(समस्त महाराष्ट्रीय, लोककलेचा पारंपारिक वारसा जपणारे कलाकार व समस्त देवी देवतांची क्षमा मागून)
बाई, उदे ग लोकशाही ... उदे उदे ग लोकशाही
उदे उदे उदे उदे
आम्ही गोंधळी गोंधळी
दिल्लीचे गोंधळी .. हो .. दिल्लीचे गोंधळी
राजकारणे, सत्तेकारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
एका धोरणे, खुर्चीकारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
एका ’हाती’ ’घडी’ दुज्याची ... गोंधळ मांडला
चर्चा घुसळी, युती कुणाची ... गोंधळ मांडला
उशीस सवती, मांडीस नवती ... गोंधळ मांडला
घरात गळती, बाहेर चलती ... गोंधळ मांडला
लेकाकारणे, लेकीकारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
पिढ्याघराणे, खाजकारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
पहिली, दुसरी, तिसरी आघाडी... गोंधळ मांडला
आयजी रगडी, बायजीची खिचडी... गोंधळ मांडला
डाव्यात नसता, उजवी क्षमता... गोंधळ मांडला
माया, ममता, फोडणीस समता... गोंधळ मांडला
'ताज'कारणे, एकीकारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
नोटाचारणे, वोटाकारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
साठी सरली, हौस न फिटली ... गोंधळ मांडला
बंड कपाळी , अपक्ष टिकली ... गोंधळ मांडला
नामे जाहीर, शिळाच मस्का ... गोंधळ मांडला
अभि’नेत्या’तील, नेत्यास चस्का ... गोंधळ मांडला
नवे लोढणे, विनाकारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
जुने गार्हाणे, कशा कारणे ... गोंधळ मांडला
गोधळ मांडला नि लोकहो गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
दिल्लीचे गोंधळी .. हो .. दिल्लीचे गोंधळी
उदे उदे उदे उदे
(हा गोंधळ इथे मावणारा नाही. कारण लिहावं तेवढं कमीच. इतर मान्यवर माबोकर लिहीत आहेतच. समस्त माबोकरांनी ह्या गोंधळाला यावे ही नम्र विनंती.)
कल्लास रे
कल्लास रे
अतुल्-अजय च्या चालीत एकदम फीट्ट
सद्य परीस्थीती खरच वाईट
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सहि...
सहि...:) मार्मिक आणि झकास
जबरदस्त.
जबरदस्त. निवडणुकीच्या प्रचारासाठी लावायला पाहिजे; लोकांनीच.
व्वा !
व्वा ! सद्यस्थितीवर अगदी मार्मिक फटका ! उमेश अनुमोदन !
कौतुक,
कौतुक, तुझ्या "रायगडाच्या पोवाड्यानंतर अंतर्बाह्य" पेटवणारा हा गोंधळ.
अप्रतिम !!
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
छान.
छान. विडंबन आवडले.
विडंबना
विडंबना पेक्षा हे लोकगिताच्या धरतिवर एक जोरदार फटका आहे... मस्त रे!!
मला आव..ले.
मला आव..ले.
मस्तच!
मस्तच! सत्या ला सहमत आहे मी.
मस्त. जयदीप
मस्त.
जयदीप ओक
**********
इथे बघा :- माझे लेखाटन
एकदम
एकदम झक्कास....
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....