खडतर आयुष्य ! तीच-२

Submitted by रिना वाढई on 17 September, 2019 - 06:59

खडतर आयुष्य ! तीच-१ https://www.maayboli.com/node/71502

तिचा कॉलेज सुरु होऊन थोडे दिवस झाले होते ,तिला एका विषयावर निबंध लिहून, ते लवकरात लवकर कॉलेज मध्ये जमा करायचं होत .
तिला एका पुस्तकाची गरज होती, तो निबंध पूर्ण करायला आणि ते पुस्तक तिच्याकडे नव्हते. "त्याच्याकडे नक्कीच ते पुस्तक असणार असं वाटून तिने त्याला फोन केला . " तो बाहेरगावी राहत होता . मला एका पुस्तकाची गरज आहे , तुझ्याकडे असेल तर देशील का आणून मला ? तिने त्याला विचारलं .
त्याच दिवशी पुस्तक आणून देणे शक्य नव्हते त्याच्यासाठी ,तरी तो "मी येण्याचा प्रयत्न करतो " म्हणत फोन ठेवला .संध्याकाळ झाली होती तरी तो आला नव्हता , आता तो नाहीच येणार हे पक्के, असं तिला मनातच वाटलं .
दुसऱ्या दिवशी ती कॉलेज मधून घरी आली , थोड्यावेळाने तो तिच्या घरी आला ,हातात तिने सांगितलेला पुस्तक घेऊन . त्याला असं पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं !
"काल वेळ नाही मिळालं का ?"
त्याने फक्त हो म्हटलं .
मग आज कस काय आलास ? ती थोडी नाराज च होती त्याच्यावर .
तुला पुस्तकाची गरज होती म्हणून . तो , ती जे विचारेल त्याचे उत्तर देऊ लागला होता .
ती कितीही नाराज असली तरी त्याच्यासमोर सगळं फिकं होत.
काहीतरीच ! खरंच मला पुस्तक आणून देण्यासाठी आलास ?कि अजून काही दुसरं काम होत ? तिने थोडी चेष्ठा करतच विचारल त्याला .
त्याला ते कळलं ,हो अजून एक काम होत माझं .
ती- मला वाटलंच होत , नाहीतर तू फक्त मला पुस्तक आणून द्यायचं म्हणून तर नाही ना येशील !
काय काम होत सांग ना ?
तुला सांगून काय करणार .. असं तिची खिल्ली उडवतच तो बोलला .
"तू म्हणतेस कि तुझं माझ्यावर प्रेम आहे , पण तू इथे राहतेस आणि मी दुसरीकडे . म्हणजे दोघेही दूरदूर राहतो , मग कोणी असं प्रेम कसं करू शकतात ?रोज बोलणं नाही ,रोज दिसणे किंवा भेटणे हि नाही , तुला थोडी अडचण नाही वाटत का ?"
तिला त्याच हे बोलणं ऐकून थोडी भीतीच वाटायला लागली होती , तिने त्याला विचारलं, का ? असं रोज भेटणे ,रोज बोलणे हे आवश्यक च असते काय रे प्रेमात ?
तू जेव्हा जेव्हा येतोस तेव्हा भेटतोच कि मला , "अजून काय हवं असत प्रेमात ?"
प्रेम आहे हे सिद्ध करायला रोजच्या भेटीगाठी नसल्या तरी एकमेकांवर विश्वास पाहिजे ,आणि तो विश्वास आहे रे माझा तुझ्यावर . मग असं का बोलतोस तू?
ती आता अजून जास्त भावुक झाली होती ."तिला काही कळायच्या आधीच त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं ". ती त्याच्या कुशीत सुखावली होती , पण हे तिच्यासाठी अवघडल्यासारखचं होत , ती त्याच्या मिठीतुन लगेच बाहेर आली . दोघे फक्त एकमेकांकडे बघतं होते .

काही दिवसांनी तो अचानक आला , यावेळेस त्याच्या येण्याचं कारण "ती " नव्हती . त्याने तिला आपल्या घरी फोन करून बोलावलं .
ती गेली ,तेव्हा कळलं कि त्याला चांगली नोकरी मिळाली आहे आणि तो २,३ दिवसात च रुजू होणार आहे . पण नोकरीच ठिकाण लांब असल्यामुळे त्याला आजच निघायचे होते . त्याच्या घरी सगळे जण त्याच्या जाण्याची तयारी करून देण्यात गुंतले होते . बॅग भरणे , त्याला तिथे गेल्यावर कामात येणाऱ्या सगळ्या वस्तू आवर्जून त्याच्या बॅग मध्ये ठेवणे आणि बरंच .
पण ती मात्र फक्त एका जागी बसून त्याला न्याहाळत होती . त्याचाही लक्ष होताच तिच्याकडे , तो उगाचच काहीतरी तिला बोलत करण्यासाठी म्हणून बोलत होता , पण ती मात्र शून्य नजरेने त्यालाच बघत होती . त्याची तयारी आता जवळ-जवळ आटोपत आली होती , तो आता थोड्या वेळाने निघणार होता . .ती मात्र काहीच बोलत नव्हती , तो आपल्यापासून लांब तर होताच ,पण आता अजूनच दूर जात असल्याने तिला दुःख झालं होत .
जाताना भेट मला , मी निघते . असं सांगून ती निघाली , त्याने तिला अजून थोडा वेळ थांबण्याचा इशारा केला पण तिला आता तिथे जास्त वेळ थांबणे अशक्य झाले होते .
ती घरी आली , तिच्या डोक्यात विचारांचा काहोळ सुरु होता , "तो तिकडे जाऊन आपल्याला विसरून तर नाही ना जाणार ? आठवण येईल का त्याला कधी आपली , कि आपणच फक्त त्याचा विचार करत राहणार ? परत तो येण्याचा दिवस अजून केव्हा उजळेल ?"असे असंख्य विचार तिच्या मनात येत होते .... तोच तोसुद्धा आला तिला bye करण्यासाठी .
त्याची नोकरी पक्की झाली हे तिला आधीच माहित झालं होत , आणि तो नोकरीसाठी बाहेर जाणार असल्याची खबर सुद्धा होती .
तिने त्याच्यासाठी आधीच छानशी भेटवस्तू तयार केलेली होती . तिने दोन भेटवस्तू तयार केले होते , त्यातलं एक - मैत्रीचं प्रतीक होत,
तर दुसरं- प्रेमाची भेट ! तो येताच त्याच्यासमोर दोन्ही भेटवस्तू ठेवत ती म्हणाली, "हे आपलं नातं ठरवणार , यामधला एक तू निवड म्हणजे मला समजणार कि तुला काय पाहिजे ... "
त्याने तिच्या अपेक्षेप्रमाणे मैत्रीचं प्रतीक स्वीकारलं होत .... तिला हे माहित होत कि त्याला आपलं प्रेम जगजाहीर करण्यात काहीच रस नाही म्हणून तो असाच वागेल . मग तिने दुसरी भेटवस्तू सुद्धा त्याला दिली , "हे ठेव , तुझ्यासाठीच आहे हे , जेव्हा तुला वाटेल कि तुझा माझ्यावर प्रेम आहे तेव्हा सांग मी इथेच असणार तुझी वाट बघत ".
त्याने ते स्वीकारले आणि तिला byeकरून निघून गेला .
दोन तीन महिने झाले तो गावी आलाच नव्हता , या काळात कधी तिला आठवण आली तर तीच स्वतः त्याला फोन करायची , message करायची आणि आपण इकडे फक्त त्याच्यासाठीच थांबलो आहोत याची जाणीवही करून द्यायची .
तो मात्र कधी समोरून तिला फोन करत नव्हता कि कुठला message सुद्धा नाही . या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्यांच्यामध्ये बराच अंतर आला होता .
होळीचा सण होता त्यामुळे तो गावी आला , पण तो गावी येणार असल्याचे तिला माहिती नव्हती.
ती आज बाहेर न जाण्याचा विचार करून घरातच बसली होती , तीच ठरलं होत कि कोणाला रंग लावायचा नाही आणि आपल्याला लावूहि द्यायचा नाही . ती दरवाज्यावर कोणीतरी आलं म्हणून दार खोलायला बाहेर आली, तोच तिच्यासमोर तो उभा होता !
पांढरा शर्ट आणि ब्लू पॅन्ट , बापरे! त्याला एकदम समोर पाहून तिच्या मनात तर धस्सsss झालं , खूप छान दिसत होता तो , पण त्याच्या कपड्यांवर किंवा चेहऱ्यावर एकही रंगाचा ठिपका नव्हता. त्याला पाहताक्षणी तिच्या मनातला तो "रंग न खेळण्याचा संकल्प कुठल्या कुठे गेला होता . " आताच याला रंगाने भरवावे असे तिच्या मनात आले . पण स्वतःवर नियंत्रण ठेवत ती त्याला आत ये म्हणाली .
"आज रंग खेळायचं सोडून इथे काय करतेस तू ? " तिच्या कोऱ्या कपड्याकडे पाहून तो बोलला .
कोणाला लावायचं रे रंग ? तू हि नव्हतास इथे , आणि येणार आहेस हे कळवलं सुद्धा नव्हत. मग !
आता आलोय ना ... आता तू लावू शकतेस मला रंग .
खरंच लावू का म्हणतच तिने गुलालात आपल्या हाताचे बोट रंगवले आणि त्याच्याकडे बघू लागली .... तोच , तो- लाव ना ग , काय एवढा विचार करतेस ?
काही नाही पण तुझे कपडे एवढे स्वच्छ आहेत कि त्यांना रंगीत करायची इच्छा नाही होत आहे ,ती त्याच्याकडे पाहतच बोलत होती . त्याने आपले दोन्ही हात खाली ठेवले आणि आपले डोळे मिटले , "तुला हवं असल्याप्रमाणे तू मला रंग लावू शकते" . आता तिला कळलं होत कि रंग कुठे लावायचा . तिने जराही विलंब न करता त्याच्या दोन्ही गालांना फासला तो रंग .
मला बाहेर जायचं आहे , उद्याचा invitation द्यायला ,आणि हो तू सुद्धा येणार आहेस ना उद्या ?.... तिचा रंग लावून झाल्यावर तो बोलला.
पण त्याचे बोलणे न कळून तिने विचारले .. कुठे जायचं आहे उद्या आणि कशाचं invitation द्यायला निघालास तू?
अ गं मला चांगली नोकरी मिळावी यासाठी घरच्यांनी काही बोलणं केलं होत म्हणे , तर तिथेच जाऊन थोड्या लोकांना जेवण द्यायचं आहे .
म्हणजे एक पूजा आणि जेवण राहणार आहे तिथे .त्याच बोलणं ऐकून आता तिला कळलं होत कशाचं invitation होत ते .
हम्म " मी कशी काय येणार पण तिथे ?" म्हणजे घरच्याना विचारून परवानगी घ्यावी लागेल आधी मला . तिने विचार करतच त्याच्या समोर प्रश्न मांडला . मी बोलतो तुझ्या घरच्यांसोबत म्हणत त्याने तिच्या येण्याची परवानगी घेतली .

बराच वेळ झाला होता , आता त्याला बाहेर जायचे होते पण हे असा चेहरा घेऊन तो नक्कीच जाणार नव्हता .
"रंग तर लावलंस तू , पण मी बाहेर कसा जाऊ असा चेहरा घेऊन , तूच लावलीस रंग तर पुसूनही तूच दे कि .. तो थोडी चेष्टा करतच तिला बोलत होता , ती आत जाऊन एक रुमाल आणली आणि त्याचे दोन्ही गाल पुसून काढले , आता जाऊ शकतोस तू म्हटल्यावर तो गेला ...तो तर गेला मात्र ती त्या रुमालाकडेच बघत होती , "आता तुला मी कधी धुणार नाही , यावर त्याच्या गालाचा रंग आहे , आणि त्या रंगामध्ये त्याचा स्पर्शसुद्धा . " ती त्या अबोल , निर्जीव रूमाल ला सांगत होती .

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेनुसार ती त्याच्यासोबत जाणार होती ,, पण बाई ची झोप म्हणजे बस्सsss .. "पहाटे पाच वाजता ची ट्रेन पकडायची असली ना तरी ती पाच ला पंधरा मिनिटे असतानाच उठणार ". आणि त्या पंधरा मिनिटात आटोपता आटोपता ती ट्रेन सुटून हि जाणार अशी तिची झोप होती .
आजही नेमकं असच झालं ! " आहे थोडा वेळ अजून" म्हणता म्हणता तिला उठायला चांगलाच उशीर झाला , कशीबशी तयारी करून ती त्याची वाट बघत बसली होती घरी,पण तो त्याच्याच कामात मग्न असल्यामुळे ,ती अजून आली नाही आहे ...याचा भान त्यालाही नव्हताच.
सगळ्या गाड्या त्यांनी केलेल्या full झाल्या होत्या . आता फक्त एकच गाडी होती ते हि त्याच्या घरच्यांसाठी . आणि आता त्याला आठवलं कि ती ! अ रे ती तर अजून आलीच नाही . पण आपण तिला कालच सांगून आलो होतो उद्या यायचं आहे म्हणून ,कशी काय आली नाही अजून हि म्हणत तो तिच्याकडे गेला .ती वाट पाहत होतीच, तो आला आणि तिला , तू आली का नाहीस लवकर ,सगळ्या गाड्या full झाल्या आता . म्हणत तीला "चल आता लवकर म्हणत बाहेर आला" , गाडी नाही तर राहू दे ना रे , जाऊन ये तू मी नाही येत अशी ती म्हणतच राहिली ,पण त्याने तीच काही ऐकलं नाही . एक आहे गाडी त्यामध्ये होऊन जाशील adjust असं सांगून तो तिला गाडी जवळ घेऊन आला , त्यामध्ये नेमक्या दोनच जागा रिकाम्या होत्या , तो बसला आणि त्याच्याबाजूलाच तिला बसायला सांगिले . तो आपल्या बाजूलाच बसला असल्याने तिला मनात ख़ुशी झाली पण अर्ध्या रस्त्यात अजून कोणीतरी यायचं होत म्हणून त्याला उतरून ती जागा दुसऱ्या व्यक्तीला द्यावी लागली . आणि तो बस पकडून गेला होता .
तिथला कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता, पूजा , जेवण सगळं एकदम उत्तमच झालं होत .
घरी यायला थोडा अंधारच पडला होता . सगळ्यांना उशीरच झाला होता , दिवे लावण्याची वेळ झाली होती . ती घरी आली आणि थकून असल्यामुळे बेडवरच पडून राहिली थोडा वेळ . बाहेर छान हवा होती , आणि तिला निसर्गातला गारवा आवडत असल्यामुळे ती बाहेर निघाली , टिमटिमणाऱ्या चांदण्या आकाशात दिसत होत्या ,आणि त्यात एकटाच तो चंद्र , हे सगळं तिला वेड लावणार वाटत होत . ती बाहेर ओट्यावर बसून एकटक त्या आकाशाकडे बघत होती . तेवढ्यातच तिला "ते काय बाहेरच बसून आहे ती . "असा आवाज कानी पडला . बहुतेक आपल्याला कोणीतरी विचारत असेल म्हणून ती उठून पाहते तर काय ? समोर तो , तोच तिच्या घरी येऊन तिच्याबद्दल विचारत होता कि कुठे आहे ती , आणि त्यावर तिच्या घरच्यांनी त्याला सांगितलं कि बाहेरच बसून आहे ती , त्या ओट्याजवळ .
तू! आता एवढ्या रात्री कसा काय आलास ? ती त्याला पाहताच विचारू लागली होती.
त्याला दुसऱ्या दिवशी परत निघायचं होत म्हणून तो रात्रीच तिला भेटायला आला होता .
"मला वाटलं थकला असेल तू , झोपशील आता लवकर आणि पाहुणे पण असेल ना तुझ्याघरी ?"ती विचारत होती त्याला .
हो . आहेत ना पाहुणे ... आणि थकलो तर खूप आहे पण उद्याच जायचं आहे मला म्हणून आता आलो तुला भेटायला .
खरंतर तो उद्या जाणार आहे हे कळताच तिला वाईट वाटलं होत , परत येताना त्याने तिला सांगितलं होत तसं . म्हणून तिला आज झोप येत नव्हती , आणि बाहेर ती त्याच्याच आठवणींमध्ये त्या चंद्राला बघत बसली होती .
"एवढ्या लवकर चाललास तू , अजून तर आपण काही बोललो पण नाही , थांब ना थोडे दिवस ती त्याला म्हणू लागली . " नाही गं जास्त सुट्ट्या नाही मिळाल्या , म्हणून जावच लागेल उद्या, तो तिला सांगत होता . तेवढ्यात ती जरा भावूकच झाली आणि त्याला अजून विचारू लागली ,
बरं . .. काही ठरवलास आपल्या नात्याबद्दल .. म्हणजे तुला काय वाटते ?
नाही गं ,अजून काहीच पक्क होत नाही आहे .
म्हणजे ? ती अवाक नजरेने त्याला विचारताच तो बोलला,
म्हणजे प्रेम करणे नाही जमणार मला , आयुष्य खूप मोठं आहे , समोर काय होणार ,काय नाही आपल्याला काहीच माहित नसते आणि आतापासून तुला कुठला शब्द देऊन , तो मोडायचा नाही आहे मला . तो आता स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करत होता .
मोडायचं म्हणजे ? का बरं असं बोलतोस तू?
तिला न राहवून त्याची गोष्ट पूर्ण व्हायच्या आतच ती बोलत होती .
मी तुला कधी त्या शब्दांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल काय ? माझं प्रेम एवढं तुच्छ नाही कि असल्या कुठल्या वचनाची , शब्दांची गरज पडेल. आता कुठे तर तो आपला आहे हा भास झाला होता तिला आणि आताच हा असा बोलतोय , समजतच नव्हतं तिला काय करावं ते . पण त्याच्या बोलण्यातून तिला कळून चुकल कि ,त्याला आता ते नातं नव्हतं होत , आणि कोणाला जबरजस्तीने नात्यात नाही गुंतवता येत हे तिला माहित होत , म्हणून तिने त्याचा निर्णय मान्य केला .
आपण चांगले मित्र राहू ग , हे बघ तुझा आयुष्य खूप सुंदर आहे , तू का घालवतेस माझ्यासाठी ?
माझ्यापेक्षा अजून चांगला व्यक्ती तुला भेटू शकतो , तो बोलत होता पण त्याचे बोलणे आता तिला ऐकू जात नव्हते .

ठीक आहे जे तुला पटतंय तू तेच कर , तू तसाच वाग माझ्याशी ,जे तुझ्या मनाला योग्य वाटेल , पण मला मात्र तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे ना ? ह्या तिच्या वाक्यामध्ये प्रश्न कमी आणि त्याच्यावरच हक्क जास्त दिसत होता , ती त्याला विचारत नव्हतीच , फक्त आपल्या मनातलं त्याला सांगत होती .
कोणी दुसरा माझ्या आयुष्यात येणार म्हणून मी तुला विसरू? हे शक्य नाही रे माझ्यासाठी .
आता तो कितीही प्रयत्न करेल तरी त्याला
माहिती होत कि ती आपल्याला विसरणार नाही च आहे , म्हणून तो पुढे बोलायचा थांबला . रात्र बरीच झाली होती , तो तिला झोपायला जाण्याचं सांगून तो हि गेला घरी ......
To be continue...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमराठी तर नाही ,पण मराठी लिहायची प्रॅक्टिस सुटली आता ...
काही मराठीच्या चुका आढळल्यास वाचकांनी कृपया माफ करावे .

तिला एका पुस्तकाची गरज होती, ते निबंध पूर्ण करायला आणि तो पुस्तक तिच्याकडे नव्हता>>>>>

लिहून झाले की एकदा वाचून बघा. चुकीचे टाईप झालेले वाचताना सहज लक्षात येते.

तुमची भाषाच अशी असेल तर मराठीत इतकी दीर्घ कथा लिहिल्याबद्दल मनापासून कौतुक. भाषा सुधारून घेतलीत तर वाचायला आवडेल. मी वरच्या वाक्यापुढे जाऊ शकले नाही.

तिला एका पुस्तकाची गरज होती, ते निबंध पूर्ण करायला आणि तो पुस्तक तिच्याकडे नव्हता>>>>>
निबंध लिहायला तिला एका पुस्तकाची गरज होती , आणि ते पुस्तक तिच्याकडे नव्हते . असं याच स्पष्टीकरण आहे .
यात काय सुधार करायचं ते अद्यापही कळले नाही . कृपया समजावून सांगा .

तो निबंध

ते पुस्तक

यात काय सुधार करायचं ते अद्यापही कळले नाही . कृपया समजावून सांगा

Rina Wadhai, रीना नाव स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे मी रीना आला, रीना गेला असे लिहू शकणार नाही. समजा मी लिहिताना असे लिहिले पण तुम्ही वाचताना ते रिना आली, रिना गेली असे समजून घेऊन वाचा असे म्हटले तर ते शक्य नाही. तुम्ही मराठी संकेतस्थळावर मराठी कथा लिहिताय तर व्याकरणाचे नियम पाळावेत ही अपेक्षा आहे. टाईपो दुर्लक्षित करता येतात पण व्याकरण नाही.

काय सुधार करायचं ते अद्यापही कळले नाही . कृपया समजावून सांगा

तिला एका पुस्तकाची गरज होती, ते निबंध पूर्ण करायला आणि तो पुस्तक तिच्याकडे नव्हता

तिला एका पुस्तकाची गरज होती, तो निबंध पूर्ण करायला आणि ते पुस्तक तिच्याकडे नव्हते

Thank you साधना ताई , मी वरील चूक सुधारली आहे . असाच प्रतिसाद देत राहा ....