार्यालयात अडकले होते ! खरच "दिवाणेआम" अवस्था !! नंदुला फोन केला पण फक्त "ट्रिंग ट्रिंग"च झाले नि साहजिकच तिचे नाव निश्चित टांगारुमध्ये आले ! मंजुला तिच्या पार्काजवळच असलेल्या माहेरघरातुन निघवत नव्हते नि मेगा जिटीजीला पण मिसवत नव्हते म्हणुन तिचे आपले 'पार्कात की घरात' चालु होते.. चेतनाबाईंनी देखील येउ शकत नसल्याचे सांगितले.. प्रयास बस्स झाले, स्वाती सोडली तर आता खरेच कोणी येत नाही म्हणुन आम्ही गणेश मंदिरामागील नेहमीच्या कट्ट्यावर निवांतपणे आसनस्थ झालो !
इंद्रा आपल्या पार्कात बागडत असलेल्या बछड्याला घेउन येतो म्हणुन गेला. हल्ली अनियमीत असणारे उर्वरीत मायबोलीवीर मग मायबोलीच्या चालु घटनांवर चक्क गप्पा करु लागले ! भ्रमा नि यो तर ''गेले ते वाहत्या बीबींचे दिवस" करत होते.. तर अमर अजुनही काहि ठिकाणी पुर येतो सांगत होता.. श्री. नि सौ. मुंढे ऐकत होते.. तर एशचे आपले दुसरेच काहितरी चालु होते.. लग्न करुन थेट मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या जोडप्यातील नवरीच्या साडीची किंमत किती असेल हा अंदाज घेत होता.. (आतापासुनच धास्ती घेतलीय बिचार्‍याने )
थोड्या वेळातच श्री. नि सौ. मुंढे यांनी पुढच्या मेगा जिटीजीलापण नक्की येउ म्हणत निरोप घेतला.. नि तोच मनीचे आगमन झाले.. "मेगा कुठे आहे?? " हे भाव तिच्या चेहर्‍यावर नसतील तर नवलच... साहजिकच विचारणा झाली नि आम्ही पण 'आताच सगळे निघुन गेले' म्हणुन तिची समजुत काढण्याचा असफल प्रयत्न केला.. तीच्या 'मैत्रलाईफ' कार्यशाळेबद्दल भ्रमाने विचारपुस केली.. लौकरच ठरणारेय तेव्हा माबोकरांनीच पहिले उपस्थित रहावे म्हणुन ताकीद दिली.. इकडे मनी आलि पण इंद्रा गायबला तो परतलाच नव्हता ! बछडा आता बाबाला खेळवत असेल असे वाटले.. पण काहि क्षणातच इंद्रा आपल्या कुटुंबाला घेउन हजर झाला.. इंद्राच्या हातात "श्रीशैल" नि जुईकडे श्रीशैलचा मोठा फुगा... त्यांच्याच सोबत एशबेबी हजर झाली..

साहजिकच सगळ्यांना श्रीशैलशी ओळख करुन घेण्यात रस होता.. पण त्याला यो जरा जास्ती जवळचा वाटला.. म्हणुनच की काय आनंदाने दोघांनी एकमेकांच्या सुपिक डोक्यावरुन हात फिरवत ओळख करुन घेतली.. त्याच्याबरोबर सर्वांच्या गंमती जमती चालु झाल्या.. गप्पा टप्पा सुरु असतानाच स्वा चा नक्की कुठे आहात म्हणुन फोन आला.. नि यो ने ही जवळपास ३०-४० जणांचा मोठा घोळका आहे अशी माहिती देउन भुलभुलैय्या केला.. दोन तीन घोळके बघितल्यानंतर शेवटी तीला आमचा मेगा घोळका दिसला.. Proud

गुजगोष्टीत रमलेल्या महिला मंडळाला तिकडेच ठेवुन मायबोलीवीर जिटीजीच्या शेवटच्या टप्प्याकडे (वडे-भजीचा स्टॉल)वळाले.. म. मं येण्याअगोदरच आम्हि भजीप्लेटवर चढवलेला हल्ला पाहुन स्वा, मनि डाफरल्या ! नि ताबडतोब त्यांच्या पुढ्यात भजीप्लेट करण्यात आली Happy प्रथमच इकडच्या भजीचा आस्वाद घेणारे अमर, एशबेबी तर तृप्त झाले ! पेटपुजेच्या या कार्यक्रमात उशीराने येणारे स्वा चे "अहो"(सुर्यकांत)आमच्यात येउन कधी सामिल झाले ते कळलेच नाही ! आधीच खोकत असलेल्या या साहेबांना चांगला खोकला यावा म्हणुन भ्रमाने भजी खाण्यास सांगितले.. नि त्यानेही दिलखुलासाने स्विकार केला..

भजी खावुन होते तोच मंजुबाई शेवटी पार्कात आल्याच.. मेगा जिटीजीचे परिक्षण करायचे होते म्हणुनच की काय तिने आल्या आल्या गणती सुरु केली ! पुन्हा गप्पांनी जोर धरला.. वविच्या स्पॉटबद्दल विषय नाही निघाला तर नवलच.. गप्पा रंगत असतानाच सुर्यकांताने मिठाईचा पुडा समोर ठेवला ! मिठाई कशाला ??????? हा प्रश्न्न आम्हाला पडणे स्वाभाविक होते, पण स्वा लाही तोच प्रश्न्न पडला !!! अरेच्या !! पण लगेच "लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची एडवान्समध्ये पार्टी" म्हणुन सुर्यकांतने खुलासा केला.. Happy काहि म्हणा.. मिठाई मस्तच होती ! पुढच्या वेळेस स्वा ला नका आणु पण मिठाई मात्र आणा असे सांगण्यात आले ! Proud

अशाप्रकारे जिटीजाचा शेवटही गोड झाला.. इंद्रा एन्ड फॅमिलीने तिथेच निरोप घेतला नि मग पार्कातुन बाकी सर्वांच्या चलते चलते गप्पा सुरु झाल्या.. येत्या काही महिन्यातच दोन तीन माबोकरांची लग्ने असल्याने वविलाच ह्यांनी सत्यनारायणाची पुजा घालावी असा प्रस्ताव मंजुने मांडला.. Uhoh Lol

पुढे सर्वजण आपाआपल्या वाटेने मार्गस्थ झाले.. बेलापुरहुन मेगा जिटीजीस आलेल्या एशबेबीला तर दादरच्या गर्दीत टॅक्सी मिळवताना अथक परिश्रम घ्यावे लागले !! खरच एवढ्या लांबुन ती जिटीजाला आली त्याचे श्रेय "मेगा"चेच होते !!
काहि असो जिटीजी छान पार पाडला ... सर्व टांगारुंनी अनुपस्थित राहुन मेगा जिटीजी यशस्वी केल्याबद्दल धन्यवाद ! Proud Happy

गुलमोहर: 

अरे व्वा जयसूर्या! Happy मस्तच लिहिलाय रे वृत्तान्त Happy मजा आली वाचताना

मेगा जीटीजी Happy ४० वजा ३६ Lol
यो, छान लिहिलस.. Happy

योग्या धमाल उडवून दिलीस रे मेगाच्या नावाने :d

हा बघ माझा पण छोटासा प्रयत्न http://www.maayboli.com/node/7162

यो, छान वृत्तांत

यशस्वी जिटीजीबद्दल अभिनंदन......

यो... मज्जा आयली मा? चार असो की चाळिस.. येणारे इले! माझ्यासारख्यांनी मिसलं!

४० वजा ३६>> Proud

पण मज्जा केली ना, ते महत्वाच. मिसल आम्ही ह्यावेळी

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

सहीच रे योग्या Lol
************
To get something you never had, you have to do something you never did.

एकदम सही.............

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

मस्त रे, मला विनयचा समस मिळाला होता पण रविवारी मी नेमका भावाच्या लग्नपत्रिका वाटत हिंडत होतो. त्यामुळे इच्छा असुनही नाही जमलं. पुढच्या वेळी नक्की भेटु.

____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

पूर्वरंगातला "नुस्ता" जिटीजी मनी-मंजुच्या आगमनाने "मेगा" झाला!! Happy भ्रमा मुळे या gtg ला उंची तर या दोघींमुळे वजनही प्राप्त झालं !!

योगु,
मस्त रे वृ. Happy फोटु धाड बगंया

सहीच लिहिलयस... मेगा अंदाज आला.. Lol

जिटीजेचे मेगापण लक्षात घेता सगळे फोटुत मावणार नाहीत असा अंदाज असल्याने कॅमेरा नेण्याचे मुद्दामहून टाळले होते... Lol

जायजुये.. काळजी करा नको.. तू येशीत तेव्हा सुपर मेगा जिटीजी करु.. Happy

विशाल, कविता.. पुढच्या खेपेस नक्की Happy

योगाचा मेगा जोरात!! Proud
योगी, छान लिहलयं रे!

यशस्वी जिटीजीबद्दल अभिनंदन......

पुढच्या वेळी नक्की भेटुया...........
----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....