एक आठवण

Submitted by रिना वाढई on 27 August, 2019 - 07:10

नुकत्याच मुलांच्या शाळा , कॉलेजेस चालू झाले होते ,पावसाची रिमझिम चालू झाली होती , बाहेर निसर्गातला हिरवेपणा जाणवत होता . कुठे रस्त्यावर पाणी साचलेले होते ,तर कुठे नदींना पूर आला होता. सगळीकडे थंडगार वातावरण तयार झाले होते . हा ऋतू तसा सगळ्यांच्या आवडीचा असतो , झाडाला नवी पालवे फुटतात त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचा नवीन रंग भरलेला असतो . अशातच पायल ला तिच्या कॉलेज चे दिवस आठवले . त्या आठवणींमध्ये तिचे खास मित्र ,मैत्रिणी आणि ती ......तिची आठवण झालीच . जीवनाच्या आठवणींमध्ये काही गोडपणा तर काही कडू आणि तिखटपणा सुद्धा दडलेला असतोच. तसे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही गोड तर काही कडवट आठवणी भरलेल्या असतात . पायलही याला अपवाद नव्हतीच . पायल आज अशाच आठवणींच्या पुरामध्ये वाहून गेली होती.
पायल जेमतेम ९ वि ला असताना तिचे आजोबा तिच्या घरी गेले होते . घरी सगळ्यांचं एका आगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा सुरु होती ,तो विषय म्हणजे पायल च्या लग्नाचा .
पायल चे आजोबा त्याचे खूप कौतुक करत होते , आपल्या पायल साठी आपण त्याच्या घरी एकदा विचारायला पाहिजे , मुलगा चांगल्या स्वभावाचा आहे , अशे मुलं फार कमी असतात आणि बरेच काही ते बोलत होते . तिचे आई-वडील नक्कीच एवढ्या लहान वयात तीच लग्न करणार नव्हते पण आपल्याकडे ज्या घरात मुलगी जन्माला येते तिच्या लग्नाचे स्वप्न तिचे आई-वडील तेव्हापासूनच बघत असतात . पण त्यांच्या या बोलण्याचा पायल ला थोडा राग आला होता कि ज्या मुलाला आपण कधी पाहिले नाही त्याच्याबद्दल एवढे चांगले कसे बोलू शकतात .
त्या वयात पायल खूप अल्लड स्वभावाची होती . कोणीही तिला काही बोलले कि ते लगेच उत्तर द्यायची. स्पष्ट बोलणे हा तिचा स्वभाव होता , मग समोरचा व्यक्ती कोणीही असो याची तिला काळजी नसायची. मस्ती करणे , मित्र - मैत्रिणींसोबत खेळणे आणि सगळ्यांची टिल्ली उडवणे असा लहानपणी सगळ्यांचा स्वभाव असतोच तसा पायल चा हि होता .
पण पायल च ते टीनएज होत या वयामध्ये कोणाबद्दल आकर्षण वाटणे साहजिकच असते , आणि आता तर घरी त्याची चर्चा झाल्यापासून पायल हळूहळू त्याचा विचार करू लागली होती . तिला त्यावेळी कल्पना देखील नव्हती कि हे त्याचे विचार तिला समोर एक वेगळ्याच दुनियेमध्ये घेऊन जाणार होते . पायल ला त्याच्याबद्दल आकर्षण वाटणे , आणि सतत त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असणे आता हा तिच्या मैत्रिणीचा चर्चेचा विषय बनला होता . पायल च्या सगळ्या ग्रुप मध्ये त्याची चर्चा होऊ लागली होती. पायल च्या मनात आता त्याच्याबद्दल विचार येऊ लागले , खरंच इतका चांगला असेल काय तो , कसा दिसत असेल , बोलायला कसा असेल आणि बरेच असे विचार तिच्या मनात केव्हा घर करून बसले हे तिला देखील कळलं नव्हतं .
तिच्या मनात त्याची एक वेगळी छवी तयार झाली होती , आणि केव्हा ती छवी तीच सर्वस्व होऊन गेली हे कळलं देखील नव्हतं तिला . पायल आता त्याच्या आठवणीमध्ये राहू लागली होती , त्याच्या स्वप्नामध्ये हरवून जात होती . पायल ला कविता करायचा छंद सुद्धा त्याच्यामुळेच लागला होता , तिच्या प्रत्येक कवितेमध्ये त्याची आठवण मांडत होती ,ती तिच्या प्रत्येक कवितेच्या ओव्यांमध्ये जणू प्रत्यक्ष त्याला बघत होती .
पायल ला तिच्या स्वप्नामध्ये वाटायचं जणू तो देखील तिची च वाट बघून राहिला . पायल तिच्या या स्वप्नाच्या नगरीमध्ये खूप खुश होती .
पायल ला आता त्याला पाहण्याची ओढ लागली होती . ती तिच्या आजीकडे गेली , एकच उद्देश होता कि त्याला बघायचं आणि आपल्या मनातल्या भावना त्याला सांगायच्या . पण कुठेतरी एक भीती होती कि आपण त्याला आपल्या भावना सांगितल्यावर तो कसा वागेल आपल्याशी . कदाचित त्याला हे सगळं आवडलं नाही तर ?
आपण एखाद्या गोष्टीला मनापासून मागितलं कि देव तो देतोच असच झालं होत पायलसोबत . तो दिवस उजाडला ज्या दिवशी ती प्रथमच तिच्या मनातल्या त्याला प्रत्यक्षात बघणार होती . वेळ होती ती फक्त संध्याकाळ होण्याची , त्या सायंकाळी ती तिच्या मैत्रिणीसोबत त्याच्या ट्युशन क्लास मध्ये जाणार होती . पायल तिच्या मैत्रिणीसोबत त्याच्या क्लास मध्ये गेली , थंडीचे दिवस असल्यामुळे सगळे बाहेर शेकोटी जवळ बसले होते . काही जण पायलच्या ओळखीचे होते तर काहींना ती पहिल्यांदाच बघत होती . मनात खूप संकोच वाटत होत तिला कि, हे आपल असं कोणाच्याही क्लास मध्ये येणं योग्य असेल काय? काय विचार करेल तो मला बघून , कस बोलायचं आपण त्याचाशी आणि तेवढ्यातच क्लास चालू झालं म्हणून सगळे आत गेले . पायल हि आत गेली आणि शांत बसून सगळीकडे बघू लागली .
तो आला, पायल ला बघून त्यालाही थोडं आश्चर्य वाटलं , पण त्याने तस काही दाखवलं नव्हतं , तो तिला नावाने आधीपासून ओळखत असावा कदाचित पण पायल आज त्याला पहिल्यांदाच जवळून बघत होती ,
तिच्या आजोबाने जे त्याच्याबद्दल सांगितलं होत आणि पायल च्या मनात जी त्याची छवी होती त्यापेक्षा फार वेगळा नव्हताच तो .
ज्यांच्यासोबत ती रोज आपले सुख दुःख आपल्या कवितेच्या ओव्यांमध्ये मांडत होती तो तिला आज दिसला होता . पहिल्याच भेटीत पायल ला वाटायला लागलं होत कि त्याला सुद्धा आपल्या बद्दल काही वाटत असेल , त्याचा मनात देखील आपल्या बद्दल काही भावना तयार झाल्या असतील . खरंच काही होत कि नाही हे आता माहिती नव्हते पण पायलच्या मनातला विश्वास होता तो . त्याला पाहताक्षणी तो आपलाच असल्याची भावना निर्माण झाली होती तिच्या मनात . पण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला आपण अजून लहान आहोत असं तिला वाटलं आणि त्यामुळे ती त्या भावना आपल्याच मनात ठेवून योग्य वेळेची वाट बघू लागली होती .
जवळ जवळ एक वर्ष निघून गेला आणि आता ती कॉलेज ला जाणार होती , आता तिला आपल्या मनातल्या भावना त्याच्यासमोर जाहीर करायच्या होत्या . ज्या स्वप्नामध्ये ती त्याला रोज बघत होती आता तिला अस्तित्वात बघायचं होत . आता तिला त्याच्या होकाराची आस लागली होती. आणि म्हणूनच तिने आजीकडे राहून कॉलेज करायचं ठरवलं होत . पायल च त्याच्याबद्दल आकर्षण आता तिची आवड बनली होती , हो तो तिला आवडू लागला होता , त्याच्यावर ती प्रेम करू लागली होती .
पायल ला वाटत होते कि जेव्हा आपण आजीकडे राहायला जाणार , तेव्हा तो आपल्याला रोज दिसणार , त्याच्याशी आपल्याला बोलता येणार आणि एक दिवस मग आपण त्याला आपल्या मनातलं बोलून दाखवणार ,त्याला सांगणार कि कोणीतरी त्याच्यावर त्याला नकळत प्रेम करू लागलं आहे . आणि तो नक्कीच आपल्या भावनांची कदर करेल .
पण म्हणतात ना प्रत्येकाच्या ख़ुशी ला कधीतरी ग्रहण हे लागतोच . तसेच पायल च्या बाबतीत झाले होते . ती जशी आजीकडे राहायला गेली होती , तिला कळलं होत कि त्याच्या आयुष्यात कोणीतरी आधीच घर केलेलं आहे . ती कोणीतरी व्यक्ती आता तिच्याच कॉलेज मध्ये तिच्याच क्लासमधली मुलगी होती . ह्या मुलीला पायल ने एक वर्षा आधी त्याच्या ट्युशन क्लास मध्ये बघितले होते पण त्यांच्या दोघांत असं काहीतरी असेल याची कल्पना पायल ला आली नव्हती . पायल आणि त्याची आता ओळखी झाली होती , तो ज्या प्रमाणे पायल शी बोलायचं त्यावरून तो तिला प्रामाणिक असल्याचा वाटायचं . पायल ला जेव्हा हे कळलं तेव्हा तिला या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास झाला नव्हता . पायल ला वाटायचं कि जर त्याच्या मनात तिच्याबद्दल काही भावना राहिल्या असत्या तर त्याने आपल्याला नक्कीच सांगितले असते . कदाचित हे फक्त तिच्या मनात असेल त्याला तर यातलं काही माहित देखील नसेल . पायल आता आपल्या मनाची समजूत काढू लागली होती .
पायल तिच्या आजीकडे नुकतीच राहायला गेली होती, त्यावेळी त्यानेसुद्धा दुसऱ्या गावी जाऊन आपले क्लासेस चालू करायचे ठरवलं होत . तो आता त्या गावी राहणार नव्हताच , अजून पायल ने त्याला काही सांगितलंसुद्धा नव्हतं आणि त्याने ते गाव सोडलं होत . आता पायल त्याची परत येण्याची वाट पाहू लागली होती . आधीच आता पायल ला एक दुःख झालं होत कि तो तिथे राहणार नव्हता आणि त्यावर एक अजून फ्री असल्यासारखं तिला त्या मुलीबद्दल माहिती पडलं होत .
पायल ने ठरवलं होत कि आपण त्याला आधी या मुलीबद्दल विचारायचं आणि मगच आपल्या भावना त्याला सांगायच्या .
पायल च्या मनात कुठेतरी त्या मुलीबद्दल थोडी घृणा तयार झाली होती , ती मुलगी तिला दिसली कि आवडायचं नाही , एखाद्याने आपल्या आवडीची गोष्ट आपल्याकडून हिसकावून नेत असल्याची भावना तयार झाली होती . पायल ला आपल्या आवडीच्या गोष्टी शेयर करणं कधीच आवडत नव्हतं . त्यामुळे तीने त्या मुलीपासून दूर राहणेच पसंत केले होते . त्यामध्ये चूक दोघींची हि नव्हती, दोघी हि कधी एकमेकींशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता . कदाचित दोघीना सुद्धा एकमेकींच्या मनातील भावना कळल्या असतील . ती मुलगी सुद्धा पायल शी जास्त बोलत नव्हती . पायल ला ती आवडत नव्हती त्याच एक विशिष्ट कारण होत, पण ती त्या मुलीचा कधी तिरस्कार , राग करत नव्हती .

एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात जागा देत नाही , ते नकोसे वाटतात आपल्याला , पण तेच जर आपल्या आयष्यातून जेव्हा कायमचे निघून जातात तेव्हा आपण कुठेतरी चुकलो असल्याची जाणीव होते . अशीच जाणीव आज पायल ला एवढ्या वर्षाने होत होती . ती परत त्या आठवणीच्या वादळात गेली होती . जेव्हा वेळ होता तेव्हा आपण तिच्याशी दोन शब्द सुद्धा बोललो नाही , काय चूक होती त्या व्यक्तीची एवढीच च ना कि ती सुद्धा त्याला च पसंत करत होती . पण कुणाच्या मनाचा ताबा आपण तर नाही घेऊ शकत , खरंच चुकलं होत आपलं , आणि ते चूक तिच्यासमोर मांडायला आता ती नव्हती च या जगात .
पायल च्या आठवणींमधला तो एक काळा दिवस होता , त्या दिवसाआधीच पायल आणि ती सोबत फोटो काढायला गेले होते . जणू तो दिवस त्यांच्यासाठी पश्चिमेकडून उगवला होता . त्या दिवशी त्या एकमेकींसोबत पहिल्यांदा च बोलल्या होत्या . पण तेव्हा दोघीना काय माहित होत कि हे त्यांचं बोलणं शेवटचं ठरेल . आणि कदाचित म्हणून ती मुलगी त्या दिवशी पायल सोबत बोलली होती .
ती ने पायल ला सांगितलं कि तिच्याजवळ चा फोटो तिने कोणाला तरी दिल आणि म्हणून तिला दुसरे फोटो काढावे लागत होते . आता मात्र पायल ला कळून चुकलं होत कि तिने फोटो कुणाला दिले असतील . पण पायल ने तिला न विचारणं च योग्य समजलं . कारण तिने त्याचा नाव घेतला असता तर पायल ला अजूनच जास्त त्रास झाला असता . त्या दिवशी च त्यांचं बोलणं तिथेच थांबलं . त्यानंतर दोघी सोबतच घरी आल्या .
दुसऱ्या दिवशी पायल रोजच्यासारखी कॉलेज ला गेली पण त्या दिवशी तिला तिच्याशी जास्त बोलायची इच्छा नव्हती , कारण तिने जर आणखी त्याच्याबद्दल काही सांगितले असते तर पायल ला ते सहन होण्या पलीकडचं होत . मात्र तिला काय माहित होत कि तिच्याकडे तो शेवटचं दिवस होता आणि म्हणून च कि काय ती पायल शी बोलू पाहत होती .
पायल कॉलेज मधून येऊन आत्याकडे गेली होती .आज थोडी उशिरा जाणार होती आजीकडे . बॅग ठेवून ती बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेली आणि कसल्या तरी आवाजाने तिला तिच्या पायाखालची जमीन सरक्ल्याचा भास झाला ती धावतच थेट आत्याकडे गेली तिच्या मनातली शंका दूर करायला पण तिला काय माहिती होत कि तो आभास नव्हताच ते तिच्या आत्याचे च शब्द होते ... लोकांचा घोळका जमलेला होता घरासमोर आणि एक एक जण आपले आपले सांगू लागले होते . पण तिच्या कानावरचे शब्द मात्र खरे ठरले होते . तिची आत्या तिला सांगत होती कि , ती मुलगी आताच थोड्या वेळापूर्वी इथून गेली आणि जाताना मला तुझ्याबद्दल विचारली , काकू पायल आली का तुमची मी इथेच आहे म्हटले . ती हसून निघून गेली . घरी गेल्यावर तिला कसली फिट आली असेल काय माहित पण त्यातच ती गेली ... ती गेली हे शब्द जणू कानावर पडूनसुद्धा विश्वास बसत नव्हता . असे कित्येक शब्द पायलच्या कानावर पडत होते पण तिला मात्र आपण च सुन्न झाल्या सारखे वाटू लागले . हातातल्या मुठीतून रेती जशी निसटून जाते तिला तिच्या आणि त्याच्या आयुष्यातून ती गेल्याचा भास होऊ लागला.
ती कशी काय जाऊ शकते , काहीतरी चुकीचं ऐकली असेल तू म्हणून पायल तिच्या आत्याला म्हणत होती . पण ते चुकीचं नव्हतं ती खरेच सगळ्यांना सोडून गेली होती . एका घंट्यात होत्याच नव्हतं झालं होत.
आयुष्य खरंच किती छोट होत तीच आणि त्या आयुष्यामध्ये तिचे सुख किती होते असेल ते तिलाच माहित . पायल ला ती आपल्या जीवनात नको होती मात्र तिने तर हे जीवनच सोडले होते .
ज्या मुलीबद्दल एवढी घृणा होती पायल च्या मनात आता त्या जागी जिव्हाळा निर्माण झाला होता . पायलच्या मनात विचारांचा ढीग तयार झाला होता . का गेली असेल ती सगळ्यांना अशी सोडून ?
काय विचार असेल शेवटच्या क्षणी तिच्या मनात ?आपण जे तिच्याबद्दल विचार करत होतो ते सत्य होत असेल कि फक्त आपल्याच मनातल्या शंका असेल , एकदा तिला विचारायला हवं होत कि तू त्याला पसंत करते का ? तिच्याशी थोडी मैत्री करायला पाहिजे होतो आपण . चुकलं आपलं आता ती या सगळ्या गोष्टी तिच्या मनात ठेवून निघून गेली . आयुष्य खरंच कोणासाठी थांबत नाही , ती सुद्धा किती स्वप्न बघितली होती असेल.
पायल च्या मनातल्या शंका खऱ्या होत्या कि खोट्या हे सांगायला आता ती कधीच परत येणार नव्हती , ते फोटो तिने कोणाला दिले असतील याच उत्तर द्यायच्या आधीच ती निघून गेली होती या जगातून . पायल बद्दलच्या काय भावना तिच्या मनात होत्या असतील त्या भावना ती मनात ठेवून गेली होती कायमची . तिची मैत्री किती खरी आणि किती खोटी होती याच उत्तर ती स्वतासोबतच घेऊन कायमची गेली होती ती पायल च्या आणि त्याच्या आयुष्यामधून ,कधीही परत न येण्यासाठी .
मॅडम १० मिनिट लेफ्ट ओन्ली , पायलच्या कलिगने तिला सांगितलं आणि ती त्या वादळातून बाहेर आली . २ मिनिट शांत डोळे मिटून तिने घड्याळ पाहिले तर खरंच वेळ संपली होती तिची ऑफिस ची .
असे काही दिवस असतात जे आपल्या आठवणीमधून कधी पुसल्या जाऊ शकत नाही . आपल्याला नकोशी गोष्ट जेव्हा खरंच आपल्याला नाही मिळत त्यावेळेस सुख कमी आणि दुःखच जास्त होतो . आयुष्य हे खूप छोटस आहे,परंतु याच छोट्या जीवनामध्ये खूप मोठ्या गोष्टी दडलेल्या आहेत .

आणि तिच्या मनात येऊन गेलं , तिची वेळ लवकर संपली होती पण त्या वेळेत मात्र तिच्यासाठी फक्त तो च होता आणि आपण मात्र ज्याच्यासाठी तिच्याशी अबोला धरला होता ,तो तर कधी आपला नव्हताच .मनाचं खेळ होता तो आपल्या, जो केव्हाच मोडून पडला होता .

स्वप्न कधीचे तुटले होते ,
आठवणींमध्ये विरले होते ,
आसवाना वाट नव्हती ,
तुझी कधीच साथ नव्हती ,
मनात फक्त एक आभास होता ,
तुला जिंकल्याचा भास होता ,
स्वप्न मात्र कधीचे तुटले होते
आठवणींमध्ये विरले होते,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ami ,पायल ने काही केलं असा उल्लेख हि नाही इथे ... ती सोडून जाण्याचा एक योगायोग दाखविला आहे .must read carefully

पायल चे आजोबा त्याचे खूप कौतुक करत होते , आपल्या पायल साठी आपण त्याच्या घरी एकदा विचारायला पाहिजे>>
९ वी च्या नातीसाठी आजोबा "स्थळ" सुचवतील का? आणि मुलीचे आई वडील त्याला राजी होतील का?
मुलगी अभ्यास, १०वी, १२ वी सोडुन 'त्या' चा विचार करत बसेल का? त्याच्या क्लासमध्ये जाईल का?...
अशा अनेक शंका मनात निर्माण झाल्या... थोडक्यात, मलाच कथा समजली नाही असं दिसतं..

माझा बराच गोंधळ झाला वाचताना.
कथा संवादातून खुलली की वाचायला मजा येते. सगळीच कथा निवेदकाने सांगीतल्यावर वाचायचा जरा कंटाळा येतो.