'पैसा' चे दर्शन झाल्याने खरंच पैसा मिळतो?

Submitted by कोहंसोहं१० on 13 August, 2019 - 12:23

लहानपणी पावसाळ्यात अंदाजे ३२ पायांचा कधीकधी केसाळ तर कधी पाठीवर रंगीत ठिपके असलेला सरपटणारा छोटा जीव दिसायचा त्याला आम्ही पैसा म्हणायचे. मी सध्या US la राहतो आणि अश्या प्रकारच्या सरपटणाऱ्या जीवाचे दर्शन कमीच. त्यात पहिल्या मजल्यावर घरामध्ये तर दर्शन दुर्मिळच. तर झाले असे की हा पैसासदृश प्राणी परवा मला बाथरूम मधून बाहेर तुरुतुरु पळताना दिसला. मी त्याला अलगदपणे पानावर उचलून बाहेर टाकला. परंतु अजून एक तसाच आज बाथटब मध्ये निवांत पहुडताना दिसला. असे म्हणतात की का 'पैसा' दिसला की घरात पैसा येतो. एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच झालेले आणि गेल्या ३ दिवसात दोनदा झालेले दर्शन आणि लहानपणी ऐकलेल्या श्रद्धा/अंधश्रद्धा प्रमाणे खरंच 'पैसा' च्या दर्शनाने पैसा मिळतो? कोणाला काही जास्तीची माहिती किंवा अनुभव आहे का?

मी काही त्या 'पैसा'चा फोटो घेतला नाही पण जवळपास असा दिसत होता:
Gypsy Moth.PNGGypsy Moth1.PNG

वरील फोटो इंटरनेट वरून साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या मते पैसा किडा Millipede ला म्हणतात
तुम्ही टाकलेले फोटो हे पतंगाच्या सुरवंटाचे वाटतायेत

भारतात दिसणारा 'पैसा' (किडा ) कॉपर कलरचा असतो आणि खूप पाय असतात पण केसाळ नसतो. चकचकीत स्किन असते. तुम्ही दाखवलेला किडा पैसा नाही.

हा धागा मजेत काढला आहे हे कळलं, पण असं लिहून टाका नाही तर खूप उपदेश मिळतील. Proud

Millipede हे नाव माहित नव्हते. सांगतिल्याबद्दल धन्यवाद. 'पैसा' दिसला की घरात पैसा येतो याबद्दल कोणाला काही कल्पना? Lol Lol

भारतात दिसणारा 'पैसा' (किडा ) कॉपर कलरचा असतो आणि खूप पाय असतात पण केसाळ नसतो. चकचकीत स्किन असते. तुम्ही दाखवलेला किडा पैसा नाही ---> श्या....मला वाटले अमेरिकेतली थंडी सहन करण्यासाठी त्याला थोडे केस आले असतील आणि मातीप्रमाणे थोडा रंगही बदलला असेल. आता हा जर 'पैसा' नसेल तर खरा पैसा (अजूनही न मिळालेला) गेला म्हणायचा Sad Sad

हा धागा मजेत काढला आहे हे कळलं, पण असं लिहून टाका नाही तर खूप उपदेश मिळतील ---> हाहा....मजेतच काढलाय पण उपदेश ऐकायलाही हरकत नाही माझी ...तेवढाच आपला विरंगुळा :D:D

पैसा एकदम गुळगुळीत असतो, व निरूपद्रवी असतो. तुम्ही टाकलेल्या फोटोतल्या किड्याला घुलं असे म्हणतात. केसाळ अळी चा प्रकार आहे. हे अंगावर उभरतं म्हणजे स्पर्श झाला की खूप खाज सुटते.

'पैसा' दिसला की घरात पैसा येतो याबद्दल कोणाला काही कल्पना? Lol Lol>>>>

हो येतो. जरा धीर धरा.
हा पैसा दिसला की त्याचा/तिचा जोडीदार येतो/येते.
मग पैशाचं कुटुंब, कुटुंबांचे कुटुंब.. महिन्या दोन महिन्यात घर भर पैसाच पैसा.

पैसा चकचकीत असतो व आपण हात लावल्यावर तो अंगाचे वेटोळे घालतो आणि आपल्याला गोल चकचकीत ढब्बू रुपया मिळाल्याचा आनंद मिळतो. म्हणजेच पैश्याच्या दर्शनाने नुसता पैसा नाही तर साक्षात रुपया घरात येतो.

तुम्ही सुरवंटाला पैसा समजल्यामुळे तुम्हाला हा आनंद मिळायची शक्यता नाही. पण अचानक घरात सुरवंट का निघाले याचा शोध घ्या. नाही घेतला तरी फारसे बिघडणार नाही, काही दिवसांनी घरात फुलपाखरे फिरतील.

हा पैसा दिसला की त्याचा/तिचा जोडीदार येतो/येते.
मग पैशाचं कुटुंब, कुटुंबांचे कुटुंब.. महिन्या दोन महिन्यात घर भर पैसाच पैसा.>>>>

हाहा... Happy Happy

हो येतो. जरा धीर धरा.
हा पैसा दिसला की त्याचा/तिचा जोडीदार येतो/येते.
मग पैशाचं कुटुंब, कुटुंबांचे कुटुंब.. महिन्या दोन महिन्यात घर भर पैसाच पैसा.

Rofl

"मग पैशाचं कुटुंब, कुटुंबांचे कुटुंब.. महिन्या दोन महिन्यात घर भर पैसाच पैसा" >>> हाहाहा. फक्त त्या 'पैसा' (०------०) ऐवजी हा पैसा ($$$$) यावा हीच इच्छा Lol

तुम्ही युएसए ला राहता या माहितीबद्दल आभार.
( कृपया भारतातल्या भानगडीत पडू नये ही विनंती. ट्रंपची काळजी करावी हा विनम्र सल्ला)

कृपया भारतातल्या भानगडीत पडू नये ही विनंती. ट्रंपची काळजी करावी हा विनम्र सल्ला >>>> कोणत्या भानगडीविषयी बोलत आहात? बादवे, मी भारताचा नागरिक आहे आणि कोणाची काळजी करायची आणि कोणाची नाही हे ठरवण्यास समर्थ आहे. मला आपल्या सल्ल्याची गरज नाही.

"तुम्हीच म्हणालात कि मी युएसए मधे राहतो. मी फक्त विनंती केली">>> कांदामुळा, मी भडकलो नाही. तुमच्या संकुचित विचारसरणीला स्पष्टपणे उत्तर दिले एवढेच.
" नागरिक आणि निवासी/रहिवासी ह्यातला फरक कोणीतरी स्पष्ट केला तर...">> राजसी, देशाचा नागरिक हा त्या देशापुरता निवासी किंवा अनिवासी असू शकतो. तसेच रहिवासी हा नागरिक असेलच असे नाही.
असो. तो धाग्याचा विषय नाही.

'पैसा' दर्शन आता दुर्लभ होत चाललंय पुण्यात..
लहानपणी आजोबांसोबत दररविवारी वेताळ टेकडीवर फिरायला जायचो.तेव्हा श्रावणातल्या पावसात जागोजाग ढिगानी दिसायचे.'पैसा'मुळे पैसा घरात येतो असं आजोबासुद्धा म्हणायचे. खखोदेजा!