स्पंदन- गझलेस माझ्या दाम नाही- हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 8 September, 2019 - 08:54

संयोजकांना काम नाही
स्पर्धकांना आराम नाही

डोके उठले प्रतिसादांनी
घरात आज का बाम नाही

आयडी घेतले चारदोन
एकच असे मला नाम नाही

सगळेच येथे रंगलेले
कोणीच भोळा साम नाही

लिहीली जरी मेहनतीने
गझलेस माझ्या दाम नाही

मात्रा- १६
वृत्त- रंगलेलं Proud

[साम= सांब= शिवशंकर]

टिप-
अ) संयोजकांना दुखावण्याचा बिल्कुल हेतू नाही.
आ) आजवरच्या जगभरातील सर्व गझलकारांची सपशेल माफी मागून.

_हाडळीचा आशिक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users