गेंडास्वामी २० मार्चच्या रात्री आपल्या शास्त्रज्ञांना घेऊन मिसाईल टेस्ट करता चालला होता. त्याच्या जंगलातल्या अड्ड्यावर सगळीकडे अंधार झालेला होता. जे हॅलोजन बल्ब्ज रात्रंदिवस जळत असायचे ते बंद केलेले होते. फक्त मिसाईल रूम मधून लाल - पिवळ्या लुकलुकणार्या दिव्यांचा प्रकाश पडलेला होता. इतकी वर्ष मोठ्या हुशारीने त्याचा तो अड्डा त्याने सरकार आणि सैन्यापासून लपवून ठेवलेला होता. अशा जोखमीच्या वेळेस ते दिवे बंद असणे अगदी गरजेचेच होते. नाही तर त्याला भिती होती की मिसाईल टेस्ट साईट सैन्याच्या उपग्रहांना कळून आपल्या अड्ड्यावर हल्ला होईल. त्यामुळे त्याने पुरेशी खबरदारी घेतलेली होती. अखेर रात्री ७ वाजता आकाशात सुपरमून चा उदय झाला आणि त्याचा अड्डा वेगळ्याच प्रकाशात झळाळून निघाला. शास्त्रज्ञांची लगबग सुरू झाली. अजून ३ तासांमध्ये मिसाईल अवकाशात जाणे अपेक्षित होते. तोच वेळ होता की ज्यावेळेस सैन्याचा कुठलाच उपग्रह त्यांच्या जंगलावर लक्ष ठेवून नसतो. गेंडास्वामी इकडे आपल्या थिएटर मध्ये कुठले शास्त्रज्ञ आपल्याला काय तंत्रज्ञान पुरवू शकतात आणि कुणाला उचलून आणावे याची खलबतं करत होता. अखेर रात्रीचे १० वाजले आणि उलट गणना सुरू झाली - १०१,१००,९९,..., १०,९,८,७,६,५,४,३,२,१ असे म्हणत शास्त्रज्ञांनी मिसाईल सुरू केले. मोठा धूर झाला, एक छोटा फट्ट झाला आणि सगळे बंद पडले. सगळ्यांची धावाधाव झाली. गेंडास्वामी बाहेर येऊन शास्त्रज्ञांवर भडकला. मिसाईल टेस्ट फेल होण्याची ही तिसरी वेळ होती.
"यात आमची काहीच चूक नाही, बाहेरून काही घातपात झालेला दिसतोय." मुख्य शास्त्रज्ञ मुखर्जी
"अरे पण बाहेरून कसला घातपात होतोय ? या अड्ड्याचा पत्ता तर इथल्या जवळच्या लोकांना सुद्धा नाही !" गेंडास्वामी
"आम्ही पटकन बघतो, नक्की काय झालंय ते. तो छोटा आवाज कुठे तरी जवळच झाला आहे." मुशामु
" दोन सैनिक बरोबर घेऊन जा, खरंच काही घातपात असेल तर जो कोणी असेल त्याला पकडून आणा" गेंस्वा
"पटेल, तू ते दोन सैनीक घेऊन जा आणि बघ तो आवाज कुठून आलाय ते" मुशामु
पटेल दोन सैनिकांना घेऊन मिसाईलच्या बाजूने गेला. तिकडे बघतो तर काय एक छोटे विवर निर्माण झालेले होते आणि त्या विवराच्या आसपासचा सगळा भाग जळून गेला होता. त्यामुळेच त्या मिसाईलचे पण थोडे नुकसान झाले होते आणि सगळी टेस्ट बंद पडली होती. त्याने सैनिकांना जवळचे गवत पिंजून काढायला सांगितले. एक सैनिक पुढे जाताच एका झाडामागून सळसळ ऐकू आली. ती ऐकून या तिघांनी तीन बाजूंनी त्या झाडाच्या जवळजवळ जात झडप घातली. आणि समोर जे होते त्याला बघून ते तिघे आश्चर्यचकीत झाले. समोर एक विचित्र कपड्यांमधला माणूस उभा होता. त्याने पाणबुडे घालतात तसा पोशाख पण सोनेरी रंगात घातलेला होता. सैनिकांनी त्याच्यावर बंदूक रोखली आणि त्याने आपले हात वरती केले. आणि म्हणाला "मारू नका, मारू नका"
"कोण आहेस तू, आमच्या मिसाईलना काय केलेस? " पटेल
" मी इथला नाही, चुकून इथे आलेला दिसतोय. मला माफ करा. मला जाऊ द्या" सोनेरी पाणबुडा
"असे कसे जाऊ देऊ. खूप नुकसान केले आहेस. सगळी तपासणी होणार" पटेल
"नाही नाही, पटकन जाऊ द्या नाही तर खूप उशीर होईल" सोपा
" याचे काही ऐकू नका. चला रे याला घेऊन." पटेल
"मला जाऊ द्या. पटकन जाऊ द्या. अरे ... " सोपा
सैनिकांनी त्याला बंदूक दाखवली आणि तो चालायला तयार झाला. चालत चालत ते गेंडास्वामी आणि मुखर्जी होते त्या खोलीत आले. तिथे ही सगळी जनता सीसी टीव्हीवर नक्क्की काय झाले त्याचे फुटेज बघत होती. त्यांनी पाहिले की ३,२,१ होताच मिसाईल सुरू झाले पण त्याच वेळेस एक स्फोट झाला आणि तिथे विवर निर्माण झाले. आणि पुढच्याच क्षणाला हा सोपा त्या विवरात दिसून आला आणि मिसाईल बंद पडले. मुशामु ने त्याला इंग्रजीत प्रश्न विचारला तर त्याने मराठीतच आपली कहाणी सांगायला सुरूवात केली.
"मी गणरंजन शिवरंजन सहस्रबुद्धे. महाभारतातल्या महाभारत अवकाश संशोधन संस्थेत (म अ सं सं) मी एक अंतराळवीर आहे. महाचंद्राच्या दिवशी आमचा चंद्रावर स्वारीचा मानस होता. त्याकरता आम्ही एक अंतराळ वळी शोधली होती. आमच्या यंत्रांद्वारे मी त्या वळीमधून एका क्षणात चंद्रावर पोहोचणार होतो. पण यंत्रात काही तरी बिघाड झाला, की आम्ही चुकीची वळी पकडली आणि तुमच्या विश्वात आलो. बहुतेक तरी हे एक समांतर विश्व आहे. कारण आमच्या विश्वात या ठिकाणी एक मोठी मअसंसं ची इमारत आणि प्रयोगशाळा आहे. माझ्या या यंत्रात मगाशी माझ्याकडे थोडा वेळ आहे परत जायला असे दिसत होते. पण तुमच्या या पटेल ने मला ते करू न देता इकडे आणले. आता पुढची वळी कुठे कशी दिसणार ते मला शोधावे लागेल."
मुशामु ने त्याला अजून काही प्रश्न विचारले. त्यांची सगळ्यांची उत्तरे त्याने दिली. त्यावर गेंडास्वामीने त्याला एका रूम मध्ये घेऊन जाऊन त्याला काय हवे नको ते बघायला सांगितले. वर त्याला वेगळे कपडे द्या म्हणून सांगितले. तो बाहेर जाताच गेंडास्वामी मुशामु ला म्हणाला
" हे बघा, जे काय झाले ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले. त्यामुळे हा सोपा खरं बोलतो आहे की खोटं यात मला काही देणं घेणं नाही. पण याने जे तंत्रज्ञान आणलेले आहे. त्यातले आपण किती रिव्हर्स इंजीनीयर करू शकतो ते बघा. त्यातून आपल्याला काही फायदा होतो आहे का ते बघा. "
मुशामु ने होकार दिला.
इकडे सोपाला एका खोलीत आणले गेले आणि तिथे त्याला बदलायला कपडे दिले गेले. त्याने कपडे बदलताच त्याचा तो सोनेरी पोशाख मुशामुच्या प्रयोगशाळेत पाठवला गेला. पटेलला मात्र त्याच्याबद्दल कळवळा आला होता. जेवण घेऊन स्वतः पटेल आत गेला. त्याने आणि सोपाने भरपूर गप्पा मारल्या. सोपाने त्याला त्यांच्या महाभारताबद्द्लच्या गोष्टी सांगितल्या. महाभारत खरंच कसा मोठा आहे. युरोप अजुनही कसा मध्ययुगात राहिलेला आहे. महाभारत आणि अमेरिकेतील (त्यांच्याकडे सुवर्णभुमी खंड) मूळ जनता यांचे कसे चांगले जमते. युरोपातील लोक कसे या दोन खंडांकडे असूयेने बघतात हे सगळे सांगितले. त्याने आपल्या परिवाराबद्दलही सांगितले. यामुळे पटेल ची आता त्याला मदत करण्याची इच्छा अगदी बळकट झाली.
सगळीकडे गोष्टी थंडावल्यावर पटेलला आपल्याजवळ असलेल्या ट्रान्स्मिटर ची आठवण झाली. तो इकडे येताना इन्स्पेक्टर वागळे ने त्याला तो दिलेला होता. त्याने त्या ट्रान्समिटर वरून वागळे ला संदेश पाठवला. वागळे ब्रिगेडियर सूर्यदेव सिंगच्या गुप्त कक्षात बसलेला होता. त्याने तो संदेश बघताच सूर्यदेव सिंगांना बोलावले. त्याने गेंडास्वामीला पकडायची हीच सुवर्णसंधी आहे अशी खबर दिली आणि ट्रान्स्मिटर चे ठिकाण दाखवले. त्याचबरोबर संदेशही वाचून दाखवला.
सूर्यदेवसिंगला त्या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आले. त्याने पटकन हालचाल करत बेंगळुरूला फोन लावला. तिथल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची एक तुकडी मागवली. सगळ्यांनी रात्रीतच हालचाली करत गेंस्वाच्या जंगली अड्ड्याच्या दिशेने कूच केले. सुरूवातीला सूर्यदेवसिंग यांचे कमांडो पथक आणि वागळे अशी फौज त्या अड्ड्यावर जाऊन धडकली. त्यांनी आंबा बाँब वापरून सगळ्या सैनिकांना जायबंदी केले आणि ताब्यात घेतले. पुढे जाऊन मुख्य प्रयोगशाळेतून गेंडास्वामी आणि मुशामुला सुद्धा अटक केली. नंतर शास्त्रज्ञांची तुकडी आपल्या कामाला लागली. तिने पटकन सोपा आणि त्याच्या पोशा़खाचा ताबा घेतला. त्याच्या पोशाखाची यंत्रणा समजाऊन घेऊन त्यांनी आपली आकडेमोड केली. आणि त्याला एक खुश खबर सांगितली की तो आता २३ सप्टेंबर ला परत जाऊ शकतो. सोपा ला खूप आनंद झाला. त्याने पटेल, सूर्यदेवसिंग आणि वागळेंना धन्यवाद दिले. पटेल ने इस्रोच्या शास्त्रज्ञांबरोबर गेंडास्वामीच्या मिसाईल मध्ये बदल घडवून आणला आणि त्या मिसाईलला सोपाचे यंत्र बसवले. ते बसवून २३ सप्टेंबर ला नविन वळी निर्मांण होताना सोपा ला त्याचा पोशाख घालून परत पाठवले. पटेल, शास्त्रज्ञ, कमांडो आणि सगळे एकदम खुश झाले.
******
२० मार्च २०१९, गेंडास्वामी आपले मिसाईल टेस्ट करत असतो - एकदम छोटा स्फोट होतो आणि मिसाईल टेस्ट फेल होते. पटेल बघायला जातो तर त्याला एक सोनेरी पाणबुड्याच्या पोशाखामधला माणूस दिसतो. ते जवळ जातात तेव्हा पटेल ला बघून तो माणूस म्हणातो -
" पटेल, मी कुठे आलो? किती तारीख आहे आज? " पटेल म्हणतो २० मार्च.
"डॅमईट ...."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
धन्यवाद - आरएमडी, पायस, तिरंगा
जमलंय अगदी!
जमलंय अगदी!
महाचंद्राच्या दिवशी >> असे खास शब्द वाचून जीवनलाल टंडेलच्या "अंग्रेजी को मारो गोली, और हिंदी में समझो" ची आठवण झाली.
अरे शेवट जरा उलगडून सांगा.
मस्तच!!!
मस्तच!!!
छान आहे.
छान आहे.
समजली असे वाटत आहे. आता
बाय द वे. तिरंगाचे वातावरण जमले आहे. शीर्षकावरून महेश कोठारे च्या चित्रपटातील वातावरण असेल असे वाटले होते
छान
छान
छान
छान
ओहो तिरंगा बघितला नसल्याने
ओहो तिरंगा बघितला नसल्याने नीट कळाले नाही पण मजा आली वाचायला

शेवट मलादेखील कळला नव्हता पण 'आता पुन्हा सहा महिने राहावे लागणार - आणि कदाचित ही सायकल रिपीट होत राहणार' हेच असेल असे वाटते.
सगळ्यांना धन्यवाद !!
सगळ्यांना धन्यवाद !!
पायस >> जीवनलाल टंडेल

सी, फा, अॅमी >> बरोबर आहे. सायकल रिपीट झाल्याने तो डॅमइट म्हणतो. अॅट लिस्ट सहा महिने इथे परत आणि त्यातही बरोबर वळी सापडली तर ठीक