हॉरर
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक कर्णकर्कश्श किंकाळी पूर्ण थिएटरमध्ये घुमली !
लोक दचकले .
माझ्या शेजारचाही दचकला .एक प्रौढ गृहस्थ.
लोकांना त्या हिरॉईनची भयकुंठित अवस्था बघवत नव्हती . हिरॉईन दिसायला एकदमच कडक होती. नवीन. लोकांना अल्पावधीतच ती लय आवडायला लागली होती .
पडद्यावर हॉरर चित्रपट चालू होता . टुकार ! ती हिरॉइन सोडता.
हॉरर कमी आणि कॉमेडीच जास्त होता साला ! पार्श्वसंगीत मात्र लय भारी होतं. ते काढलं तर टॉम अँड जेरी बरं वाटलं असतं.
पण पिक्चर बंडल असला तरी ' हॉरर होता. मला जाम आवडतात असे हॉरर सिनेमे पहायला. मी सहसा चुकवत नाहीच .
पार्श्वसंगीताचा दणका मारा कानावर झाला की शेजारचा दचकायचा .बाकी तो हसत होता.
शेवटी तर तो झोपलाच .
सिनेमा संपला. लोक हळूहळू गेले. तरीही हा झोपलेलाच .मला वाटलं, गेला की काय - हार्ट अटॅकने ! पण सिनेमा बघून हार्ट अटॅक यायला तो तेवढा डेंजर तर पाहिजे ना.
सगळं थिएटर खाली झालं. डोअरकिपरने त्याला उठवलं. उठला एकदाचा. आम्ही बाहेर पडलो. तो चालायला लागला मी त्याच्या मागे. आवारात आता एक कुत्रंही नव्हतं .
तो रात्रीचा शो होता .साडेबाराला सुटलेला .बाहेर गार वारं सुटलेलं. अंधार.
तो चालत पुलाकडे निघाला .पूलही शांत. निर्मनुष्य .खाली नदीचं शांत वाहणारं पाणी.
मी त्याला आवाज दिला तसा तो थांबला .
' नमस्कार ', मी म्हणालो .
‘नमस्कार ‘,तोही म्हणाला .मी त्याच्या शेजारी बसलो होतो ते त्याने ओळखलं होतं.
‘कसा वाटलं सिनेमा ?’ मी विचारलं .
‘बंडल! लयच बंडल ! अहो , हॉरर बघायला मजा येते म्हणून बघतो मी .एक वेगळा प्रकार. हाणामाऱ्या आणि लव्हस्टोरी बघण्यापेक्षा . भुतं-बितं खरी थोडीच असतात!’...
असं म्हणल्यावर -
मी एकदम त्याच्या नजरेसमोर क्षणार्धात गायब झालो . खराच !
तो क्षणभर पाहतच राहिला. मग त्याने मागे -पुढे पाहिलं.
अख्खा पूल रिकामा होता .कोणीच दिसत नव्हतं.
तसा तो झीट येऊन जागेवरच खाली पडला .
‘साला! अशी भुतांची हेटाळणी मी सहन तरी कशी करणार? …
---------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
BIP499@HOTMAIL.COM
बंडल.
बंडल.
मस्त. पण predictable
मस्त. पण predictable
मधुरा यांच्या कथेशी प्रचंड
मधुरा यांच्या कथेशी प्रचंड साधर्म्य जाणवतंय..
ठीक वाटली.
जबरदस्त! अंगावर काटा आला.
जबरदस्त! अंगावर काटा आला.
नाही आवडली...
नाही आवडली...
अज्ञातवासी+१११
अज्ञातवासी+१११
अ=ब=क
अ=ब=क
Predictable होती. पण तुमचं
Predictable होती. पण तुमचं इतर लिखाण आवडलंय.पुलेशु.
रच्याकने 'भयकुंठीत' म्हणजे काय???
भितीने गर्भगळीत अवस्था असेल
भितीने गर्भगळीत अवस्था असेल बहुतेक.
नाही जमली.
नाही जमली.
नाही जमली.
नाही जमली.
तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत.
सगळ्याच प्रतिक्रियांचा
सगळ्याच प्रतिक्रियांचा स्वीकार आहे आणि आभारी आहे .
काही लोकांचे तर विशेष आभार .
या कथेवर मात्र उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत . मला स्वतःला ठरवणं थोडं अवघड वाटतेय . कथाबीजामध्ये नावीन्य नाही ,असं कथा लिहून झाल्यावर मलाही वाटलं . फक्त प्रेझेन्टेशनही चुकलंय का ? जाणकारांनी अधिक सांगावं .
पुन्हा आभार .
छानेय की
छानेय की
पहिल्यांदा वाचली तेन्व्हा छान
पहिल्यांदा वाचली तेन्व्हा छान आहे असं वाटलं .
दूसर्यान्दा वाचली तेन्व्हा वाटलं - सुरुवातीचा थिएटर मधला भाग पाल्हाळ वाटला .
आणि त्यावर शेवटचा पंच कमी ताकदीचा पडला .
मी काही जाणकार नाही , पण एक आपलं मत नोंदवलं .
म्हणून एकदाच वाचायची
म्हणून एकदाच वाचायची
चांगलीये
चांगलीये
कथा ठिकय. मला सुरवातीचा भाग
कथा ठिकय. मला सुरवातीचा भाग चांगला वाटला पण पुढे, शेवट गुंडाळल्यासारखा वाटला.
> Submitted by बिपिनसांगळे on 18 August, 2019 - 22:56 > ऍटिट्यूड आवडला.
कथा ठिकय. मला सुरवातीचा भाग
कथा ठिकय. मला सुरवातीचा भाग चांगला वाटला पण पुढे, शेवट गुंडाळल्यासारखा वाटला.
> Submitted by बिपिनसांगळे on 18 August, 2019 - 22:56
>> हा प्रतिसाद कुठे आहे? कुणाचा आहे. वर तर दिसत नाही.
टेन्शन नका घेऊ हो.
टेन्शन नका घेऊ हो.
हल्ली टीव्ही, वेब सिरीज आणि वाचन यामुळे लोक खूप ट्विस्ट वाल्या आणि खूप हॉरर गोष्टी वाचत असतात.त्यामुळे कितीही भारी लिहिले असेल तरी ती कन्सेप्ट आधी वाचली पाहिलीय असं वाटतं.
लिहीत राहा.कथा छान जमली आहे.
अमानवीय धागा आणि बोकलतांचा
अमानवीय धागा आणि बोकलतांचा समस्त भूतांनी घेतलेला धसका ह्यामुळे तसेही आता हल्लीची माणसे भूतांना आणि भूतांच्या कथांना कोण घाबरेनासे झालंय !
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न
चिखलमाती खा अशी ती कोणती
"चिखलमाती खा " वाली गानु आजीची गोष्ट वाचली तर बाकी हॉरर फुळूक वाटतात.
"चिखलमाती खा " वाली गानु
"चिखलमाती खा " वाली गानु आजीची गोष्ट >> खूप सुरेख गोष्ट आहे
गुप्ते हल्ली लिहीत नाहीत का?
गुप्ते हल्ली लिहीत नाहीत का?
चिखलमाती खा " वाली गानु आजीची
चिखलमाती खा " वाली गानु आजीची गोष्ट >> प्लिज लिंक द्या न कोणीतरी याची
अमानवीय १ धाग्यावर असावी
अमानवीय १ धाग्यावर असावी
http://bhutbanglaa.blogspot
http://bhutbanglaa.blogspot.com/2015/05/blog-post.html?m=1
गानु आजीची गोष्ट वाचताना घरी
गानु आजीची गोष्ट वाचताना घरी कोणीही नको. पुर्ण एकांतात व शक्यतो रात्री वाचावी. घर जर आडरानात एकांटी असेल तर गोष्टीची मजा मस्त येईल.
गानु आज्जी खूप आवडल्या..
गानु आज्जी खूप आवडल्या..
{
{
गानु आजीची गोष्ट वाचताना घरी कोणीही नको. पुर्ण एकांतात व शक्यतो रात्री वाचावी. घर जर आडरानात एकांटी असेल तर गोष्टीची मजा मस्त येईल.
}
+१११११११
Pages