स्पंदन - राहू दे ही माझी गझल कायम अधुरी - महाश्वेता

Submitted by महाश्वेता on 8 September, 2019 - 16:03

लिहिता लिहिता थांबायले हवे कधीतरी
राहिला प्रवास तर राहू दे अधांतरी

सुखच आले वाट्यास, भोग ना नशिबी आले
पूर्ण कशी करू गझल, काहीच नाही घडले

हेवा वाटतो त्यांचा, बुडाले जे प्रेमभंगात
मीच राहिले कोरडी, सदैव रंगले अरंगात

ना सर्वांगाची काहिली, ना सोसला दाह
साधी जखमही नाही, नसे बिनकामाचा विरह

निराशेने कधी व्यापले नाही, ना आले वादळ
यशासाठी भरला पाया, सोसली थोडी कळ

काळा निळा भगवा हिरवा नाही गझलेच भांडवल
फुकटची धर्मनिरपेक्ष नाही ना कुठेही कलकल

आयुष्यात तृप्त मी, ना कशाची तहान
स्वतः केल्यात चुका, न मीच महान

मीच स्वतः मूर्ती, केली मी पूजा
देव ब्रम्ह माझ्यात, ना कोणी दुजा

त्यांनी बंद का करावे, हे दुःखाचे सोहळे
भांडवल त्यांचं हेच, फुकट दुःखाचे उमाळे

राहू दे ही माझी गझल कायम अधुरी
राहिला प्रवास तर राहू दे अधांतरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीप -
१. गझल माझा प्रांत नाही
२. मला गझलमधील ओ की ठो कळत नाही. मायबोलीवर काही मंडळींचा या क्षेत्रात अधिकार वादातीत का काहीसा आहे असे समजते.
३. गझल मध्ये मतला का काहीतरी असतं, याचा अर्थ त्यांनी हिंदीतील मत ला असा घेऊन एकही गझल आणू नये अशी माझी भाबडी आशा आहे.
४. मराठी गझलकार कितिही महान असले, तरीही गझलेची नजाकत त्या उर्दू भाषेतच आहे, आणि ती त्यातच खुलते, हे माझं स्पष्ट मत.

कहीं छत थी, दीवारो-दर थे कहीं
मिला मुझको घर का पता देर से
दिया तो बहुत ज़िन्दगी ने मुझे
मगर जो दिया वो दिया देर से

हुआ न कोई काम मामूल से
गुजारे शबों-रोज़ कुछ इस तरह
कभी चाँद चमका ग़लत वक़्त पर
कभी घर में सूरज उगा देर से

कभी रुक गये राह में बेसबब
कभी वक़्त से पहले घिर आयी शब
हुए बन्द दरवाज़े खुल-खुल के सब
जहाँ भी गया मैं गया देर से

ये सब इत्तिफ़ाक़ात का खेल है
यही है जुदाई, यही मेल है
मैं मुड़-मुड़ के देखा किया दूर तक
बनी वो ख़मोशी, सदा देर से

सजा दिन भी रौशन हुई रात भी
भरे जाम लगराई बरसात भी
रहे साथ कुछ ऐसे हालात भी
जो होना था जल्दी हुआ देर से

भटकती रही यूँ ही हर बन्दगी
मिली न कहीं से कोई रौशनी
छुपा था कहीं भीड़ में आदमी
हुआ मुझमें रौशन ख़ुदा देर से

अशी नजाकत, सहजपणा आणि depth ज्यादिवशी मराठी गझलकार आणतील त्यादिवशी मी नक्की त्यांची चाहती होईन.

महाश्वेता, तुमचे स्पष्ट मत मांडणे आवडले. ( तुम्ही लिहिलेली गझल नाही. एक छान कविता आहे.)

मराठीत सुद्धा काही उत्तमोत्तम गझला आहेत ज्या कदाचित तुम्हाला आवडतील, असे वाटते.

ही त्यातली एक. Happy
____________

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

- सुरेश भट

Internet साभार!

भरत, होते. Happy
माझी प्रतिक्रिया वाचक म्हणून आहे.
चिंता करू नका.
कुठलाही पक्षपात संयोजक होऊ देणार नाहीत स्पर्धकांसोबत. Happy

मी फक्त तुम्ही संयोजक मंडळात आहात् का एवढंच विचारलंय.

तुम्ही संयोजक मंडळासाठी नाव दिल्याचं पाहिलं होतं. पण https://www.maayboli.com/user/313 इथे दिलेली संयोजकांची नावं आणि तुमचं सदस्यनाम वेगळं दिसलं , म्हणून विचारलं. दोन्ही एकच आहेत का, एवढंच विचारायचं होतं.

दोन्ही एकच आहेत का>>>>हो.

Submitted by मी_मधुरा on 9 September, 2019 - 10:03>>> जर दोन्ही एकच आहेत तर तुम्ही संयोजक कसे नाही Uhoh अजूनही तुमचे नाव तिकडे आहे, मग नक्की काय म्हणायचे ??

वेळ आल्यावर कळेलच. सद्ध्या, स्पर्धेत आलेले साहित्य वाचून घ्या. साहित्यकारांनी उत्तम लेखन केलेले आहे. त्या धाग्यांवर केवळ त्या लेखनाबद्दल प्रतिसाद यावेत अशी लेखकाची अपेक्षा असते. त्यात त्यांनी वेळ दिलेला असतो, चिंतन केलेले असते. त्यामुळे आपण त्यांचा मान राखू. या चर्चेला पूर्ण विराम देऊ. Happy

माझी प्रतिक्रिया वाचक म्हणून आहे.
चिंता करू नका.
कुठलाही पक्षपात संयोजक होऊ देणार नाहीत स्पर्धकांसोबत. Happy

Submitted by मी_मधुरा on 9 September, 2019 - 10:32>>> मुळात ही कमेंट् हास्यास्पद आहे, असो, एकाच वेळी असणे आणि नसणे म्हणजे काय हे कळायची वेळ यायची वाटच बघावी लागेल आता Wink

मुळात ही कमेंट् हास्यास्पद आहे>>>> हसून घ्या. आणि इथे प्रतिसाद देणे थांबवा जमल्यास. हा धागा वेगळ्या विषयावर आहे. बघा कळाले तर.

वेमाना थोदीशी बिनती कलायची म्हनतु,
पुदल्या वलषी 'मायबोली गणेशोत्सव २०२० साठी स्वयंसेवक हवेत' अशा धागा न कालता, या वलषी जेवले न्याणी (?) लोक, पलतेक धाग्यावल, काय ती एक्सपलट कमेन्ट (?) ताकत हायेत ना. त्या शमद्या मंदलीचा मान थेऊन, त्ते शमदे मिलवुन एक शंयोजन मंदल कादावे.
आमच्या फुल शपोर्ट हाये.

जे खलोखलच एक्सपलट शल्ले देत हाहेत, 'जेनुन का काय त्त्ते बोलत्त्यात', तेनची सपशेल माफी मगतु. तेन्नी आजाबात वाईत वातुन घेऊ नये. Bw

बघा कळाले तर.

नवीन Submitted by मी_मधुरा on 9 September, 2019 - 15:30">> अरे असे कसे, सगळी अक्कल का ज्ञान का काय ते सगळे तुमचेकडेच आहे नाही का

पुढच्या वर्षीमायबोली गणेशोत्सव होईल की त्याचा ही मायबोलीचा व वी होईल काय माहीत?
ह्या वर्षी काही उपक्रम बरे आहेत पण काही संयोजक खूपच उद्धट आहेत, हेमावैम

धन्यवाद समाधि.
पण समोरच्याला उद्धट म्हणणारा स्वतः नम्र कश्यावरून?
असो. तुम्हाला कळालं असतं तर विषय सोडला असतात एव्हाना.
बाकी मी या धाग्याची रजा घेते.

महाश्वेता, उत्तम कविता आहे. लिहित रहा. Happy

मिधिरा Lol

,फारच बुवा तुम्ही विनोदी. तुम्ही तरी वेगळ्या कुठेय, राहवले होते का उत्तर दिल्याशिवाय. मग तुम्हाला तरी काय कळले ?? कळले असते तर योग्य वेळीच घेतला असता की निरोप तुम्ही

अरे हो, ते समाधी चे समाधि जसे झाले तसेच मधुरा चे मिधिरा झाले, मुद्दाम नाही हा केले

मी कुठल्याही प्रतिसादाला उत्तर देणार नव्हते, स्पर्धा संपेपर्यंत. आता देते.
@समाधी - दुसरीकडे नाच, इथे नको.
@मधुरा - धन्यवाद. पण काय आहे, मराठी गजल आवडत नाही असं म्हटल्यावर ९०% लोक हेच उदाहरण देतात. Lol
तुम्ही संयोजक मंडळात असतात, तर मला आनंद झाला असता, पण निष्पक्ष संयोजक मंडळ? पद्म सर धाग्यावर कथा आवडली नाही म्हणून प्रतिक्रिया देत सुटतायेत, आणि निष्पक्ष? पण हो, मी एक स्पर्धक जरूर आहे, आणि माझी गजल ही गजलच आहे, कविता नाही. तिला कुणाचे नियम फॉलो करण्याची गरज नाही, किंबहुना कोणत्या महान गजलकारने हे मराठी नियम बनवले, किंवा मान्यता दिली. जिथे आधीच सर्व खेळखंडोबा, त्यात स्वतःचे नियम बनवायचे, आणि तेच मूळ म्हणून खपवायचं.
ये ना चोलबे!

मी परीक्षण करतच नाहीये. त्यामुळे माझा प्रतिसाद संयोजक म्हणून नाही की परीक्षक म्हणूनही नाही.

गझल नियमबद्धच असते. हिंदी असो वा मराठी. सुरेश भटांची असो वा गुलजारांची!

बाकी तुम्हाला या रचनेला जे म्हणायचे आहे ते म्हणू शकता. पण ती गझल नक्कीच नाहीये.
साहित्यकारानेच साहित्यप्रकाराचा अपमान केला तर बाकीच्यांनी काय करावे?

मी माझ्या एका धाग्यावर दिलेल्या प्रतिसादावर तुम्ही आक्षेप नोंदवला होतात आणि सरळ ' लिहू नकोस असे प्रतिसाद देणार असशील तर' असे काहीसे लिहिले होतेत. मग जर 'एखादा साहित्यप्रकार आवडतच नसेल तर तो का हाताळावा?' असा प्रश्न मला तुमची ही रचना पाहून पडला आहे.

असो. मला तुमचे स्पष्ट लिहिणे आवडते, Happy पण गझलेबद्दलचे मत पटले नाही. Sad

@समाधी - दुसरीकडे नाच, इथे नको.>>> तुझी असेल नाचीगिरी, तूच नाच
जसे नेहमी नाचतेस

९ तारखेची कमेंट् तुला आज झोम्बणे साहजिकच होती

मधुरा आपल्या विचारांमध्ये कितीही फरक असू दे, एक व्यक्ती म्हणून आय रियली लाईक यु. <3
आणि त्या प्रतिसादाबद्दल सॉरी! खरंच मनापासून. तू लिहिणं सोडू नकोस मात्र!

मधुरा आपल्या विचारांमध्ये कितीही फरक असू दे, एक व्यक्ती म्हणून आय रियली लाईक यु. <3 >>>>>> सेम पिंच! Happy मला हा भिडस्त पणा खूप आवडतो तुमचा!

आणि त्या प्रतिसादाबद्दल सॉरी! खरंच मनापासून. तू लिहिणं सोडू नकोस मात्र!>>>> नाही सोडणार! Happy Happy