सोळा आण्याच्या गोष्टी – बागुलबुवा – स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 13 September, 2019 - 07:03

‘त्या घरात कोण राहतं?’

‘कुठल्या घरात?’

‘ते गेटजवळ मोठं झाड असलेलं’

सगळी मुलं गप्प बसली.

‘तिथे जायचं नाही म्हणून आईने सांगितलंय’

‘माझ्या आईने पण’ दोघातिघांनी कल्ला केला.

‘का? घोस्ट आहे तिथे?’

‘घोस्ट नाही, बागुलबुवा आहे. लालभडक डोळ्यांचा, सुळे असलेला, लांब नखंवाला’ एक मुलगा हळूच म्हणाला.

सगळी मुलं डोळे फाडून लांबूनच त्या न दिसणाऱ्या बागुलबुवाकडे पाहायला लागली.

लाल डोळ्यांचा, सुळे असलेला, लांब नखंवाला तो बागुलबुवासुध्दा खिडकीवरच्या पडद्याआडून त्यांच्याकडेच बघत होता. तो खोलीत मागे सरकला. त्याला त्यांची भीती वाटत होती. रोज घरासमोरून जाणाऱ्या मोठ्यांचीसुध्दा वाटायची. फक्त त्याची काळजी घेणारे शामूकाका चांगले होते. बाकी सगळे मात्र – काय शब्द वापरायची आई लहानपणी?

हां.....बागुलबुवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

छान

नाही, म्युटन्ट नाही. सामान्य माणसांपेक्षा थोडी वेगळी व्यक्ती आहे....कदाचित फिजिकली....कदाचित मेंटली. पण म्हणुन तिच्याबद्दल गैरसमज पसरवले गेलेत. बाहेरच्यांच्या दृष्टीने तो बागुलबुवा. त्याच्या दृष्टीने बाकीचे जग बागुलबुवा. असं मला सांगायचं होतं

सगळ्यांचे खूप खूप आभार Happy

निकोल किडमन च्या The others

ह्याचे हिंदीत दोन डुप्लिकेट आले

एक , अमिताभ , डिंपलचा हंम कौन है

आणि संजय कपूर ,मनीषाचा अनजाने

छान

नाही, म्युटन्ट नाही. सामान्य माणसांपेक्षा थोडी वेगळी व्यक्ती आहे....कदाचित फिजिकली....कदाचित मेंटली>>>>
ओके.
लाल डोळ्यांचा, सुळे असलेला, लांब नखंवाला तो बागुलबुवासुध्दा

हे शब्दश: घेतल्यामुळे मला तस वाटलं त्यावेळी