सोळा आण्याच्या गोष्टी - रहस्य - adm

Submitted by Adm on 11 September, 2019 - 13:08

लुंगी नेसून ट्रक चालवला तर दोन हजार रुपयांचा दंड !
बीडमधली ३८ वर्षांची महिला २० व्यांदा गरोदर, ११ मुलं आणि १८ नातवंडं
‘आर्ची’इतकीच सुंदर आहे तिची आई;
“वाद दीराशी आहे तर मग नवरा कशाला सोडायचा?,” सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला
तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या नवऱ्याला दोन पत्नींनी ऑफिस बाहेर दिला चोप
नौटंकीबाज कुत्रा! नखे कापताना करतो बेशुद्ध पडल्याचं नाटक
सिंगल तरुणाईची ‘लव्ह एक्स्प्रेस’, काही तासांत पूर्ण होतो ‘लाइफ पार्टनर’चा शोध
आणि.............................
.
.
.
.
.
एव्हड्या बातम्या वाचून हताश झाल्याने तो वर्तमानपत्र गुंडाळून आपल्या कामाला लागला!

(त.टी. रसिक वाचकांना ह्यातून गहन रहस्य शोधून काढण्याचे नम्र आवाहन.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला घटनाक्रम पॉईंट्लेस आहे पण ". . . ." म्हणजे आजही पेपर वाचतांना बावल मुवमेंट न झाल्याने तो कॉन्स्टिपेशनग्रस्त चेहर्‍याने आपल्या कामाला लागला.

आता मात्र हे खरे वाटायला लागले आहे… Lol
>>>>>माझ्या मते,
कथा लिहिणारे सगळे आयडी हाबचे डुप्लिकेट आयडी आहेत त्यामुळे कथांचे अर्थ हाबला आधीच माहित होते.<<<<<<

Lol Lol
===


बीडमधली ३८ वर्षांची महिला २० व्यांदा गरोदर, ११ मुलं आणि १८ नातवंडं
ही बातमी आता वाचली....

लातूरमध्ये आजही महिलांची 10-12 बाळंपतपणं
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या अन्सर वाडीत आजही महिलांची दहा ते बारा बाळंतपणं सहज होतात. या गावात गावोगावी भिक्षा मागून जीवन जगणारा गोपाळ समाज राहतो. या गोपाळ समाजामध्ये अशा असंख्य महिला आहेत की त्यांना किमान पंधरा ते वीस मुलं आहेत आणि ती हयात सुद्धा आहेत. एवढ्या मुलांची नावं काय ठेवायची म्हणून या मंडळींनी मुलांची नावं भाजी, भाकरी, गांजा, दारु, गोळी, बंदूक, सुपारी अशी ठेवली आहे.

आणि नेहमी मनात पार्श्वभूमीवर तरळत असणार विचार पुढे आलाच - कुठे त्या बायका, अन् कुठे या बायका... Life is not fair... Never!!

ह्या आज्जीने ७३ व्य वर्षी जुळ्यांना जन्म दिलाय. आता जन्म दिलाच आहे तर त्यांची लग्न होईपर्यंत आईबाप ठणठणीत राहो!!!!!
https://7news.com.au/news/health/indian-woman-gives-birth-to-twins-at-73...

कथानायक वैचारिक वा शारीरिक constipation ने ग्रस्त आहे हे ओळखलेले रहस्य बरोबर आहे असे कन्फर्म करा तरी.