मिळता नजरेस नजर

Submitted by avi.appa on 30 August, 2019 - 12:22

मिळता नजरेस नजर
श्वास थांबून गेला
मनात मन मोराचा
पिसारा फुलू लागला
*
कशी चुकवू नजर
जीव गोंधळून गेला
त्या हस~या छबीच
ध्यास काळजाने घेतला
*
पुजले प्रेम दैवताला
कौमार्य नैवेद्य वाहिला
विश्वासू सखा होता तो
जिव्हारी घाव देवुन गेला
*
उतरता धुंदी प्रेमाची
जगाचा व्यवहार कळला
तो पहिला घाव
बरेच शिकवून गेला

प्रेमकाव्य

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उतरता धुंदी प्रेमाची
जगाचा व्यवहार कळला
तो पहिला घाव
बरेच शिकवून गेला>>>> हे आधी शिकवलं तर म्हणतात, "तुम क्या जानो..."

आणि नंतर वेळ निघून जाते.