सोळा आण्याच्या गोष्टी - संयोजक - बोकलत

Submitted by बोकलत on 5 September, 2019 - 06:14

गेले काही दिवस वातावरण खूपच ढगाळ होतं. दरसालाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवाचा उत्साह पार शिगेला पोहचला होता. नाविन्यपूर्ण स्पर्धांनी ते संकेतस्थळ व्यापलं होतं. स्पर्धकांमध्ये सुरु असलेली चढाओढ वाखण्याजोगी होती, परंतु स्पर्धांचा विजेता हा पारंपरिक मतदान पद्धतीने न निवडता खुद्द संयोजक निवडणार होते. संयोजकांच्या या निर्णयामुळे स्पर्धकांत मतभेद होते. अनेकांनी संयोजकांवर टीका केली होती तर काहींनी स्वागत. गणपती गावी गेले, स्पर्धा संपल्या आणि विजेतेही घोषित झाले. ढगाळ वातावरण निवळून लख्ख सूर्यप्रकाश पृथ्वीवर पसरला.

काही दिवसांपूर्वी........
सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, उद्यापासून स्पर्धांना सुरवात होईल, परंतु विजेते हे ठरल्याप्रमाणे तेच झाले पाहिजेत, नाहीतर पृथ्वीचा विनाश अटळ आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्याला हे पाऊल उचललंच पाहिजे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>> सोळा आण्याच्या गोष्टी - प्रचंड एंट्री आहेत. कॉपी पेस्ट करून दमले. तुम्हीच तुमच्या पहिल्या तीन विजेत्या कथा ठरवा

पृथ्वीचा विनाश अटळ आहे.. ते कसा काय कळलं नाही ब्वा!! जरा विस्कटुन सांगा कुणीतरी.. >>>>> Rofl पृथ्वी नावाचा आय डी असेल संयोजकात.