Submitted by स्वप्ना_राज on 8 September, 2019 - 03:43
सकाळपासूनच त्याला अस्वस्थ वाटत होतं. कश्यात लक्ष लागत नव्हतं. वैदेहीचा चेहेरा सारखा डोळ्यांसमोर येत होता. किती वर्षं झाली तिला बघून. कुठे असेल? कशी असेल? आपली आठवण काढत असेल का कधी?
तो ऑफिसलाही गेला नाही. पण घरात एकटं काय करणार? शॉपिंग केलं. पिक्चर पाहिला. काही उपयोग नाही. संध्याकाळी बेचैनी वाढली.
‘विदू, आय लव्ह यू. आय मिस यू’ तो हलकेच म्हणाला.
आणि अचानक त्याला खूप शांत वाटलं. बकुळीचा सुवास जवळच दरवळून गेला. त्याने आसपास पाहिलं. कोणी नव्हतं.
वैदेही एकटक त्याच्याकडे पहात होती. ‘आय विल ऑलवेज लव्ह यू, नचिकेत’
नकळत त्याच्या ओठांवर ओळी आल्या – बेवजह बेकरार रहते थे, बेवजह आज फिर करार आया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Chhan
Chhan
हम्मम... वैदेही कायमची आली
हम्मम... वैदेही कायमची आली परत, त्याला नकळत?
सुंदर गोष्ट...
आत्मा आला
आत्मा आला
हो, बरोबर.
हो, बरोबर.
मस्त
मस्त
छान.
छान.
सो कोल्ड सोडून गेलेल्या
सो कोल्ड सोडून गेलेल्या लोकांचं सो कोल्ड परत येणं!
मुव ऑन होणं का जमत नाही.
आणि 99 टक्के वेळा सोडून गेलेली व्यक्ती परत येणार नसते, पण त्यातच अडकून पडतो.
मस्त स्वप्ना. जमलीये.
मस्त स्वप्ना. जमलीये.
तुझ्या सगळ्याच कथा भारी जमल्यात आताच्या.
मुव ऑन होणं का जमत नाही. --
मुव ऑन होणं का जमत नाही. ---move on होतातच, काळ काही कोणासाठी थांबत नाही पण असा एखादा दिवस, एखादा क्षण येतो आयुष्यात!
आज फिर दिल ने तमन्ना की
आज फिर दिल ने तमन्ना की
आज फिर दिल को हमने समझाया
BLACKCAT बरोबर.
BLACKCAT बरोबर. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! वैदेही आणि नचिकेत दोघांना प्रेम असूनही वेगळं व्हावं लागलं. नंतर काही संपर्क उरला नाही. आजच्या युगात संपर्क नसणं अशक्य वाटतंय पण सोशल मिडियावर अॅक्टिव्ह नसाल तर शक्य आहे. दोघं एकमेकांना विसरलेले नाहीत. अचानक एक दिवस नचिकेतला अस्वस्थ वाटतं. वैदेही आजारी आहे किंवा तिच्या जीवाला धोका आहे म्हणून आपल्याला असं होतंय हे त्याच्या लक्षात येत नाही म्हणून तो बेवजह बेकरार. दुर्दैवाने वैदेहीचा मृत्यू झाला. त्याला एकदा बघायची तिची इच्छा होती त्यामुळे भेटणं शक्य नसलं तरी तिचा आत्मा त्याच्याकडे आला. तिच्या अदृश्य का होईना पण आसपास असल्याने त्याला शांत वाटलं. पण त्याला ती दिसत नाही, त्यामुळे ह्या मनःशांतीचं कारण समजलं नाही म्हणून 'बेवजह आज फिर करार आया' ह्या ओळी.
>>सो कोल्ड सोडून गेलेल्या लोकांचं सो कोल्ड परत येणं! मुव ऑन होणं का जमत नाही
अहो, व्यक्ती तितक्या प्रकृती. मुव्ह ऑन होऊ शकतो की नाही हे प्रेम दोघांचं होतं का एकतर्फी, प्रेमाची intensity काय होती, दोघांचे स्वभाव, कोणत्या परिस्थितीत वेगळं व्हावं लागलं अश्या अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. एकच नियम सगळ्यांना कसा लावणार? देवदास टाईप्स झुरणारं प्रेम मला स्वतःलाही कैच्या कै च वाटतं. पण समरसून प्रेम केलं असेल तर एखाद्या हळव्या क्षणी खूप आठवण येऊ शकतेच की.
>>move on होतातच, काळ काही कोणासाठी थांबत नाही पण असा एखादा दिवस, एखादा क्षण येतो आयुष्यात!
अगदी अगदी.
लिबास ह्या चित्रपटातल्या 'फिर किसी शाखने फेकी छांव' ह्या सुंदर गाण्यातल्या ह्या ओळी आहेत. ऐकलं नसेल तर जरूर ऐका हे गाणं.
साधना, शाली, अॅमी,महाश्वेता, सस्मित, राजसी, मी अश्विनी धन्यवाद!
मुव ऑन होणं का जमत नाही. --
मुव ऑन होणं का जमत नाही. ---move on होतातच, काळ काही कोणासाठी थांबत नाही पण असा एखादा दिवस, एखादा क्षण येतो आयुष्यात!
Submitted by राजसी on 9 September, 2019 - 10:57
आज फिर दिल ने तमन्ना की
आज फिर दिल को हमने समझाया
नवीन Submitted by मी अश्विनी on 9 September, 2019 - 12:30">>>>
दोघींना +११११११
सुंदर लिहीलस.. एखाद्या
सुंदर लिहीलस.. एखाद्या व्यक्तीची तीव्र अचानक आठवण यावी, जुने सुगंधी दिवस आठवावेत, बेचैन व्हावे अन ती व्यक्ती मागेच निवर्तल्याचे कळावे असे होते, तेव्हा वाटते की हे कनेक्शन कुठले ??
खूप तरल गोष्ट
खूप तरल गोष्ट
ज्याला ती रिलेट होईल त्याला ती खोलवर उतरेल
फिर करार आ जायेगा
खुप मस्त !!
खुप मस्त !!
उत्तम
उत्तम
छान आहे, पण लेखिकेचं डीटेल्ड
छान आहे, पण लेखिकेचं डीटेल्ड स्पष्टीकरण वाचल्यावरच समजली. खूप तरल, रोमँटीक लिहिलंय.
सुंदर गाण्याची आठवण करून
सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
वाचल्यापासून हेच गाणे मनात रुंजी घालतय.
त्यामुळेच कथा आवडली हे लिहाय्चे राहून गेले होते.
काही ठिकाणी टेलीपथी नक्कीच
काही ठिकाणी टेलीपथी नक्कीच काम करत असावी. छान आहे कथा.
मस्त झाली आहे कथा.
मस्त झाली आहे गोष्ट.
छान
छान
सुंदर!
सुंदर!
छान
छान
मस्त जमलेय
मस्त जमलेय
छान!!
छान!!