सोळा आण्याच्या गोष्टी - खरा देव - दत्तात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 September, 2019 - 01:55

रविवारी लवकर जाऊन देव धरला की वरखर्च निघतो. उशिर झाल्याने पटकन सुचिर्भूत होऊन, सोवळे नेसून तो निघाला. ताम्हणात फुले,पत्री, कुंकू, नाणी, वीस, पन्नासची नोट, भंडार, खोबरं घेतलं.

एखादा दुय्यम देव पकडून, जाणा-या येणा-याला दर्शनाची गळ घालायची हेच काम.

घाईतच कार्यस्थळी पोहचला. समोरचं दृश्य पाहून जागेवरचं खिळला. तो ज्या देवळात बसायचा तिथे एका मयताचा पंचनामा चाललेला.

प्रेताच्या बाजुलाच त्याच्या हातातल्या सारखीच दोन ताम्हणे , विखुरलेली फुलं,भंडारा, नाणी, रक्ताने माखलेला दगड.

सहज देवळात पाहीले. देव जागेवर नाही. घरी येताच तापाने फणफणला.

शुध्दीवर आला तेव्हा पोलीस विचारत होते रक्ताने माखलेला दगड ओळखता का ?

दुस-या दिवशी पेपरात बातमी, पुजा-याने पुजा-याला देवाने ठेचून मारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ हर्पेन
पैसाच खरा देव. देव पकडला की पैसा मिळतो , त्यासाठी त्याच देवाला एक पुजारी दुस-याचा डोक्यात घालतो.

काशीला गेलो होते. विष्णुपदावरची दक्षिणा लुटण्यासाठी पुजारी अक्षरशः मारत होते एकमेकाला.

मन्याS, प्राचीन, अजय, हर्पेन, ॲमी, अमर९९, बिपिन, आसा खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादाबद्दल...तसा माझा शशक लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न, मोजक्या शब्दात कथा वाचकांपर्यंत पोहोचवणे खरच तारेवरची कसरत. एखादा वाढीव शब्द काढायचा तोही कथा दुर्बोध न होऊ देता आणि धक्का तंत्र सांभाळून खरच खूप कठीण असतं. धन्य ते लेखक/लेखिका जे मोजक्या शब्दात मोठा आशय वाचकांसमोर ठेवतात.

उदरनिर्वाहाचे साधन ना पुजाऱ्याचे मग तो त्याचा देव का नसेल? कोणाला पगार, नफा, व्याज महत्त्वाचे नाहीये! खाली विष्णुपदाबद्दल लिहिलंय - समस्त जनता तिथे (मी अजून कधी काशीला गेलेले नाही) किंवा कोणत्याही देवळात रुपया-दोन रुपये ते ऐपतीप्रमाणे वाहतात आणि कोट्यावधी रुपयांना लाजवेल अश्या पापांच प्रायश्चित्त विकत घ्यायचा प्रयत्न करतात. असे पैसे कोणी पोटाची खळगी भरायला वापरले तर काय चूक!
बाकी गोष्टीत पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्याला मारले असा उल्लेख कुठेच नाहीये! इतका पोचलेला पुजारी असेल तर दुसऱ्या दिवशी घटनास्थळी न जाण्याची काळजी नक्कीच घेईल आणि तापाने फणफणणार नाही Happy

मला वाटतय कि दुसर्‍याच कुठल्या तरी पुजारयाने खून केलेला आहे. कारण भांडणाच कारण
रविवारी लवकर जाऊन देव धरला की वरखर्च निघतो.
इथे असू शकत

@ राजसी
>>>>असे पैसे कोणी पोटाची खळगी भरायला वापरले तर काय चूक!
बाकी गोष्टीत पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्याला मारले असा उल्लेख कुठेच नाहीये! इतका पोचलेला पुजारी असेल तर दुसऱ्या दिवशी घटनास्थळी न जाण्याची काळजी नक्कीच घेईल आणि तापाने फणफणणार नाही>>>
पैसे वापरु शकतात सामंज्यास्याने. आळीपाळीने घ्यावेत. काशीला विष्णुपदावर एकाच वेळी ५-६ पुजारी तुटुन पडले आणि भाविंकासमोर मारामारी करु लागले. हे काय दर्शवतं. दैवता विषयीचा आदर की भाविंकासमोरची लज्जा. अर्थात दोन्ही नाही. विश्व नियंती देवता जिच्या दर्शनासाठी समस्त भाविक श्रद्धेने येतायेत त्यांना जर हे वर्तन खटकले तर ती चूक त्यांची कशी ? शशक मुळे शब्द मर्यादा पाळावी लागते. कथानक एकच दिवशी घडले आहे. जो पुजारी आजारी पडला तो सज्जन आहे. त्याला जायला उशिर होतो आणि दुसरेच दोघे अगांतूक माझा देव , माझा देव म्हणून एकमेकाला भिडले. ही
स्पर्धा सगळ्या तिर्थात आहे. आशा करतो आता तुमचे शंका निरसन व्हावे.
@ आसा तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.

धन्य ते लेखक/लेखिका जे मोजक्या शब्दात मोठा आशय वाचकांसमोर ठेवतात. >>> अनुमोदन.
चांगला प्रयत्न.

वावे, sonalist, maitreyee, राजसी, आसा, सुनिधी, BLACKCAT
तुमचे प्रतिसाद बहुमोल आहेत. धन्यवाद...