शरद पवार

Submitted by avi.appa on 30 August, 2019 - 12:26

माझं एम आय डी सी भोसरी मध्ये लघु उद्योग युनिट होते
साल नेमके आठवत नाही
पण कै विशवनाथ प्र सिंग हे त्या काळात प्रधान मंत्री होते
एके दिवशी बातमी आली की सिंग सरकारने लेबर चार्जेस कारणा-या कारखान्या ना पण एक्ससाईज ड्युटी लागू केली आहे
हि बातमी समजतात आम्हा उद्योजकांच्या पोटात गोळा उभा राहिला
पोस्ट समजण्या साठी लेबर चार्जेस म्हणजे काय ते समजावून घेणे आवश्यक आहे
उद्योजकांची २ प्रकारात वर्गवारी होते
१- म्यानुफ्याक्चरर म्हणजे स्वताचे प्रोडक्त्त असणारे
म्यानुफ्याक्चरर कडे स्वताचे प्रोडक्त्त असते ते कच्चा माल विकत घेतात व वस्तू तयार करून त्याचे मार्केटिंग करतात व बाजारात विकतात
म्यानुफ्याक्चरर ना सेल्स टॅक्स एक्ससाईज ड्युटी आदी कर लागू असतात
अश्या म्यानुफ्याक्चरर ची संख्या नगण्य असते म्हणजे ४-५% साधारण असते /असावी
२- साधारण ९५% उजयोजक लेबर चार्जेस वर काम करत असतात
लेबर चार्जेस म्हणजे ते टाटा बजाज आदी कंपन्यांची कामे करत असतात
कम्पनी त्यांना मटेरियल देते व ते दिलेल्या ड्रॉईंग नुसार वस्तू बनवत असतात
यांचा टर्न ओव्हर (उलाढाल) लाखोंच्या घरात असते
या उद्योजकांना सेल्स ट्याक्स एक्ससाईज ड्युटी आदी लागू नसते
सरकारी फतव्या मुळे सर्व कारखान दारांना एक्ससाईज ड्युटी लागू होणार होती
त्या मुळे सर्व उद्यजकांचे धाबे दणाणले
मुद्दा एक्ससाईज ड्युटी भरण्याचा नव्हता कारण उद्योजक एक्ससाईज ड्युटी आपल्या खिशातून भारत नसतो तर तो ग्राहकाला ती आकारात असतो व त्याचा भरणा सरकारी तिजोरी त करत असतो
पण हा कायदा खुप कडक होता / आहे
शिवाय रोजचे रजिस्टर ठेवा महिन्याला स्टेटमेन्ट व भरणा करा आदी खूप क्लिष्ट व किचकट बाबी होत्या
त्यात जरा चूक झाली की नॉन बेलेबल वोरण्ट
किर्लोस्कर सारख्या दिग्ग्ज उद्योजकांना यांनीदिवस चौकीत डाम्बले होते
तर छोट्या उद्योजकांची हे काय तमा बाळगणार
शिवाय इन्स्पेकटर आला कि त्याची सरबराई पाकीट हा पण एक ताप असे
या सा-या मुळे आमचे धाबे दणाणले होते
आम्हा उद्योजकांची एक स्मॉल स्केल असोसिएशन होती
त्याचा अध्यक्ष इथापे वा बगाडे असे कुणीतरी होते नेमके नाव आठवत नाही
असोशियन चे सदस्य अध्यक्ष - सदस्यांचे शिष्ट मंडळ श्री पवार सरांना भेटायला गेले आहे अशी कुणकुण आम्हाला लागली
चर्चा गुप्त स्वरूपाची असल्याने नेमकी चर्चा काय झाली ते माहीत नाही
मात्र उद्यजकांनी ह्या कायद्याच्या निषेध म्हणून एक दिवस कारखाना बंद ठेवायचा आणि सायंकाळी ७ वाजता श्री पवार साहेब न्यू इंग्लिश शाळेत मालक वर्गाच्या अडचडी समजावून घेणे व पुढची रणनीती यावर मार्गदर्शन करणार असा आदेश आला .
ठरल्या प्रमाणे कडकडीत बंद पाळण्यात आला
रोज ज्या कारखान्यात २४ तास यंत्रे काम करत असत ते थंडावले होते
सा-या एम आय डी सी त शांतता होती
सा-यांना श्री पवार कार बोलणार याबाबत उत्सुकता होती
सायंकाळी आम्ही सारे सभेला उपस्तित होतो
साधारण ७००-८०० उद्योजक असतील सभेला
व्यासपीठावर अध्यक्ष श्री पवार साहेब श्री अरुण गुजराथी श्री रामकृष्ण मोरे असोशिएन चे अध्यक्ष भाजप चे श्री आण्णा जोशी आदी मान्यवर होते
प्रथम असोशिएन चे अध्यक्ष यांनी उद्यजकांच्या अडचणी आदीची ओळख करून दिली
त्या नंतर इतर मान्यवरांची भाषणे सुरु झाले
शेवटी श्री पवार साहेब बोलण्यास उभे राहिले
जेव्हा सर्व मार्ग बंद होतात त्या वेळी अन्याया विरुद्ध रस्त्यावर उतरून संप बंद आदीचा वापर करावा लागतो हे मालक वर्गात समजले ते बरेच झाले
असा नर्म विनोदी टोला पवार साहेबानी मारताच श्रोत्यात खसखस पिकली
नंतर त्यांनी आपल्या अडचणी मी समजावून घेतल्या आहेत एक दोन दिवसात मी व आपले शिष्ट मंडळ दिल्लीस जाणार आहे
आपल्या अडचणी सिंग साहेबाच्या कानावर घालू व काय करता येईल ते बघू
असे बोलून सभेची सांगता झाली
पुढे बंद संपला उद्योजक कामाला लागले
एम आय डी सी त कारखाने धडाडू लागले
पुढे ६-७ दिवसांनी मित्र भेटला व म्हणाला ? बातमी वाचली का?
मी नाही म्हणालो -अरे तो कायदा साहेबानी रद्द करायला लावला
अरे मस्त झाले राव -डोक्याची कटकट मिटली
*
उद्योग व शेती हि विकासाची दोन चाके आहेत हे जाणणारा श्री पवार हा लोकनेता आहे
दोन्ही आघाडीवर जरा जरी अडचणी आल्यातरी पवार साहेब लक्ष ठेऊन असल्याने तक्रारीचा तातडीने निचरा होतो
एखाद्या शेजारी बांधवांच्या सावकार तगादा लावत संसार उद्ध्वस्त करत असेल तर त्याला तातडीने मदत मिळतेच व अप्रिय टाळले जाते
एखादा कामगार वा संप असेल तर त्या मध्य मार्ग काढून तडजोड केलेली पाहण्यात येते
टेल्को बजाज गरवारे अश्या मोठ्या उद्योग समूहाचे तंटे साहेबानी
सोडवल्याचे आपणास माहीत आहे
अबकारी अन्याय कर कायदा रद्द करून जो मोकळा श्वास आम्हा उद्योजकांना घ्यायला मिळाला त्या बद्दल उद्योजकांच्या मनात श्री पवार साहेब यांच्या बद्दल आदराचे स्थान कायम स्वरूपी राहील यात शंका नाही

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उ बोका, तुम्ही दिलेल्या लिंक खालच्या प्रतिक्रिया वाचून प्रचंड हसले. माबोवर सुद्धा अशाच प्रतिक्रिया येणार याची खात्री आहे किंवा मग नेहमीचं राजकीय युद्ध तरी.

अरे हे avi.appa यांनी 'मिसळपाव' ला पिडले आहे. खूप जिलब्या पाडतात हे.

अविनाश कुलकर्णी/अवी अप्पा कुणी का असेना विचित्र प्रतिसादांना न जुमानता अखंड लेखन चालु ठेवलं..
भारीच कि. दुसरं कुणी असतं तर परत काहीच पोस्ट केलं नसतं. Happy

दुसरं कुणी असतं तर परत काहीच पोस्ट केलं नसतं>>>> का बंद करतील ते ? त्यांचा मोठा फॅनक्लब हाये इत... अप्पा प्लिज कॅरी ऑन

हो, अकुप्पा ग्रेट आहेत. काल त्यांनी फक्त एकच कविता टाकली त्यामुळे हिरमुड झाला, आज पाहु येतायेत का ?

अविनाश कुलकर्णी सर ८५ च्या पुढे वय आहे. त्यांना एका जागी फार वेळ बसता येत नाही. आपल्या कविता कथांवरचे प्रतिसाद वाचता येत नाहीत. वेळ घालवण्यासाठी ते लिहीत असतात. लिहीतात म्हणजे ते सांगतात आणि काकू टाईप करतात. आता काकूंना ही दिसत नाही वयोमानानुसार.