चवथ्या घरातील प्लूटो

Submitted by सामो on 17 September, 2019 - 13:50

हा धागा अतिसंवेदनशील मनाच्या लोकांनी वाचू नये. ज्योतिषामध्ये रुचि असलेल्या लोकांचे प्लूटो या ग्रहाविषयीचे अनुभव वाचायला आवडतील. मायबोलीवर ज्योतिष/भविष्याचा वेगळा ग्रुप असल्याने तेथेच हा धागा पोस्ट करत आहे.
.
चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.
भेसूर, भीतीदायक, थंड रक्ताचा, चेहरा लपवलेला खुनी कोणी असेल तर तो प्लूटो. मुळापासून उखडून काढणारा, Transformative , संपूर्ण उलथापालथ करणारा ग्रह कोणता असेल तर प्लूटो. असा अनुभव (ग्रह) खरं तर कुंडलीतील कोणत्याच घरात स्वागतार्ह नाही पण least of all चवथ्या घरात. जे घर कुंडलीचे गर्भाशय मानले जाते , कुंडलीतील सर्वाधिक vulnerable स्थान. लहानपणीचे घरातील वातावरण, घरातली परिस्थिती पोषक होती की अन्य काही ते जे स्थान पाहून कळते ते चवथे घर. खरं तर भावी आयुष्यात subconscious reflexes कसे होणार ते ठरविणारे स्थान.
.
प्लूटो इथे पडला की त्याला विषारी दूध म्हटले जाते. दूध जे अर्भकाच्या पोषणाकरता अत्यावश्यक असते तेच विषारी झाले तर त्या व्यक्तीने पाहायचे कोणाकडे? बालपणीचे abusive , lethal वातावरण - trauma कसा कळणार जगाला. मूक किंचाळी .... silent scream = चवथ्या घरातील प्लूटो. प्रतीकच घ्यायचे झाले तर साप असलेली काळी dark विहिर. जिथे पडलो असता किंचाळले तर ऐकायला कोणी नाही.
प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडलेले असते ज्यात काहीतरी दबा धरलेले संकट ऊभे ठाकते , आसपास लोकं असतात, पण तोंडामधुन आवाज फुटत नाही. त्या लोकांपर्यंत कसे पोचायचे ते कळत नाही.
...........................................ज्योतिष संपलं. आता पुस्तकाचा रिव्ह्यु सुरु.............................
पुस्तकाचा आणि ज्योतिषा चा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तो संबंध धागालेखिकेला जाणवला कारण दोन्हीतील भेसूरता.

________________________________
काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "" पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत.
(१) पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना. या १८ वर्षाच्या मुलाने २ लहान मुलींचा (वय वर्षे १२ व १३)खून करुन, नंतर त्यांच्या शवांवर बलात्कार तर केलाच तरीही त्याच्या राग शांत होईना तेव्हा बूटांनी त्यांना चिरडले.
पण हे सर्व प्रक्षोभक आणी हिंसक व भडक लिहीण्यासाठी हा धागाप्रपंच नाही तर त्या मुलाशी व त्याच्या पालकांशी बोलून या मानसोपचारतज्ञाला जी "इनसाईट" मिळाली ती मला सांगायची आहे.
या मुलाची आई जी डोक्याने थोडी अधू होती, तिला मुलाचे रडणे सहन न झाल्याने, या मुलाला तान्हे असताना अंधार्‍या खोलीत रडत ठेऊन बाहेर निघून जात असे. असे महीनोंमहीने केल्याने त्या बाळाचे रडणे तर थांबले पण मानवी संपर्कातून जी ऊब व माया मिळते ती न मिळाल्याने, हा मुलगा माणसांवर विश्वास टाकणे, त्यांच्या सकारात्मक प्रोत्साहनास प्रतिसाद देणे , त्यांच्या भावनांशी एकरुप होणे अशा काही मुलभूत "ट्रिगर्स्"पासून वंचित राहीला. त्यातून त्याच्या संतापाचा, "सहानुभूती व सहवेदनेच्या अभावाचा" जन्म झाला.
लेखकाने खूप सोप्या पण वैद्यकीय भाषेत हे उलगडून दाखविले आहे. पुस्तक खाली ठेववतच नाही. या पुस्तकातील अन्य लहान मुलांच्या कथाही अशाच विद्रावक, भयानक पण दु:खाचा कढ आणणार्‍या होत्या. एक वेगळ्याच विषयावरचे पुस्तक.
गुडी -गुडी पुस्तकांपेक्षा फार वेगळ्या अन व्यावहारीक विषयावरचे पुस्तक असे म्हणेन.
.
हे पुस्तक लायब्ररीत मिळाले. सर्वच कथा विचित्र व हृदयद्रावक वाटल्या.बालमानसोपचारतज्ञाचे काम इतके अवघड असेल याची कल्पना नव्हती.
(२) एक कथा आहे जी मला सर्वात स्पर्शून गेली. - 'फॉर युअर ओन गुड'.३ वर्शाच्या मुलीने तिच्या आईवर रेप होताना व आईचा नंतर खून होताना पाहीला. नंतर त्या खून्याने या इवल्याशा मुलीचा गळा चिरला.तो गळा चिरताना त्याने हे शब्द वापरले की "फॉर युअर ओन गुड डूड".११ तास ही मुलगी एकटी त्या प्रेताजवळ राहीली, तिने स्वतःचे स्वतः फ्रीझमधील दूध पीण्याचा प्रयत्न केला पण गळ्यातून ते दूध बाहेर येई. ती ११ तासांनी सापडल्यावर काही महीन्यांनी तिने फोटोच्या ढीगातून त्या खून्याला ओळखले. पुढे विटनेस म्हणून तिला वापरणार होते पण त्याची पूर्वतयारी म्हणून ती ४ वर्षाची असताना बाळाला मानसोपचारतज्ञाकडे पाठविले गेले.अन मग थेरपी सुरु झाली.
की मुलगी काय करत असेल बरं थेरपीत? तर डॉ. पेरींवर विश्वास बसल्यानंतर ती हळूहळू ओपन अप झाली व "तो' सीन स्वतःची स्वतः एनॅक्ट करु लागली. ती पेरींना हात बांधल्यासारख्या कल्पित अवस्थेत झोपवत असे.थोपटत असे, मधेच जाऊन दूध आणे व देई,खेळणे आणे व देई. पेरी अर्थातच 'त्या आईची" भूमिका करत असल्याने हालचाल करत नसत.मग ती त्यांच्या अंगावर झोपून "रॉक अन हम" करत असे.कधी रडत असे/हुंदके देत असे.हे असे दर सेशनमध्ये होई.या थेरपीचा की पॉईंट हा होता की त्या मुलीला सिचुएशनचा पूर्ण "कंट्रोल" पेरींनी दिला. जो कंट्रोल तिला "तेव्हा" मिळाला नाही तो या सेशनमध्ये तिला दिला गेला. अन हीलींग सुरु झाले.
पुढे ही मुलगी खूप 'प्रॉडक्टीव्ह" आयुष्य जगली,जगते आहे. तिला उत्तम ग्रेडस मिळाल्या. तिचे स्वतःचे कुटुंब आहे. ती एक द्याळू व संतुलीत व्यक्ती आहे. शी इज जस्ट डुईंग फाईन.
.
अर्थात फक्त थेरपीच नव्हे तर औषधोपचाराचीही जोड द्यावी लागली.क्लोनॉडीन नावाच्या औषधामुळे तिचे निद्रेविषयक बरेच प्रश्न सुटले, बेल वाजल्यावर दचकणे आदि भीती दूर झाली वगैरे. याच कथेत औषधोपचारावरती एक फार मार्मीक मिमांसा केलेली आहे. मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.
पुढेही सोप्या वैद्यकीय भाषेतील खूप विश्लेषण या कथेत वाचावयास मिळते.
ही कथा व हे एकंदर पुस्तकच मानवी मेंदूची गुंतागुंत सोडविणारे वेधक वाटले.
(३) एक शेवटची "केस" सांगते. अँबर नावाची मुलगी स्वतःच्या मनगटावर रेझर/सुरीने "कट्स" देत असे. बरेचदा असे "सेल्फ्-म्युटिलीएशन" करणार्‍या मुलामुलींचा भूतकाळ अंधारमय/यातनामय असतो आणि अँबरही याला अपवाद नव्हती.
७ वर्षाची असल्यापासून तिच्या सावत्र वडीलांनी केलेल्या लैंगिक शोषणाची ती शिकार होती. वडील दारु प्यायचे तेव्हा "तसे" वागायचे. भीतीमुळे तिने हे लपविले होतेच पण पुढेपुढे एकदाचे "ते" होऊन जाउ दे या हेतूने ती त्यांना दारु देणे/प्रव्होकेटीव्ह वागणे आदि करुन ती तो यातनामय प्रसंग हातावेगळा करत असे. पुढे २ वर्षांनी आईला ने वडीलांना तिच्याबरोबर पाहीले व हाकलून दिले. पण आईने काही मानसोपचारतज्ञाची मदत घेतली नाही.
लहानपणीच्या या स्मृती अँबरकरता इतक्या ओव्हरव्हेल्मींगली यातनामय होत्या की हळूहळू त्या स्मृतींपासून स्वतःला "डिसोसीएट" करायला ती मनगटावर "कट्स" देऊ लागली व "ट्रान्स" मध्ये जाऊ लागली. अशा प्रकारची मुले जे ड्रग्ज घेऊन साधतात ते ती स्वत:ला जखमा करुन साधू लागली.
तिला लहानपणाची लाज (शेम) व गुन्हेगार (गिल्ट) वाटे पण स्वतःला सुरक्षित करण्याची पॉवर तर हवी होती. यातून सुरु झाले एक समांतर आयुष्य!
प्रसंगी ती स्वतःला कावळा समजे. अतिशय चतुर/स्मार्ट पक्षी जो पॉवरफुल आहे, वाईटाचा पारीपत्य करणारा आहे. अन तो काळा हीडीस आहे, कोणालाही नको असलेलाही आहे. हवे तेव्हा ती त्या जगात निसटून जाई , जिथे ती कावळा असे. ती फक्त काळे कपडे घाले, शरीरावर काळे टटू रेखाटून घेत असे.
डॉ पेरींनी तिला कशी थेरपी दिली, तिला श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास शिकविले, १ श्वास - १ पायरी- २ रा श्वास-दुसरी पायरी .... अशा १० पायर्‍या उतरुन तिला मनातल्या मनात जीन्याखालच्या अंधार्‍या पण सुरक्षित खोलीत जायला "स्मृती पासून डिसोसीएट करायला" शिकवले ज्यायोगे ती "कट्स" देईनाशी झाली.
पुढे याच थेरपीतून त्यांनी तिला हे पटवून दिले की जग "हीडीस समजून" तिला नाकारत नसून ती जगावर तिच्या शेम व गिल्टचे आरोपण करत एक सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी जगत आहे हे तिच्या लक्षात आणून दिले.
.
अर्थात औषधोपचारही लागलेच लागले. या औषधांचे मेंदूवर होणारे परीणाम व विश्लेषण केवळ वाचनीय आहे. या पुस्तकातून एक नक्की अर्थबोध झाला तो म्हणजे - बाळाची पहीली वर्षे फार फार नाजूक असतात अन आई -वडीलांचा रोल फार महत्त्वाचा (क्रुशिअल) ठरतो. दुसरे एक कळले ते हे की मुलांना रुटीन/एक स्ट्रक्चर (साचा) लागते. एका प्रेडिक्टेबल, रीपीटीटीव्ह आयुष्याची अतोनात आवश्यकता असते व त्यातून त्यांची वाढ होत असते. असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
.
प्रत्येक समुपदेशकाने वाचावेच असे पुस्तक आहे.
.
वरील पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे कारण बालमानसोपचारतज्ञाने लहान वयात घडलेल्या दुर्दैवी घटनांवर, trauma वरती यामध्ये भाष्य केलेले आहे. पुस्तक लेखकाचा ज्योतिषाशी काहीही संबंध नाही.
_______________________
चवथे घर = बालपण, हिडीस life-altering/transforming trauma = प्लूटो
abuse मग तो शारीरीक असो, लैंगिक असो की मानसिक तो चवथ्या घरातील प्लूटो दाखवितो. ज्या घरात रात्री आश्रयाला जायचे, सुखेनैव निद्राधीन होण्याकरता जिथे आसरा शोधला तेच घर वखवखलेले , भुताटकीच्या पछाडलेले निघाले तर? चवथे घर हे जातकाच्या कुंडलीतील मध्यरात्र दाखविते, त्याचे घरटे, solace मिळण्याचे स्थान दाखविते. निदान इथे प्लूटो सारखा खुनी, अशुभ सैतानी ग्रह दडू नये.
.
प्रौढत्वातील स्व-रक्षणाचे आपले reflexes कसे होणार आहेत हे चवथे घर ठरविते. बरेचदा प्लूटो चवथ्या घरात पडलेली मुले अकाली प्रौढ तर होतातच पण त्यांच्या स्वसंरक्षणाचे एक callous mechanism तयार होते. हे जेव्हा मी वाचते तेव्हा मला वर सांगीतलेली ३ री केस आठवते. स्वतःला वास्तवापासून तोडून टाकून स्वप्नसृष्टीत रममाण होण्याची, अगतिकता, लाचारी, हतबलता.
.
प्लूटो हतबलता जाणवून देणारा अत्यंत dark, omnipotent ग्रह आहे. आणि चवथे घर सर्वाधिक vulnerable घर. हे दोन forces एकत्र येतात तेव्हा खूप क्लेश-यातनादायक अनुभव जरुर येतो.
.
हे जरुर वाचा -
https://astrolocherry.com/post/83371212060/astrolocherry-pluto-in-the-4t...
http://theastrologyplacemembership.com/2010/08/pluto-in-4th-house/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्योतिषामध्ये रुचि असलेल्या लोकांचे प्लूटो या ग्रहाविषयीचे अनुभव वाचायला आवडतील
>>>

पण प्लूटो आता ग्रह राहिलेला नाही. Factual error आहे तुमच्या लेखात.

टवणे सर, तुमचे बरोबर आहे. -
https://www.space.com/why-pluto-is-not-a-planet.html
___
पण अजुनही ज्योतिषात त्याचे परिणाम पाहीले जातात तेव्हा सोईकरता त्याला ग्रहच म्हणु यात ....

चवथे घर = बालपण, हिडीस life-altering/transforming trauma = प्लूटो >>> हे जरा ऊलगडून सांगता का?

वरच्या ऊदाहरणांवरून चौथ्या घरात प्लुटो पडला तर मुलगे नराधम आणि मुली विक्टिम्स बनतात हे अनुमानबरोबर आहे का?

>>वरच्या ऊदाहरणांवरून चौथ्या घरात प्लुटो पडला तर मुलगे नराधम आणि मुली विक्टिम्स बनतात हे अनुमानबरोबर आहे का?>> नाही तसे नाही.
.
घरटे, चवथे घर म्हणजे कुंडलीतील, मध्यरात्र असते. इथे सुखेनैव, गुडुप झोपायचे तेथेच जर प्लूटो हा दुष्टग्रह पडला तर? म्हणजे घरामध्ये जास्त पॉवर-प्ले चा , दादागिरीचा सामना करावा लागणे, आपले कोणी ऐकून घेत नाही असे वाटणे. म्हणजे चवथे घर हा कुंडलीतील हळवा हिस्सा असतो. इथे आपली पाळं मूळं असतत, जे वरवर दिसत नाही.
representing childhood experiences that give rise to an unconscious emotional experience of life ( https://www.astro.com/astrology/in_dgfourthhouse_e.htm)
मुले (मले-मुली) व्हिक्टिम बनतात किंवा निदान तसे त्यांना स्वतःला वाटत रहाते, वाटत असते.
>>The 4th describes the more “hidden parent” (मग ती आई असेल वा वडीलही असतील) - the one whose influence may have been less outwardly visible, but possibly stronger at an unconscious level. >>
मी मांडलेली उदाहरणे टोकाची आहेत. एकंदर बालपणीचा अनुभव यातनामय असतो.
————————
खरे तर प्लूटोबद्दल थोडी पार्श्वभूमी द्यायला हवी होती.प्लू टो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कोणत्या ना कोणत्या घरात पडतोच. प्रत्येक घराला काही कारकत्व दिलेले आहे. प्लूटोमुळे होतं काय व्यक्तीला त्या त्या कारकत्वाबाबत हतबलतेचा, नियंत्रण नसण्याचा अनुभव ये तो. एकंदर अतिशय क्लेशदायक ग्रहं आहे.

ओके.
The 4th describes the more “hidden parent” (मग ती आई असेल वा वडीलही असतील) - the one whose influence may have been less outwardly visible, but possibly stronger at an unconscious level. >> you speak of influence as in these children suffer at the hands of their parents.
What happens to the children born with such planetary alignment to the Godsend, angel like parents?

हायझेनबर्ग नाही नाही.
>>speak of influence as in these children suffer at the hands of their parents.>>
तसे नाही. चवथ्या घरा च्या कारकत्वाखाली असे पालक (आई अथवा वडील) येतात ज्यांचा आपल्या अमूर्त मनावरती अधिक पगडा असतो. उदा - पारंपारिकरीत्या ज्योतिषात वडीलांना १० वे घर व आईस ४ थे घर दिलेल होते परंतु आता असे मानले जाते की तसे अगदी ठरलेले काही नाही कदाचित वडीलांचा पगडा अधिक असेल.
परंतु प्लूटो चवथ्या घरात पडला रे पडला की ठामपणे त्याची आई (किंवा वडील) हे राक्षस असतील असे सांगता येत नाही. अन्य ग्रह, दॄष्टी यां चा विचार करावाच लागतो. प्लूटो + चवथे घर = Traumatic childhood असे समीकरण मूर्खपणा ठरेल कारण अन्य ग्रहांमुळे त्यांच्या दॄष्टींमुळे फरक पडणारच. शिवाय मी दिलेल्या केसेस अति अति टोकाच्या आहेत. मला हेदेखील माहीत नाहीच हो की त्या मुलांच्या चवथ्या घरात प्लूटो होता की नाही Happy
मी जेव्हा चवथ्या घरातील प्लूटोचे भेसूर वर्णन ऐकले तेव्हा मला या पुस्तकाची आठवण झाली. I married these 2 concepts म्हणजे पुस्तकातील वर्णन आणि ज्योतिषशास्त्राच्या साईटवर वाचलेले वर्णन.
>>children born with such planetary alignment to the Godsend, angel like parents?>> अन्य ग्रह व दॄष्टी विचारात घेता नॉर्मलही जात असेल की त्यांचे आयुष्य. अति अति निष्णात व अनुभवी ज्योतिषालाच कदाचित कळू शकत असेल की त्या व्यक्तीचे बालपण क्लेषकारक गेले होते अथवा नव्हते.
पण एकंदर प्लूटो पॉवरप्ले दर्शवितो. चवथे घर पालक-पाल्य याच्याशी संबंधित असल्याने तेथे या पॉवरप्ले चा अनुभव येउ शकतो.

सामो,
मला वाटतंय तू हा लेख
शिर्षक - चवथ्या घरातील प्लूटो
आणि ग्रुप - ज्योतिष्य, भविष्य
ऐवजी
शिर्षक - The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing
आणि ग्रुप - वाचू आनंदे असा करायला हवा होता.

लेखाची सुरवात ' काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "" पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. <- या परिच्छेदाने करायला हवी होती.

आणि त्या आधीचा सगळा ज्योतिष विषयक भाग सगळ्यात शेवटी.
===

पुस्तक परिचय चांगला आहे. आवडला.

सामो आणि हाब यांच्यातील संभाषण आवडलं. बहुतेक वेळा विकृत अत्याचारी लोकांची हिस्ट्री ही दारिद्रयाची, व्यसनी,क्रूर पालकांची असते. जक्कल सुतार केसमधील जक्कलचे वडीलांविषयीची माहिती जरूर वाचा. घोरपडीचं प्रकरण, जक्कलच्या लहान भावाला दिलेली शिक्षा.. फार भयंकर आहे.

तुला योग्य वाटत असेल तर संपादन करून बदल करू शकतेस अजूनही.
मला वाटतं हे पुस्तक, त्याची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी. पण सध्याच शिर्षक, ग्रुपमुळे बरेचजण धागा उघडूनही न बघायची शक्यता आहे.

मुलांच्या मनातील हिंसेचे काय करायचे ? हा लेख वाचला परवाच.

मला या लिखाणाचं प्रयोजन नीटसं कळलं नाही. धड ज्योतिष विषयक नाही, धड मानसशास्त्र विषयावर नाही की धड पुस्तक परीचय वाटत नाही. बराच मजकूर टंकण्याचे कष्ट घेतले आहेत. पण मला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे.

एस,
माझा अंदाज सांगते -
लेखिकेने ते पुस्तक वाचले
त्यातला कन्टेन्ट अर्थातच डिस्टरबिंग होता
मग तिने या घटनांची उत्तरं ज्योतिषात शोधायचा प्रयत्न केला (सर्वसामान्य भारतीय माणुस अशावेळी धर्म, फिलॉसॉफी, गतजन्मतील कर्म, ज्योतिष वगैरेंचा आधार घेतो तसं. हे अजूनेक नुकतच पाहिलेल उदाहरण कर्मबंध )

आता मी तिला सुचवतेय कि तू ज्या क्रमाने गेली त्याच क्रमाने लिही - आधी पुस्तकाचे नाव, त्याचा परिचय, मग उत्तर शोधायचा तू निवडलेला मार्ग.

अ‍ॅमी तुझे सजेशन चांगले आहे. पण एकंदर गैरसमज पहाता, कमी लोकांनी लेख वाचला तरी दु:ख नाही. अधिक मांडणी करुनही मला जे लिहायचे होते ते कोणापर्यंत पोचेल याची गॅरंटी वाटत नाही मला, याचे कारण माझ्या लेखनाच्या मर्यादा तसेच बर्‍याच जणांचे ज्योतिषा बद्दल विशेष वाचन नसणे. तुला मी न सांगतच कळलं की. काहींना कळेल काहींना कळणार नाही.

अण्णा नाइकांच्या मुलांचे असेच असावे.

ज्योतिष बघून समुपदेशन करणा रा समुपदेशक मला जास्त भीतिदायक वाट्तो.
पुस्तकाच्या परी क्षणाचा प्लुटोशी काही संबंध नाही. वसापिं

लेखात थोडे स्पष्टिकरण टाकलेले आहे.
पुस्तकाचा आणि ज्योतिषा चा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तो संबंध धागालेखिकेला जाणवला कारण दोन्हीतील भेसूरता. पुस्तक लेखकाचा ज्योतिषाशी काहीही संबंध नाही.

मलाही वाटलेले की डॉ. पेरी ज्योतिष बघूनच थेरपी देत होते. मेंदूला सरमिसळ करून संबंध जोडायची सवयच असते.

(२) एक कथा आहे जी मला सर्वात स्पर्शून गेली. - 'फॉर युअर ओन गुड'.३ वर्शाच्या मुलीने तिच्या आईवर रेप होताना व आईचा नंतर खून होताना पाहीला. नंतर त्या खून्याने या इवल्याशा मुलीचा गळा चिरला.तो गळा चिरताना त्याने हे शब्द वापरले की "फॉर युअर ओन गुड डूड".११ तास ही मुलगी एकटी त्या प्रेताजवळ राहीली, तिने स्वतःचे स्वतः फ्रीझमधील दूध पीण्याचा प्रयत्न केला पण गळ्यातून ते दूध बाहेर येई. ती ११ ....
>> मुलीचा गळा चिरला की तिच्या आईचा? नीट समजलं नाही. कारण मुलगी जिवंत आहे.

सर्व वाचकांचे आभार. परत पुस्तक वाचायला घेतलेले आहे कारण सर्व गोष्टी गेल्या वेळेस वाचवल्या नव्हत्या. एक बालमानसोपचारतज्ञ म्हणून पेरींची समज, त्यांचे ज्ञान तसेच इन्साईट अतोनात वाखाणण्यासारखी आहे. फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्यांची समज खरच कौतुकास्पद आहे. त्यांनी प्रत्येक केसवर घेतलेले कष्टदेखील. ज्यांना मानसशास्त्राची आवड असल्यास हे पुस्तक जरुर वाचा.

>>जक्कल सुतार केसमधील जक्कलचे वडीलांविषयीची माहिती जरूर वाचा. घोरपडीचं प्रकरण, जक्कलच्या लहान भावाला दिलेली शिक्षा.. फार भयंकर आहे.<< हे कुठं वाचता येईल?

'आय अ‍ॅम गिल्टी' - मुनवर शाह - या पुस्तकात बहुतेक.
लहानपणी मी ते पुस्तक वाचलेले आहे. आता आठवत नाही पण पुस्तकाच्या अखेर अखेरच्या प्रकरणात, जक्कल- सुतार यांच्या लहानपणासंबंधी काही वाचलेले स्मरते.

येस आयम गिल्टी पुस्तकात नाहीय. ते पुस्तक अंगावर शहारे आणतं, त्यातले परच्छेद जसेच्या तसे आठवतात मला इतक्या वर्षांनंतर सुध्दा. जक्कलच्या मित्रानं सांगितलेली स्टोरी आहे. सापडली की देतो.