'मन तेरा जो रोग है sssss ,

Submitted by Sujaata Siddha on 10 August, 2019 - 01:27

'मन तेरा जो रोग है sssss ,
मोहें समझ ना पायें ,
पास है जो सब छोड के ,
दू sss र को पास बुलाए !...जिया लागे ना तुम बीन मोरा ,
…. ,.कॉफी चा मग हातात घेऊन खिडकीत शून्यात बघत बसलेल्या सुप्रियाला गाण्याच्या शब्दांनी एकदम जर्क बसला, 'या रेडिओ वाल्याना कसं बरोब्बर कळत आपल्या मनात काय खळबळ चाललीये ,अगदी शोधुन गाणी लावतात " आधीच हुरहुर दाटून आलेल्या मनाला शब्द आणि सूर सापडले तशी ती आणखीनच उदास झाली ,.. एक सुस्कारा टाकून हातातली कॉफी संपवून , ती रोजच्या कामाला लागली ,सकाळीच असा उदास झालेला तिचा सगळा दिवस मग कोमजलेला गेला , शेवटी संध्याकाळी ऑफिसहून येताना , आता मीराताईकडे जावं म्हणजे मग जरा गप्पा टप्पा होतील आणि मूड change होईल , असा विचार करून तीने फोन लावला ,"हॅलो मीराताई ? आहेस घरी ?"
" हो आहे कि , का गं ? येतीयेस का?”
“हो, येतेय, हे काय ,तुझ्या घराच्या दिशेने गाडी वळवलीसुद्धा ....” आणि खरोखरच मोजून 20 व्या मिनिटाला ती, मीरा च्या फ्लॅट बाहेर उभी होती , "wow ..घरात शिरता शिरताच गरमा गरम कांदापोह्यांचा वास यावा , यासारखं सुख नाही ऑफिस मधून दमून भागून आलेल्या जिवाला " एन्ट्रीलाच आलेल्या सुप्रियाच्या या वाक्यावर मीरा खळखळून हसली ,आणि पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाली , "मला वाटलंच होतं तू हे असलं काहीतरी बडबडतच घरात येणार , तू ,कोणत्या वेळेला काय करशील याचे अचूक अंदाज येतात बरं मला "
"हे species सध्या दुर्मिळ झालेत बरं का" पाणी घेता घेता सुप्रियानं सूतोवाच केलं
"कुठले species गं ? "
"अगं हे काय हेच .." समोर सोफ्यावर बसलेल्या मीरा वरून हात ओवाळत सुप्रिया तिलाच म्हणाली , " अगं हे असे आपल्या आवडीनिवडी ओळखून आपण काहीच न बोलता देखील आपल्या मनासारखे वागणारे , मनकवडे प्राणी , हे आजकाल वाघ सिंहापेक्षा दुर्मिळ झालेत किंबहुना काही दिवसांनी डायनोसोर्स सारखे पुस्तकातून भेटतील ... "
"ओहो म्हणजे एकंदरीत (हे बोलताना मीराने स्वतः:कडे बोट दाखवलं) हि जमात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणायची “
"हो मग काय ? माणसं हरवली आहेत गं मीराताई , फेसबुक आणि व्हॉटस अँप च्या व्हर्चुअल जंगलात दिसेनाशी झालीयेत "
"ए बाळ ! आली का त्या व्हर्चुअल जगावर पुन्हा , अगं ती सगळी आयुधं आहेत ..शस्त्र धारदार असतात हा काय त्यांचा दोष ? वापरणारा जबाबदार असतो त्याला , चांगला काय नि वाईट काय कसा वापर करायचा ते आपण ठरवायचं आंणि त्याच्या किती आहारी जायचं हे ही आपणच ठरवायचं . बोलता बोलता मीरा , एका ट्रे मध्ये 'खोबरं -कोथिंबीर' पेरलेल्या , गरमागरम पोह्यांच्या डिशेस घेऊन आली .
"मस्त मस्त मस्त .. मटार -बटाटा पोहे ! चैन आहे एका जीवाची " सुप्रिया खुश झाली .मीराताई चहा पण केला असशीलच आलं -वेलदोडे कुटून ?”
“हो केलाय बरं .. “ मीरा हसत म्हणाली .
“मग वास कसा नाही आला ? सुप्रियाने नाक उडवत विचारलं
“झाकण ठेवलंय त्याच्यावर , मुरण्यासाठी “ मीरा शांतपणे म्हणाली .
“वाह वा क्या बात है , याच्यावर तुला एक शेर ऐकवते !.. अर्ज किया है ,
“ चाय के नशे का आलंम … “ ऐकतेयस ना ? मध्येच सुप्रिया मीराला म्हणाली ,
ऐकतेय ऐकतेय , “इर्शाद ..” मीरा खोटा नवाबी आव आणत म्हणाली ,
“ हा.. तर ‘ चाय के नशे का आलंम,
तो कुछ यू है गालिब .......
चाय के नशे का आलंम,
तो कुछ यू है गालिब.....
कोई राय भी पूछे, तो अद्रकवाली बोल देते है !!!... हाहाहाहा
“हाहाहाहा ..कसला वाढीव आहे “...
“असू दे “
“बरं मला एक सांग , आज कशी काय गाडी इकडे? “
“आले अशीच गप्पा ठोकायला “ आणि लगेच हळुवार आवाजात म्हणाली “,खरं म्हणजे नाही नुसत्या गप्पा ठोकायला नाही , तुझ्यापाशी मन मोकळं करायला आलेय ,”
“का ग काय झालं ? नरेन शी भांडलीस कि काय ?“
सुप्रियाने मानेनंच नाही म्हटलं ,
“मग ?’ सासूबाई काही बोलल्या का फोनवरून , नेहेमीसारखं कुचकट ?
सुप्रियाने परत मानेने नाही म्हटलं ,
“मग काय झालं ? ऑफिस मध्ये काही झालं का ?”
“ऑफिसच्या गोष्टी मी मनावर नाही घेत मीराताई कधी, actually आज अनीश ची खूप आठवण येतेय सकाळपासून “,,, सुप्रिया खाली बघत म्हणाली.
“हं “
“खरं म्हणजे आता असं व्हायला नकोय , he is my past, आणि मला हे हि कळतं कि असं त्याची आठवण येणं हे चांगलं नाही , नरेन शी प्रतारणा करण्यासारखं आहे , पण मन आहे ना मीराताई ते कुठे आपल्या ताब्यात असतं, सारखी आणि सतत आठवण येत असते .आता नरेन शी लग्न होऊनही पाच -सहा वर्ष झाली . ” बोलता बोलता सुप्रियाच्या डोळ्यातून अश्रू धारा सुरू झाल्या .
मीराने तिला थोडा वेळ रडू दिले ,मग हळूच तिच्या शेजारी बसत तिने तिचे हात आपल्या हातात घेतले ,
“ए वेडाबाई , तुला रडू कशाचं येतंय ?अनीश ला भेटावसं वाटतंय ? “
“नाही “
“मग ?”
“ मला guilt येतंय मीराताई “ सुप्रियाच्या टपोऱ्या डोळ्यातून टप टप अश्रू गळाले .
“Common सु , तुला एक सांगू ? तू अनीश ला miss नाहीच करतेस , त्यामुळे तुला gulit यायचं काही कारण नाही.”
“काहीतरीच काय अगं, खरंच मी अनीश खूप miss करते, आणि लग्नानंतर असं व्हावं याचं मला खूप guilt येतं, “
सुप्रिया डोळे पुसत म्हणाली , पण तिच्या डोळ्यात ‘तुझं चॉकोलेट संपलं नाहीये मी ठेवलंय तुझ्यासाठी बाजूला काढून ‘असं आपण म्हटल्यावर लहान मुलांचे डोळे रडता रडता आशा उत्पन्न झाल्यावर जसे लकाकतात ,तसच कुतूहल दाटून आलं आणि मोठया आशेने ती ‘मीरा कडे बघायला लागली .
तिच्या हातांना हळुवार थोपटत , मीरा म्हणाली , ‘सुप्रिया अनिश सारखा तुला का आठवतो ? कारण तुम्ही खूप आनंदात असायचा एकमेकांबरोबर , हो ना ?
“ हो ,त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण जिवंत वाटायचा मला , रोजचा दिवस नवीन , रोजचा क्षण नवीन , खूप हसवायचा ,तसाच रागवायचा, रुसायचा ,फुरंगटून बसायचा आणि लहान मुलांसारखा लगेच विसरून बोलायलापण यायचा , मीराताई विश्वच नव्हतं ग आम्हाला एकमेकांशिवाय “
“थोडक्यात काय तर तुला फुल अटेन्शन द्यायचा, म्हणजे त्याचा क्रेंद्रबिंदू त्यानं तुलाच करून टाकलं होतं right ?”
“हो , सतत बोलायचो आम्ही एकमेकांशी, सगळं शेअर करायचो , अगं इतका वेडा होता ,दिवसातून ५० वेळा तरी ‘I Love You !..म्हणायचा ,व्हाट्स अँप वर सारखे मेसेज करायचा , ” आणि ना जेवायला बसला कि फोटो टाकायचा ताटाचा म्हणायचा जेवायला बसलोय ,जेवायला,ये नाही तर तू भरव SSSSSS , .., अंघोळीला चालला कि फोटो टाकायचा , म्हणायचा ये अंघोळीला नाहीतर तु …” आणि सुप्रिया एकदम थांबली.
“हं असं होतं तर एकंदरीत” , मीरा खट्याळपणे म्हणाली .
“मीराताई मी यातून कशी बाहेर पडू सांग ? “ सुप्रियाच्या डोळ्यातून परत गंगा-यमुना सुरू झाल्या .
“मला एक सांग नरेन यातली एक तरी गोष्ट करतो ?, सुप्रियाने मानेनेच नाही म्हटलं .
“ .. सकाळी एकदा ऑफिसला गेला कि परत येईपर्यँत काहीही संपर्क नसतो त्याच्याकडून , मीच फोन केला किंवा मेसेज केला तर ‘one word answer असतं , yes or no , कधी कधी तर तेही नसतं “
“बरं ,नरेन कधी तुला appreciate करतो दिसण्यावरून किंवा बाकी तुझ्या एखाद्या कुठल्या गोष्टीवरून ?
“Never गं , सगळं जग मला सुंदर म्हणतं , पण हा नाही कधी म्हणत , उलटं म्हणतो कि सौंदर्य मला काही नवीन नाहीये कॉलेज मध्ये माझ्या मागे कितीतरी सुंदर मुली लागल्या होत्या . “
“मग तू काय म्हणतेस यावर?”
“मी तोंडावर काही बोलत नाही , पण मनात खूप चरफडते आणि म्हणते , म्हणूनच तुला माझी किंमत नाही , एखादी काकूबाईच तुला मिळायला हवी होती, म्हणजे जिरली असती चांगली .”
“हं “
“पण मीराताई माझी काही तक्रार नाहीये त्याच्याबाबतीत ,त्याला मी आहे तसं स्वीकारलंय ,त्याला व्यक्त होणं जमत नाही ग , नाहीतर तसं खूप प्रेम करतो तो माझ्यावर ,माझा प्रश्न हा आहे कि मी अनीशच्या आठवणी मनातून कशा घालवू ?”
“सुप्रिया जेव्हा तू म्हणतेस कि मी नरेन ला आहे तसं स्वीकारलंय तर मग तुला अनीशची आठवण एवढ्या तीव्रतेनं यायचं कारण काय? “
“म्हणजे? मला नाही कळलं ?”
“हे बघ , तुला माहितीये ना ताप हा आजार नाही, ते एक लक्षण आहे ?शरीरात काहीतरी बिनसलं की वॉर्निंग बेल सारखं काम करतो ताप ? “
“ ओह , you mean अनीशच आठवण हे लक्षण आहे ?, माझं मन आजारी पडल्याचं ?”
“Yes off course !.. मला एका सांग माणसं आपल्याला इतक्या इंटेन्सली का आठवतात ?, मी आई -वडील , भाऊ-बहीण, आजी-आजोबा या जवळच्या नात्याना वगळून इतर लोकांबद्दल बोलतेय हा ”
“कारण मीराताई आपण त्यांच्यावर जीव जडवलेला असतो .”
“Not exactly like that , माणसं आपल्याला इतक्या तीव्रतेने तोपर्यँत आठवत रहातात जोपर्यँत आपल्याला त्यांची replacement मिळत नाही . तु तुझ्याहि नकळत नरेन ला अनिश च्या जागी ठेवलंयस , आणि नरेन कडून त्याच अपेक्षा करतीयेस ,जे अनीश करायचा ,आणि नरेन जर अनीश सारखाच असता स्वभावाने , तर तू आत्ता अनीश ला जितकं मिस करतेस तेवढा तुला व आठवला नसता , पण तो ते तसं करणार नाही कारण ते त्याच्या त्याच्या स्वभावातच नाही , अनीश तुला आठवतो कारण त्याचं विश्व तुझ्याभोवती फिरत होतं , कधी हा विचार केलायस कि जर अनीशशी लग्न झालं असतं तर हाच अनीश चा स्वभाव तुला किती खटकला असता ? अल्लड प्रियकर चालतो किंबहुना आवडतो पण अल्लड नवरा चालला असता तुला? “
“ का नसता चालला ? म्हणजे अगदी अनीश सारखं मागे मागे नसतं केलं तरी पण थोडंफार तरी ? कि त्याचीपण अपेक्षा नाही करायची ?” सुप्रियानं अजीजीनं विचारलं
“ करायची ना , पण एक लक्षात ठेव सुप्रिया ‘एव्हरीथिंग कम्स इन अ पॅकेज ‘त्यात तुला हे अर्ध ,ते अर्ध नाही मिळणार ,
“म्हणजे मीरा ताई आमचं life असंच रहाणार ? रूक्ष ? आणि ड्राय ? कोरडं ठणठणीत ?”
“ अगं ते तुला वाटतंय तसं आहे तर तूच का बदलवत नाही ? तू म्हणतेस नरेन ला मी आहे तसं स्वीकारलंय मग त्याच वेळेला तो बदलावा अशी का अपेक्षा करतेस ?, तू कर प्रयत्न “
“काही फरक नाही पडत त्याला तो आहे तसाच वागतो .” सुप्रिया फणकाऱ्याने म्हणाली .
“ एवढं कळतंय तरी तु तीच चूक परत परत करतीयेस बाळ!..हे बघ तुझ्या केसमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ,ज्या तुला accept कराव्या लागतील , आणि हे मी नाही ,psychology म्हणतं .नंबर एक १. काही गोष्टी आपल्याला नाही मिळणार याचा acceptance आणि नंबर दोन एखाद्या माणसाला जर बदलवता येत नसेल तर त्याचा स्वीकार करून त्याला एका specific place वर ठेवायचं .”
“म्हणजे ?”
“म्हणजे नरेन ला अनीश च्या जागेवरून खाली उतरव , त्याला त्याच्या जागेवर बसू देत .नवरा म्हणून त्याच्याकडे बघ आणि प्रेम कर , तुला नव्याने काही गोष्टी काळातील त्याच्यातल्या . तू नव्या package मध्ये जुन्या गोष्टी धुंडाळत बसलीस तर जे नवीन आहे त्यातल्या नवीन गोष्टींची खुमारी तुला कधी समजणारच नाही आणि जेव्हा तू एखादी गोष्ट स्वीकारतेस असं म्हणतेस तर त्यात ‘पण , परंतु ‘ नसतो , कळलं ? ज्या अपेक्षा तुला नेरन कडून आहेत त्याबाबतीत तू पुढाकार घे आणि त्याच्याकडून Reciprocate झालं नाही तर लगेच रडू नको, त्याला वेळ दे थोडा , तो अगदी १००% नाही पण ५०% तर रिटर्न करेल ? , So तुझं माईंड आजारी आहे कारण त्याला व्हिटॅमिन L हवंय , ते तुझ्या पद्धतीने तू मिळव दॅट्स ऑल !.. मग अनीश च्या आठवणी आपोआप फेड होतील , तुला तो आठवणार नाही असं नाही पण आत्ता जसा त्रास होतोय तसा तरी नक्कीच होणार नाही , समझा क्या ?
“ हां “ सुप्रिया डोळे पुसत म्हणाली .
“बाकी एक माणूस फार गोंडस दिसतं हं रडताना .” मीराताई लबाड डोळे करून म्हणाली.
“ए काय ग !” सुप्रिया तिला चापटी मारत म्हणाली आणि दोघी खळखळून हसल्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्य एवढं सोप्प असतं तर कथा कशाला जन्माला आल्या असत्या!

कथा म्हणून चांगली आहे, पण वास्तवात असं होत नाही.

धन्यवाद 'सिद्धि' , Akku320 , सिम्बा , कोमल १२३४५६ , विनिता.झक्कास !..

Akku320 - Replacemant कुठल्याच गोष्टींची होऊ शकत नाही , पण म्हणून आयुष्य थांबवायचं नसतं , तिथेच अडकून पडायचं नसतं , somewhere you have to move on , हे सांगायचा प्रयत्न केला आहे .

विनिता.झक्कास !.. आयुष्य सोप्पच असतं , ते complicated आपण करतो ,
'राह तो बडी सिधी है ,
मोड तो सारे मनके है !!.

Replacemant कुठल्याच गोष्टींची होऊ शकत नाही , >> हो ना !!
पण म्हणून आयुष्य थांबवायचं नसतं , तिथेच अडकून पडायचं नसतं , somewhere you have to move on , हे सांगायचा प्रयत्न केला आहे>> बरोब्बर !! पण ते खूप सोप्प हि नसतं.
पण कथा आवडली Happy

ॲमी , हो ना !..लहानपणी संस्कार वर्ग असतात , तसे मोठेपणी नसतात ना , म्हणून कथा !..ज्यांच्यावर भरपूर संस्कार झाले आहेत त्यांच्यासाठी नाहीयेत त्या , आमच्यासारख्या साध्या लोकांसाठी आहेत ..;-)

anjali_kool :आपण जे जवळ असतात त्यांच्याबद्दल कृतज्ञ आणि आसक्त नसतो , जे नाहीत त्यांच्यासाठी रडत बसतो आणि उभं आयुष्य असं रडत घालवण्यापेक्षा , ते आपल्यासाठी नव्हतं असं समजून पुढे जाणं , कदाचित सोपं असावं .

> हो ना !..लहानपणी संस्कार वर्ग असतात , तसे मोठेपणी नसतात ना , म्हणून कथा !..ज्यांच्यावर भरपूर संस्कार झाले आहेत त्यांच्यासाठी नाहीयेत त्या , आमच्यासारख्या साध्या लोकांसाठी आहेत ..;-) >
हा हा Lol उत्तर आवडले!
बालपणापासून खूप कमी संस्कार झाल्याने, मोठेपणीदेखील संस्कार करायची गरज वेगवेगळ्या वयाच्या, आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर असणाऱ्या भरपूर 'बायकांना' असते! अगदी मान्य.