चिन्मय चित्रे

Submitted by avi.appa on 29 August, 2019 - 18:59

चिन्मय चित्रे हा एक स्वछदि मुक्त जीवन जगणारा तरुण होता
आई जानकी चित्रे सरकारी कार्यालयात ऑफिसर होती व नुकतीच सेवानिवृत्त झाली होती
चिन्मय फेसबुक वॅट्स अप चे मित्रमंडळ या मध्ये रमला होता
पार्ट्या सहली खाणे पिणे मजेत आयुष्य जगत होता
आयुष्य मजेत जगायचं हे त्याचे जीवन विषयक तत्वज्ञान होता
कामिनी साने ची प्रोफाइल त्याने फेसबुकावर पाहिली अन तो बेहोष झाला
तिने अप लोड केलेले फोटो तो तास न तास बघत बसत असे
कामिनी सौंदर्य वती होती
कधी जीन व स्लिव्हलेस टॉप कधी गर्भ रेशमी साडी -तर कधी ड्रेस - असे फोटो ती अप लोड करत असे
तिला एकदा रुबरु भेटावे गप्पा माराव्यात डेट वर जावे असा विचार त्याच्या मनात बळावत होता
पण तिच्या प्रोफाइल ची भिंत कोरी होती तिचेच फोटो होते चिन्मय सोडला तर मित्र यादीत कुणी मित्र दिसत नव्हता
हिला कसे गाठायचे गटवायचे याचा त्याला मार्ग सुचत नव्हता
*
कॉफी हाऊस मध्ये तो कॉफी पित तिचाच विचार करत बसला होता
तिने त्याचे सारे जीवन व्यापले होते
अचानक कामिनी त्याच्या समोर आली बाजूची खुर्ची ओढत ती त्याजवळ कसली
हाय ची ची -म्हणत ती हसली
हसताना तिने चांदणे सांडले
तिला रुबरु पाहता चिन्मय चकित झाला
ते आरस्पानी सौंदर्य पहाता त्याला विश्वास बसेना
हाय मी कामिनी -.मला माहीत आहे माझे फोटो तुला खूप आवडतात
आग तू इतकी सुदर आहेस कि फोटो काहीच नाही चिन्मय म्हणाला
आपण डेट वर जायचे ना आज असे म्हणत ती मधाळ हसली
काय बोलते आहेस माझा तर विश्वास बसत नाही-तो म्हणाला
मग मला घे बाहुपाशात अन कर चुंबनाचा वर्षाव माझ्यावर तिने निमंत्रण दिले
हे ऐकताच चिन्मय तर उडालाच
आपण कुठे जायचे ?त्याला बिलगत कामिनी ने विचारले
माझ्या घरी -आई मावशीकडे गेली आहे ती उद्या सकाळी येईल आपल्याला रान मोकळे आहे
*
बेडरूम मध्ये आल्यावर चिन्मय ने तिच्या गालावरून हात फिरत म्हटले तू खूप सुंदर आहेस
त्यावर कामिनी हसत म्हणाली नुसता बोलत राहाणार आहेस की या सौंदर्याचा आस्वाद घेणार आहेस ?
असे म्हणत तिने वसने उतरवली व तिने आपला अनावृत देह पलंगावर झोकून होला
चिन्मय ने तिला बाहुपाशात घेतले
जिवा शिवाचे मिलन झाले
देहात देह मनात मन मिसळले एकरूप झाले
सायुज्य भाव अवतरला
*
चन्द्र राहू च्या कक्षेतून बाहेर आला आहे तो काळ ५-६ दिवसाचा असतो
याला काळात ठराविक कालावधी साठी आम्हाला मर्त्य लोकात येण्याची परवानगी असते
तुमचे जीवन आम्ही पाहात असतो
आम्हास आपला साथीदार निवडता येतो जसे मी तुला निवडले
त्याच्या समवेत काही काल आनंदाने व्यथित केल्यावर त्या प्रेम आठवणी आमच्या जीवनाचा भाग बनतात
मग जाण्याची वेळ येते व आम्ही ब्रह्माण्ड लोकात आठवणी घेऊन निघून जातो
आता पुढचा हा काळ ५४० वर्षांनंतर येणार आहे -कामिनी म्हणाली
तू काय बोलतेस ते मला समजत नाही राहू चंद्र हे सारे काय आहे ?
ते तू विसरून जा आता माझी जाण्याची वेळ जवळ येत चालली आहे
निरोप घेण्याची वेळ आली आहे
हवे तर तू माझ्या सांगे माझ्या जगात येऊ शकतो
हो मला तुझ्या बरोबर यायचे आहे तुला मी गमावणार नाही चिन्मय म्हणाला
स्वागत आहे तुझे -माझा हात पकड आपण माझ्या जगात जाणार आहोत ब्रह्माण्ड जगात
चिन्मय नेे तिचा हात घट्ट पकडला व डोळे मिटले
खिडकी उघडे होती त्यातून त्यांचे देह प्रचंड वेगाने अवकाशात गेले
-
चिन्मय डोळे फाडून ते दृश्य बघत होता
अवकाशाच्या पोकळीत तो तरंगत होता
गूढ अश्या सोनेरी रंगाच्या ऊर्जेच्या धारा शांतपणे बरसात होत्या वातावरणात विस्मयकारी गूढ शांतता होती त्याचे शरीर एक पीस झाले होते अन तरंगत होते
वातावरातून अनघा नाद येत होते विविध रंगाचे स्पेक्ट्रम अवकाशात चितारले जात होते
एका निरव शांततेची तो अनुभूती घेत होता
त्याने तिच्या कडे पाहिले तिच्या डोळ्यात तृप्ततेचा भाव त्याला जाणवत होता
क्षणार्धात ते त्या वैश्विक ऊर्जेत विलीन झाले
महाकाय ब्रह्माण्डात हि एक मामुली गोष्ट होती
-
जानकी रिक्षातून उतरली पैसे दिले अन फ्ल्यटचा दरवाजा उघडला
तिने सर्वत्र नजर फिरवली
सारे जागच्या जागी होते
तन्मय च्या रूम कडे वळाली खोलीचा दरवाजा उघडा होता ती आत गेली
पलंगावर अस्ताव्यस्त कपडे पसरले होते चादर पडली होती
हा तन्मय ना जरा सुद्धा ह्याच्या हाताला शिस्त म्हणून नाही असे मनाशी पुटपुटत तिने चादरींची घडी घातली कापडे आवरून कपाटात ठेवले
बाहेर त्याची वाट पाहात बसली
दुपारचे तीन वाजून गेले तरी चिन्मय आला नाही
जानकी चिंतेत पडली
दुस-या दिवशी तिने ११वाजे पर्यंत वाट पाहिली
चिन्मय चा पत्ता नव्हता
तिने आप्पा राशिंनकराचे दार वाजवले
जानकी तू ? काही विशेष ?
आप्पा चिन्मय काल पासून घरी आला नाही तिच्या स्वरात काळजी होती
आग येईल बसला असेल मित्रासमवेत चकाट्या पिट त फोन लाव त्याला
अहो त्याचा फोन घरातच आहे तो ह्यांग का काय म्हणतात तसा झाला आहे
काका पोलीस खात्यात स्टेनो होते आता रिटायर्ड वय ७५
ठीक आहे चल आपण पोलीस स्टेशनात जाऊ त्यांना सांगू व मार्ग काढू संग्राम सूर्यवंशी ऑफिसरचे नाव होते
तो काका चे नाव ऐकून होता
बोला का काय सेवा करू ?
हि जानकी हिचा मुलगा चिन्मय मिसिंग आहे तक्रार नोंद करायची आहे
फोटो आणला आहे ?
जानकीने पिशवीतून फोटो काढला व त्यांना दिला
सकपाळ म्याडम त्याने हाक मारली
सकपाळ ताई हजार झाल्या
म्याडम यांची मिसिंग ची कम्प्लेंट आहे -बघा जरा
-
जानकी व काका म्याडम च्या टेबला वर गेले जानकीने सारी हकीगत तिला सांगितली व फोटो दाखवला
काकू काळजी करू नका हा फोटो व तक्रार सा-या ठिकाणी नेट द्वारे पोचेल
तीन चार दिवसात आपणास नेमके काय आहे ते कळेल सपकाळ म्हणाल्या -तुम्ही साधारण एक आठवड्या नंतर मला भेटा व काळजी करू नका
-
एक आठवड्या नंतर जानकी ठाण्यावर गेली
काकू अजून काहीच पत्ता लागत नाही -सपकाळ म्हणाल्या
कैक महिने उलटून गेले पण तेच उत्तर तिला मिळत राहिले तन्मय सापडत नव्हता
सा-या ताण तणावा मुळे जानकीस भ्रम झाला व ती विक्षिप्त पणे वागू लागली
सारे जण तिला बघून हळहळत होते
आज तो परत ठाण्यावर आलेली होती
सपकाळ बाई समोर बसल्या होत्या
जानकी सांगत होती ताई चिन्मय आहे या जगात व तो नक्की परत येणार
कालच मला असे अंधुकसे स्वप्न पडले होते
बर ताई मी आता निघते -तिने पिशवीतून बिरड्याचे पिशवी काढली व म्हणाली
चिन्मयला बिरड्याची उसळ खूप आवडते उसळ असली कि त्याला दुसरे काही लागत नाही
शिवाय मी पेरूची कोशिंबीर पण करणार आहे बर मी आता निघते अजून वाटण घाटण करायचे आहे उसळीसाठाइ शिवाय कोशिंबीर कणीक भिजवायची आहे
तो जेवायला बसला की गरमागरम पोळी अन उसळ द्यायची आहे त्याला
असे म्हणत जानकी उठला
जानकीच्या पाठमो-या आकृती कडे बघत सकपाळ बाई मनात म्हणाल्या कसा सांगू या आईला तिचा चिन्मय आता परत येणार नाही
हे विचार तिच्या मनात आले व तिचे डोळे पाणावले

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगळी स्टाईल आहे.
पण मला तन्मय आणि चिन्मय मध्ये जरा कन्फ्युज झालं.

अहो मराठी भाषेमध्ये उद्गारवाचक, स्वर्पविराम हे आणि अश्या बर्याचप्रकारचे टिंबेही असतात.

कौटुंबिक, प्रेमकथा, अद्भुत, सायफाय, मानसशास्त्रीय, तत्त्वज्ञान आणि (थोSSडा मनाचा मोठेपणा दाखवला तर) पोलीस चातुर्य कथा व पाककला अशा विविध जॉनरा मध्ये फिरणारी कथा. चित्रकलाही लिहिणार होते पण तेवढी मोठी मनं इथे कोणाचीच नाहीत.

अरारा!
रुबरुsssss रोशनी
लेखक, आपण खुप दिवसांनी कथा लिहुन ठेवलेली वही उघडलेली आहे असं वाटतंय.
पण इथे पोस्टण्यापुर्वी लेखन एकदा स्वतः वाचा. खुप टायपो आहेत. ह्याच नाही इतरही दोन कथा वाचल्या त्यात पण.
इथे तर चिन्मय चा तन्मय झालाय.

सकपाळ बाईंना कसे कळले असेल बरे?
मामी... Happy
अविअप्पा... जरा दमानं घ्याकी. Happy
पण आता या कथा व प्रतिसाद वाचायला मजा येऊ लागण्यात आलेली आहे.

भरिलीहालय अविअप्पाकथा मलातराआ धीवटले किहाकाहि चित्रक्लाविष्यि धगासेल मग वांचून पहिलेतर लय मज़्ज़ाआली

(अप्पा मोड़ ऑफ़)
Light 1

भरिलीहालय अविअप्पाकथा मलातराआ धीवटले किहाकाहि चित्रक्लाविष्यि धगासेल मग वांचून पहिलेतर लय मज़्ज़ाआली

(अप्पा मोड़ ऑफ़)
Light 1 >> Lol Lol

चिन्मय-तन्मय 1च आहेत कि वेगवेगळे?? >>अहो इथे जिवा शिवाचे मिलन होऊन सायुज्य भाव निर्माण झालाय,तुम्ही चिन्मय तन्मय मध्ये अडकू नका,
आता याचा पार्ट 2 येईल बघा,तेव्हा अन्वय होईल नाव

कुणीतरी सांगितले की अवि.अप्पा यांचे वय ८५ आहे आणि ते सांगतात व कमी दिसत असुनही त्यांची पत्नी टाईप करते. हे जर खरे असेल तर मी त्यांच्या या जिद्दीला सलामच करेन.

कुणीतरी सांगितले की अवि.अप्पा यांचे वय ८५ आहे आणि ते सांगतात व कमी दिसत असुनही त्यांची पत्नी टाईप करते. हे जर खरे असेल तर मी त्यांच्या या जिद्दीला सलामच करेन
>> क्या बात !!!!

कुणीतरी सांगितले की अवि.अप्पा यांचे वय ८५ आहे आणि ते सांगतात व कमी दिसत असुनही त्यांची पत्नी टाईप करते. हे जर खरे असेल तर मी त्यांच्या या जिद्दीला सलामच करेन.>>> बापरे, खरेच सलाम, अगदी मनापासून. आता ह्या कथा वाचताना एक वेगळाच दृष्टिकोन असेल __/|\__

कुणीतरी सांगितले की अवि.अप्पा यांचे वय ८५ आहे आणि ते सांगतात व कमी दिसत असुनही त्यांची पत्नी टाईप करते. हे जर खरे असेल तर मी त्यांच्या या जिद्दीला सलामच करेन>> क्या बात !!!! >>>>>>>>>>>>> मला तर काकुंसाठी वाईट वाटतंय. Light 1 Happy

च्रप्स Lol

जुन्या लोकांचे हेच तर खास आहे की त्यांची कमिटमेंट खूप वेगळी असायची, हल्ली ज्याचे ओझे वाटते, ते हे लोकं आपुलकीने करतात एकमेकांसाठी. अर्थात काही अपवाद असतीलच म्हणा. पण या वयात जर आज्जी त्यांच्या नवऱ्यासाठी इतके कष्ट घेत असतील तर खरच खूप कौतुकास्पद आहे☺️

कुणीतरी सांगितले की अवि.अप्पा यांचे वय ८५ आहे आणि ते सांगतात व कमी दिसत असुनही त्यांची पत्नी टाईप करते >> avi.appa and his wife both are great!!!