पर्वाची गोष्ट आहे

Submitted by avi.appa on 30 August, 2019 - 12:33

पर्वाची गोष्ट आहे

अविनाशकुलकर्णी
पर्वाची गोष्ट आहे
सायंकाळचा समय होता मी व हिने चितळ्यांच्या दुकानात खरेदी केली
चितळे दुकाना समोर नूर भाई भाजीवाल्याचा ठेला आहे
नुरभाई भाजी वाल्याकडून भाजी घेतली
जवळच रिक्षा होती रिक्षा केली व घरी यायला निघालो
वेळ संध्याकाळची डेक्कन वर मरणाची गर्दी
लकडी पूल सिग्नल ला रीक्षा थांबली होती
तेव्हढ्यात मोग-याचे गजरे विकणारी मुले रिक्षा जवळ आली
मोग-याचे गजरे म्हणजे जीव कि प्राण
कसे दिले ?
१० ला एक
४० ला ६ दे -हि म्हणाली
५ देईन -गजरे वाला मुलगा
ठीक आहे दे -त्याने ५ गजरे हिच्या कडे दिले
हिने गजरे सुंगले व माझ्याकडे दिले अन पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला
तेव्हढ्यात सिग्नल सुटला व रिक्षावाल्याने रिक्षा वेगाने दामटली
अहो त्या मुलाचे पैसे द्यायचे राहिले रिक्षा वळवता का ?
हि म्हणेस्तोवर रिक्षा लकडी पुलाच्या मध्यावर आली होती
रिक्षा वळवणे शक्य नसल्याने आम्ही समजून घेतले
घरी आलो हि हूश्श्स्य करत सोफ्यावर बसली
मी स्कुटर ची चावी घेतली अन स्यांडल पायात सरकवत बाहेर जायला निघालो
कुठे निघालास ?
त्या मुलाला पैसे द्यायला
एव्हढी दगदग करायची गरज नाही -उद्या पर्वा त्या बाजूला जाणार त्या वेळी दे ती मुले तिथेच असतात
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी ल्याच ची मूठ फीरवत असताना " तू कधी ऐकतोस का कुणाचं ? मनमानी करायची जुनी खोड आहे " असे काहीतरी पुटपुटली
वीर सावरकर पुळ्याला वळसा घालत चौकात आलो मुले शोधली अन त्याला पैसे दिले
माझं आयुष्य एम आय डी सी त गेले
सुखासीन आयुष्य जगणा-या वर्गाला "हातावरचे पोट " म्हणजे नसते
कारख्यान्या त असताना -शटर रिपेर करणारे त्याला ग्रीज ऑइल करणारे --छत गळत असेल तर वर चढून सिमेंट पत्र्यावर डामरी शिट चिकटवणारे - कार पुसणारे - खिडकीची काच बसवणारे -मशीन साफ करणारे मुले येत असत
दिवसभर एम आय डी सी हिंडत काम शोधणे मिळालेली मजुरी घेत सायंकाळी घरी जाणे -मग झोपडीत रॉकेल भाजी वाणी सामान येत असे व चूल धडधडत असे
आमचा कामगार म्हणत असे "चूल बंद की अक्कल बंद "
हे दयाघना प्रत्येक घरातली चूल पेटती ठेव हीच पार्थना

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्पा, भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीच्या १२ ला एक तास आणि ४५ मिनिटे बाकी आहेत. माबोवर एका दिवसात जास्तीतजास्त धागे काढण्याच्या नव्या विक्रमला अनेक शुभेच्छा.
( आतल्या मटेरिअलचं शुद्धलेखन, द्विरुक्ती वगैरे जाऊद्या; उद्या वेळ मिळेल तसं दुरुस्त करालच तुम्ही. )

हे लेखन चांगलं आहे, पण लिखाणात किती चूका? पोस्ट करायच्या आधी एकदा तपासत नाही का? द्विरुक्ती असते, शब्द गाळलेले असतात ( जे वाचकांनी समजून घ्यायचे असतात), punctuation तर नाहीच. बाकी शुद्धलेखनाच्या चुकांवर मला बोलण्याचा अधिकार नाही, पण त्या माझ्या सुद्धा डोळ्यांवर येतात इतक्या जास्त असतात.

थोडं कमी लिहिलं तरी चालेल, पण लिहिलं आहे ते परत एकदा तपासून मग प्रकाशित करा. बाकी लेखनासाठी शुभेच्छा.

जिद्दू
अहो त्यांचा काही संकल्प नवस वगैरे असेल गणपतीला केलेला
की माझे अमुक अमुक काम झाले की पुढल्या गणपतीला २१ आप्प्यांचा नैवेद्य ( अप्पाने काढलेले २१ मायबोली धागे) गणपतीला अर्पण करेन म्हणून ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करायला लागली असणार ....
शुद्ध लेखन मत देखो
भावनाओ को समझो Lol

छान!,
अन म्हत्वाचे म्हणजे, कुणी कितीहि ट्रोल केले तरी पुर्ण दुर्ल़क्ष करुन लिहीणे चालुच आहे, पण खरेच पोस्ट करण्या अगोदर एकदा वाचुन चुका दुरुस्त करा. अन ज्या आधीच पोस्ट केल्या आहेत त्या संपादन करुन त्यातील चुकाही दुरुस्त करा, अन हो लगेच करा कारण संपादनासाठी फक्त ३० दिवस असतात

पुलेशु Happy