होते तशीच आहे

Submitted by इस्रो on 11 August, 2019 - 06:26

तरहीच्या ओळीसाठी बेफिकीरजी ह्यांचे आभार मानून ......

बदलेन मी तुझी ही शंका उगीच आहे
(आहे तशीच होते, होते तशीच आहे)

असते मनात हो पण लटका नकार देते
या वागण्यात गंमत गे वेगळीच आहे

भांडून शेवटी ते म्हणतात एकमेका -
मी हा असाच आहे, मी ही अशीच आहे

वाटे असे जणू की पडतो सडा फुलांचा
ऐसी तिची म्हणे की वाणी खरीच आहे

पाहून हासण्याच्या झाले पुढे न काही
प्रेमात मी नवा अन तीही नवीच आहे

- नाहिद नालबन्द

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा?

एक, दोन, तीन व पाच आवडले

आहे तसाच होतो, होतो तसाच आहे

अशी मूळ ओळ दिली होती, महिला गझलकरांसाठी तुम्ही घेतलीत ती ओळ

तुम्ही पुरुषमुखी गझलही करू शकता इच्छा असल्यास

पुढील गझल लेखनास शुभेच्छा