युगांतर - आरंभ अंताचा! भाग २६

Submitted by मी मधुरा on 10 August, 2019 - 02:46

कंसाने आकाशाकडे बघत हातातला सोमरसाचा प्याला नाचवला.
"बोल.... बोल आता.... तुझा मृत्यू जन्म घेतोय म्हणून....." जोरजोरात हसला , " या स्वतःच्या हाताने मृत्यूलाच मृत्यु देणारा एकमेव आहे हा कंस! सातही पुत्र यमसदनी धाडलेत मी. आणि आता आठव्यासाठी प्रतीक्षा कर."

"महाराज, एक प्रश्न आहे...."

"राजमंत्री.... काय विचारायचं आहे? आणि कोणाला ? याला?" कंसाने आभाळाकडे बोट दाखवत विचारलं.

"नाही महाराज... तुम्हाला."

"मग ठिक आहे. कारण तो प्रश्नांची उत्तरं नसतो देत."
कंसाला नशा चढली होती.

"महाराज, आठव्या पुत्रापासून भिती होती. मग आधीचे पुत्र का....?"

कंसाने त्याच्या कडे पाहिलं. महाराजांना विचारून आपण आपल्याच मृत्यूला आवाहन तर केले नाही ना! ' राजमंत्री घाबरला. कंस हसू लागला.

"तुला इतकं सरळं वाट्ट हे? त्यानी आठवा पुत्र सांगितला. पण त्याने कोणत्या पुत्राला प्रथम मानून मोजलय हे कोणाला माहिती आहे?"

"म्हणजे महाराज?"

"देव फसवणूक करतात राजमंत्री! बळीला दान म्हणून 'तीन पावलं' सांगून बळीच्याच डोक्यावर पाय दिला त्याने वामनाच्या रुपात. तो मला संपूर्ण सत्य काय सांगेल?" कंस हसत राहिला, "उलटी मोजणी करत पहिल्याच वेळी जन्म घेऊन येईल. शब्दांचे खेळ खेळतो तो!"

कंसाने पुन्हा प्याला तोंडाला लावला. तितक्यात दासी आली.

"महाराज, आपली भगिनी गर्भवती आहे." दासीने सांगितले आणि त्याला चढलेली नशा खाडकन उतरली.

नजर उग्र करत म्हणाला, "पहारा कडक कर, राजमंत्री. क्षणभरही नजर हटता कामा नये."

मथुरा नगरी कंसाच्या अत्याचारामुळे त्रासली होती. देवकीचा आठवा पुत्र सर्वांची एकुलती एक आस होती. दिवस सरत राहिले. क्षणाक्षणाची वार्ता कंसापर्यंत पोचत होती.

-------
भाद्रपद मासातली अष्टमी तिथीची अंधारी रात्र! आकाशमंडपात रोहिणी नक्षत्र सजले होते. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. सैनिक गाढ निद्रेत होते. मंत्रावल्या सारखा वसुदेव हातात त्याचे नुकतेच जन्मलेले निलवर्णी बाळ घेऊन बाहेर पडला. निळ्याशार सागरातल्या निळ्या आकाशाच्या प्रतिबिंबाच्या छटेने बनलेले मनमोहक रुप!

बेफाम पावसाने नदीला पूर आला होता. वासुदेव नदीत उतरून चालत राहिला बाळं डोक्यावर घेऊन! प्रवाहाचे पाणी वाढत राहिले. वसुदेवाला पूर्ण प्रवाहात पाण्याने वेढून ठेवलेले होते. श्वास गुदमरत होता. परावश असल्या सारखा तो चालत होता. हातात घट्ट धरून उंचावर धरलेल्या बाळाच्या पायाला नदीच्या वाढत्या पाण्याला स्पर्श झाला...... आणि पूर ओसरला. नदीच्या दुसऱ्या काठावर पोचून वासुदेव नंदच्या घरी रानवाट तुडवत गेला. दरवाजा उघडा होता. शय्येवर नंद, यशोदा झोपेत होते. शेजारी त्या दोघांचे नवजात बाळं झोपले होते!

....... जाग आली तेव्हा वसूदेव कारागृहात होता. हातात बाळं जोरजोरात रडत होते. देवकी जागी झाली. आश्चर्याने ती बालकाकडे पाहात राहिली. सैनिक जागे झाले. कंसाला समाचार गेला तसा तो धावत आला.
त्याने हिसकावून वसुदेवाकडून बाळं घेतले.
देवकीने त्याचे पाय पकडले.

"भ्राताश्री.... कन्या आहे ही."

कंसाने बाळाकडे पाहिले. तो ही आश्चर्यचकित झाला. मग वेड्यासारखा हसू लागला.

"बघ राजमंत्री... म्हणलो होतो ना मी. फसवणूक!"

बाळाला घेऊन जाऊ लागला तसा देवकीने पुन्हा पायावरची पकड घट्ट केली.

"भ्राताश्री.... कृपा करा. तिला जगू द्या..... तिला ठार मारून काय मिळणार आहे तुम्हाला?"

"समाधान! पराभवाची एकही शक्यता शिल्लक न राहिल्याचे समाधान!"
तो देवकीच्या हातांची केविलवाणी पकड झटकून तळकक्षाकडे गेला.
"हे काय झालं नाथ.... हे काय झालं!" देवकी रडत राहिली. वसुदेव तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होता.
'आकाशवाणी असत्य कशी असू शकते...?'

"शांत हो, देवकी.... तुला आठवतयं सातव्या गर्भावेळी काय झालं होतं?"

"काय नाथ?"

"रोहिणी भेट घ्यायला आली होती इथे...."

"हो नाथ.... आठवते आहे. रोहिणीदेवींच्या उदरातही तुमचा गर्भ होता. पुत्रप्राप्तही झाली. त्याचे बलराम नाव ठेवलेत तुम्ही!" दु:खी मनाने तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले, "आणि माझ्याकडून ना तुम्हाला आपत्य सुख मिळाले, आणि ना तुम्हाला त्यांच्या सोबत राहण्याचे सुख मिळाले!"
ती परत रडू लागली.

"देवकी, मला काही वेगळे सांगायचे आहे." दीर्घ श्वास घेऊन सोडत तो म्हणाला, "मला विश्वास वाटतो, की बलराम आपला सातवा पुत्र आहे."

"काय बोलता नाथ?" ती उठून उभी राहिली.

"हो देवकी..... तोच सातवा पुत्र जो कंसाच्या कचाट्यातून वाचला..... नव्हे.... वाचवला गेला."

"नाथ? मला समजले नाही काहीच."

"तुला सातवी गर्भ धारणा झाली तेव्हा पासून तुझ्या उदराभोवती एक दिव्य तेज दिसायचे मला, देवकी."
"काय?"

"हो.... भेटून जाताना ती सदिच्छांचीच नाही तर नकळत का होईना....काही अजूनही अगम्य आदला-बदल करून गेली."

"म्हणजे, नाथ?"

"रोहिणी भेटून जाऊ लागली, तेव्हा ते तेज तिच्या उदरात जाणवले मला."

"नाथ?"

"हो देवकी."

"गर्भ बदली झाला असे म्हणायचे आहे आपणास, नाथ? गर्भ प्रत्यारोपण झाले? पण हे कसं शक्य आहे?"

"ज्याच्या पासून उत्पती होते, त्या विधात्यासाठी काय अशक्य आहे? ....आणि म्हणून मला खात्री आहे की दैवी शक्तीने जसे आपल्या पुत्राला-बलरामाला वाचवले, तसेच आपल्या आठव्या पुत्रालाही नक्की वाचवेल. कारण तुझ्या उदरात तेच तेज ठळकपणे अधिक प्रकाशित रुपाने आपल्या दोघांनाही या गर्भावेळी जाणवले. "
देवकी विचारात पडली.

कंसाने बाळाचा एक पाय धरून उलटे उचलले. बाळाच्या कर्कश्श रडण्याचा आवाज ऐकून कंसाच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले. त्याने उलट्या अवस्थेतच बाळाला वेगाने हवेत उंच धरून गोलाकार फिरवले. सुकलेल्या रक्ताचे डाग लागून पूर्णतः तपकिरी- किरमिजी रंगाच्या भासत असणाऱ्या खडकावर बाळाला आपटणार, इतक्यात त्याच्या मजबूत हातांची पकड सुटली.

.... आणि खाली पडण्याऐवजी हवेत तरंगू लागले. बघता बघता एक तीव्र प्रकाश तळकक्षात पसरला. बाळं दिव्य प्रकाशात गुप्त झाले. त्याजागी योगमायेची आकृती प्रगटली. कंस गारठल्या सारखा बघतचं राहिला.

घुमल्या सारखा आवाज कंसाच्या कानी पडला, "मुढ कंसा, तुझा कर्दनकाळ सुरक्षित आहे. तुझ्या कर्मांची फळे भोगायला सज्ज हो कंसा!"

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जय श्रीकृष्ण!
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम ||

आदीमाया किंवा योगमाया ही अशी शक्ती मानली जाते जिने या सृष्टीच्या निर्मितीचा ध्यास घेतला. शंकराची पत्नी पार्वती हे तिच रुप मानलं जातं आणि विष्णु पत्नी लक्ष्मी सुद्धा!
ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती तिचंच रुप मानलं जातं.

कृष्णाला मारण्याचा प्रयत्न होणार म्हणून त्याला वाचवायला आदिमायेने भूलोकी जन्म घेतला नंद च्या घरात.
वासुदेवाकरवे दोन्ही बाळांची आदला बदली करून घेतली. आणि कृष्ण वाचला. Happy

मनिम्याव, भाद्रपद होता.

शीतल, रोहिणी वासुदेवची पहिली पत्नी. नंद वासुदेवाचा मित्र. रोहिणी आणि वासुदेवाचा पुत्र बलराम. (गर्भधारण देवकीने केला होता, जन्म रोहिणीने दिला. गर्भ प्रत्यारोपण झाले दोघींचे!)

हो चैतन्यजी..... मी ही आधी गडबडले. पण सगळी कडे शोधले. काही ठिकाणी वसूदेव आहे काही ठिकाणी वासूदेव....

महाभिषक-महाभिष
शंतनू- शांतनु
आणि अष्टवसूंची नावे..... संदिग्ध आहे.

जास्तीत जास्त ज्या नावाचा उल्लेख मिळाला ते नाव गृहीत धरले.

वसुदेवमारिषा के पुत्र, कृष्ण के पिता, कुंती के भाई और मथुरा के राजा उग्रसेन के मंत्री थे। वसुदेव यदुवंश से थे इनका विवाह देवकी (कंस की बहन)औऱ आहुक की सात कन्याओं से हुआ था जिनमें देवकी सर्वप्रमुख थी। वसुदेव के नाम पर ही कृष्ण को 'वासुदेव' (अर्थात् 'वसुदेव के पुत्र') कहते हैं। वसुदेव के जन्म के समय देवताओं ने आनक और दुंदुभि बजाई थी जिससे इनका एक नाम 'आनकदुंदुभि' भी पड़ा। वसुदेव ने स्यमंतपंचक क्षेत्र में अश्वमेध यज्ञ किया था। कृष्ण की मृत्यु से उद्विग्न होकर इन्होंने प्रभासक्षेत्र में देहत्याग किया।

@मनिम्याव, भाद्रपद होता.. >>>Ok
उत्तर भारतीय पद्धती नुसार भाद्रपद आणि मराठी पंचांगानुसार श्रावण महिना

कंस की बहन देवकी का विवाह यादव कुल में वासुदेव के साथ निश्चित हो गया था। जब कंस देवकी को विदा करने के लिए रथ के साथ जा रहा था, तो आकाशवाणी की बात सुनकर कंस क्रोध में भरकर देवकी को मारने को तैयार हो गया। उसने सोचा− न देवकी होगी, न उसका कोई पुत्र होगा। वासुदेवजी ने कंस को समझाया कि तुम्हें देवकी से तो कोई भय नहीं है। >>>>> हे पण मिळालं.

काही ठिकाणी वसू आहे काही ठिकाणी वासु. हवतरं आपण वसूदेव लिहू. पण वसूदेव म्हणल्यावर मला अष्टवसू आठवतात. Happy

मनिम्याव, नविन आहे ही माहिती माझ्या करता. Happy

Thanks.

@चैतन्य <<<वसुदेव/ वासुदेव काहीतरी गडबड वाटते. वसुदेवाचा मुलगा वासुदेव असे काही तरी वाचल्याचे आठवते.>>>
वसुदेव हे नाव आहे तर वासुदेव ही उपाधी.

@मधुरा <<<हो चैतन्यजी..... मी ही आधी गडबडले. पण सगळी कडे शोधले. काही ठिकाणी वसूदेव आहे काही ठिकाणी वासूदेव....>>> correct करा. वसुदेव हे श्रीकृष्ण (वासुदेव) चे पिता.

@शितल, नंद हा वासुदेव/वसूदेवाचा मित्र! रोहिणी एकटी असते आणि म्हणून तिची काळजी घ्यायला नंद घरी बोलावतात.

धन्यवाद च्रप्स. महाभारतात रस वाटत असल्याने मिळालेली माहिती लक्षात राहिली.

मराठीत संपूर्ण महाभारत कुठलेही पात्र मध्यस्थी न ठेवता लिहिलेले नाही असे जाणवले, म्हणून हा प्रपंच! Happy

मराठीत संपूर्ण महाभारत कुठलेही पात्र मध्यस्थी न ठेवता लिहिलेले नाही असे जाणवले,
>> काय म्हणायचे आहे हे कळलं नाही. आपण कोणाला मध्यस्ती ठेवून लिहीत आहात?

चैतन्यजी, तेच तर मी तुम्हाला सांगत होते..... यात कोणी एक हिरो नाही आणि कोणी एक व्हिलन नाही. निदान माझ्यासाठी तरी नाही. Happy

पडला उजेड आता माझ्या डोसक्यात.
" मराठीत संपूर्ण महाभारत कुठलेही पात्र मध्यस्थी न ठेवता लिहिलेले नाही असे जाणवले " या वाक्यातला '' माझ्या लक्षात आलाच नाही. Happy

हम्म.... Happy मध्यस्थानी /मध्यवर्ती पात्र (प्रमुख पात्र) म्हणायचं होतं.

धन्यवाद अशोक.
काही वेळातच पुढचा भाग टाकते.
Happy

बलराम हा वसुदेवाची दुसरी पत्नी रोहीणी च्या पोटी झालेला मुलगा होता ना?? देवकीचा सातवा गर्भ जो पोटातच जिरला व रोहिणी च्या पोटी जन्माला आला.. असे होते ना..??
तुम्ही पूर्ण अभ्यास करूनच हे लिहीत असाल.. पण मनात एक शंका होती ती विचारल्याशिवाय राहवेना.. म्हणून..

@मनिम्याव, भाद्रपद होता.. >>>Ok
उत्तर भारतीय पद्धती नुसार भाद्रपद आणि मराठी पंचांगानुसार श्रावण महिना+१११
Madhura Marathi Kalniryan Calender bagha shravan vadya ashtamila krushjanma ahe.

Pages