सोळा आण्यांची गोष्ट - धाव - बोकलत

Submitted by बोकलत on 6 September, 2019 - 02:59

मी धावत होतो, जिवाच्या आकांताने. धाप लागली होती, श्वास फुलला होता, पायात गोळे आले होते, धडधडणारं हृदय कधीही छाती फोडेल असं वाटत होतं, पण मला कशाचंही भान न्हवतं, कशाचीही पर्वा न्हवती. ते माझा पाठलाग करत होते. ते किती आहेत, कुठे आहेत, किती जवळ आलेत हे वळून पाहायलाही उसंत न्हवती. क्षण आणि क्षण मोलाचा होता. त्यांची राकट देहबोली, नजरेतला दाह सारं काही मी पाहिलं होतं. त्यांनी मला गाठलं तर सारं काही संपणार होतं.
माझ्या अवघ्या सहा महिन्याच्या मुलीचा चेहरा माझ्यारामोर तरळून गेला आणि मी माझा धावण्याचा वेग वाढवला.
पण......... शेवटी त्यांनी मला गाठलंच.
सारं काही संपलं.
मी सुवर्ण पदक जिंकलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बोकलत भाऊ अमानवीय धाग्यावर उलट सुलट लिहिण्यापेक्षा असेच नवीन लेखन करत जा. तिकडे फिरकत जाऊ नका. फार हास्यास्पद झालाय अमानवीय धागा.‌ कुणालाही भुतांची भीती वाटेनाशी झाली आहे.

सगळ्यांचे धन्यवाद. @गोल्डफिश , ते शर्यत संपल्यावर नाही का जिंकणारा तिथेच बाजूला जाऊन आपल्या देशाच्या लोकांसोबत आनंद व्यक्त करतो आणि बाकीचे पुढे निघून जातात. तसं झालं.

तो तसाच पळत सुटला

मग संयोजक पदक घेऊन मागे लागले.

मग त्याला गाठले व पदक दिले

कडक!!

Mast:)

हा हा Lol
BLACKCAT चा प्रतिसादपण आवडला.

Chhan.

मस्तच
@बोकलत..मी अमानवीय धाग्यावर म्हटले होते की तुमचे लिखाण छान आहे...विनोदी तर मस्तच...इकडेच असे चांगले लिहीत रहा .. कशाला तिकडे लिहून ओरडून घेता