वास्तु १३

Submitted by जयश्री साळुंके on 6 August, 2019 - 00:48

मुळात रिया बऱ्याच दिवसांपासून अश्या एखाद्या कामाच्या शोधात होती, त्यामुळे तिला ज्या मिनिटाला सईबद्दल कळालं तशी ती यायला तयार झाली. पण इथे आल्यापासुन तिला कोणत्याही प्रकारच अमानवीय जाणवलं नाही. कारण तिच्या समोर अजुन वेद आलेला नव्हता, आणि सईतर कधीची शांत झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावरचं सगळ तेज उडून गेलं होत. आता तिथे एक पोक्तपणा दिसून येत होता. दिवसातला फार थोडा वेळ ती जागी असायची. त्यात तिचं सगळ आवरून झालं कि पुन्हा झोपायची.
ह्या सगळ्यात एक आठवडा उलटून गेलेला. सौम्य सगळ्यांवर लक्ष ठेवून होता. रियाला भेटल्यावर त्याला असं जाणवलं कि तो तिच्या वर विश्वास ठेवू शकतो म्हणुन त्याने तिला पहिल्याच दिवशी त्याला जे काही माहित होत ते सगळ सांगून टाकलं होत. रियाला येऊन देखील दोन दिवस उलटून गेलेले. पण वेद अजुन तिच्या समोर आलेला नव्हता. त्याचं सौम्य आणि रियाच्या प्रत्येक हालचाली कडे बारीक लक्ष होतं, फक्त सौम्यचं त्या दिवशीचं गिरिजाला भेटण हे त्याच्या नजरेतून सुटलं होत, त्यावेळी तो एका अतिशय महत्वाच्या पूजेत होता. ती पूजा होती एका जागेवरून दुसर्या जागेवर पोहचण्यासाठी अगदी काही क्षणाचा अवधी देखील लागायला नको याची, म्हणजेच नव्या भाषेत टेलिपथी साठी, मुळात पूजा नव्हती ती, ती होती एक प्रकारची साधना, ज्याचा प्रयत्न तो गेल्या कित्येक दशकांपासून करत होता. आणि त्या दिवशी सौम्य जंगलातून निघायला आणि अघोऱ्याची साधना सिद्धीस यायची वेळ एकच होती, इकडे सौम्य जंगलातून बाहेर निघाला आणि अघोरी जंगलात पोहचला होता. पण त्यला तिथे सौम्य येऊन गेल्याची कोणतीही खून दिसली नाही, मुळात असं काही घडू शकत याची त्याला कल्पना देखील नव्हती म्हणुन तो निश्चिंत होता. पण त्या दिवशी त्याने त्याच्या बंदिवासात असलेल्या सहा जणींचे चेहरे बघितले असते तर त्याला काही तरी बिनसलं आहे याची जाणीव झाली असती.
तर बाकीचे मित्र सगळे सईला आणि घरच्यांना सांभाळत होते. सौम्य जरी सर्वांवर लक्ष ठेवून असला तरी ह्या मित्र-मंडळीकडे त्याच जरा दुर्लक्ष झालं होत असं म्हणायला हरकत नाही. त्याला कारणही तसं होतं, हि सर्व मित्र मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत होती, अगदी जीवाला जीव देणारी होती. त्यांच्यावर शंका घेण्यासारखं काही नाही असचं सौम्य समजत होता, आणि त्यामुळे दुर्लक्ष करत होता. पण रियाच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही, आणि तिने सौम्यला त्याची चुक सांगितली. सौम्यला सुरुवातीला यावर विश्वासच बसत नव्हता पण सगळ्या घटना नीट आठवल्यावर त्याला रियाचं म्हणण पटायला लागलं. आणि मग त्याने आणि रियाने सर्वांवर नीट लक्ष द्यायला सुरुवात केली, पुन्हा नव्याने. म्हणतात ना, “एक से भले दो” तसचं काही. रिया आणि सौम्य बरचसं नवीन शिकत होते. रियाच्या येण्यामुळे सौम्यला एक तर नक्की कळाल होतं कि त्याच्या शक्ती ह्या अघोऱ्याच्या शक्तींपुढे अपुऱ्या आहेत. आणि रिया एकटी हे काम करू शकत नाही हे तिला स्वतःला माहित होते. त्यामुळे त्यांनी दोघांनी एकमेकांना पूर्णपणे मदत करून काम करायचं ठरवलं. रिया मध्ये शक्तींची कमतरता होती पण आत्मविश्वास आणि ज्ञान प्रचंड होतं तर सौम्यकडे जन्मजात काही दैवी शक्ती होत्या, रियाच्या मदतीने त्याला एक मार्गदर्शक मिळाली होती.
पहाटे ३ वाजेपासून दोघांचा दिवस सुरु व्हायचा, सर्व जण झोपलेत, कुठे कोणी काही संशयित प्रकार करत नाहीत याची खात्री करून दोघ जण साधनेला बसायचे. दोनच दिवसात एकाग्रतेमुळे त्यांच्या शक्ती एकत्र येऊ लागल्या होत्यात. वेळेच बंधन असल्यामुळे त्यांना शक्य तितक्या घाईत जमतील तितक्या नवीन गोष्टी शिकून जुन्या साधनेंचा सराव करायचा होता. पुढच्या पंधरवड्यात त्यांना काही अश्या शक्तींची देखील आवश्यकता होती जिच्या मदतीने ते अघोऱ्याला शह देऊ शकतील.
इकडे वेद देखील एक एक शक्ती ताब्यात घेत होता. त्याला सौम्यच्या जुन्या शक्तींबद्दल संपूर्ण माहिती होती, इतक्या वर्षांच्या मैत्री मुळे त्याला सौम्यच्या स्वभावातले गुण-दुर्गुण, त्याच्या असलेला अभ्यास ह्या सर्व गोष्टी माहित होत्या. त्यामुळे त्यावर उपाय त्याने आधीच योजून ठेवले होते, पण रिया बद्दल त्याच्या कडे काहीच माहिती नव्हती. पण रिया तीस वर्षाची असून देखील आकर्षक दिसत असल्यामुळे वेदच्या वासना चाळवल्या गेल्या होत्या. गिरीजा नंतर त्याची स्त्री देहाची भूक खुप मोठ्या प्रमाणावर वाढली होती, सुरुवातीला त्यासाठी त्याने कित्येक मुलींना फसवले होते, रूप पालटता येते म्हणुन तो नेहमी नवीन रुपात जाऊन नवीन मुलीसोबत त्याच्या वासना शमवत होता. पण गेल्या कित्येक वर्षांपासून सई च्या मागे असल्यामुळे त्याला ते शक्य नव्हते. त्यामुळे आता त्याला रियाला बघून शांत बसवत नव्हतं. त्यात त्याच आणि सईचं खोट प्रेम सुद्धा कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे त्याने हा डाव टाकायचा ठरवला, ज्यात एका तीराने दोन पक्षी मारले जाणार होते. एक म्हणजे त्याला हवा तसा स्त्री देह मिळणार होता आणि दुसरं म्हणजे सौम्यला मिळणारी मदत कामिहोणार होती. म्हणूनच एकदा संध्याकाळी सौम्य आणि रिया मंदिरातून परत आल्यावर जरा आराम करायचा म्हणुन आपापल्या खोलीत परतले. पण तिच्या खोलीत वेद आधीच बसलेला होता. तिला काही लक्षात येण्या आधीच ती जंगलातल्या एका अज्ञात स्थळी पोहचली सुद्धा होती. पुढे काय संकट वाढून ठेवलं आहे याची तिला थोडी जरी कल्पना आली असती तरी ती तयार असती. पण अचानक आलेल्या ह्या प्रसंगाने रिया स्त्रीसुलभ भावनेने खुप घाबरून गेली होती. समोर असलेला वेद नसून त्याच्या रुपात अघोरी आहे हे समजेपर्यंत तिच्या कमरेभोवती त्याच्या पाशवी हातांचा विळखा पडलेला होता. आतापर्यंत जेवढ्या मुली त्याने उपभोगल्या होत्या त्या सगळ्या त्याच्या रूपा-गुणावर भुलून स्वतःहून त्याच्या जाळ्यात फसत होत्या, आणि गिरीजाची तर त्याने मृत्यू नंतर विटंबना केली होती. पण पहिल्यांदा प्रतिकार करणारी मुलगी मिळाल्याने त्याला जास्त चेव चढत होता. रिया जोरात हात पाय झाडत होती. आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करत होती, आणि त्यातून तिच्या एक लक्षात आलं, ती त्या जागेवर होती जिथे गिरीजा आणि बाकी पाच जणी होत्या. तिला एक जाणवलं कि ती तिथे एकटी नाहीय आणि त्या जाणिवेनेच तिच्यात पुन्हा बळ आलं. वेद ने तिला तोपर्यंत जमिनीवर आपटलं होतं. शेजारीच असलेल्या कुंकुवाच्या ताटाकडे तिचं केव्हापासून लक्ष होतं खाली पडताच त्याचा हात सुटताच तिने त्या ताटाकडे झेप घेतली आणि हातात येईल तितका कुंकू त्याच्या चेहऱ्यावर फेकला, डोळ्यात कुंकू गेल्याने काही मिनिटं त्याची वाया गेली आणि तेवढ्या वेळात रिया त्याच्या तावडीतून सुटली होती. तिला प्रत्यक्ष मदत कोणीच करू शकत नव्हतं पण गिरीजा जमेल त्या पद्धतीने तिला रस्ता दाखवत होती. कुठे फुलपाखरू बनून सरळ जायला रस्ता सांगत होती, तर कुठे मांजर म्हणुन रस्ता अडवत होती. रियाला देखील ह्या सगळ्या खुणा लक्षात यायला वेळ लागत नव्हता. आणि अघोरी ह्या मिनिटाला स्वतःच्या खऱ्या रुपात येऊन जंगलात रियाला शोधायला भटकत होता. कारण रिया जर जंगलातून बाहेर पडली तर त्याच्या बद्दल सर्व सगळ्यांना कळेल, त्यामुळे आता रिया च्या शरीराला उपभोगण्यापेक्षा तिचं मरणं त्याच्यासाठी जास्त गरजेच होतं.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
हा भाग कधी आला कळालच नाही