ती आणि तो पाऊस...

Submitted by अजय चव्हाण on 2 August, 2019 - 10:00

त्यावेळी असाच पाऊस होता ना....धुंद आणि भरमसाठ..
प्रत्येक थेंबाथेंबात त्या पाऊसाच्या आठवणी साठत गेल्या...
तुला कदाचित आठवत नसेल आणि कधी तुला आठवावं असं वाटणारही नाही) पण मला अजुनही आठवतंय...तुझ्याबरोबर मस्त तो पाऊस मी झेलला होता...मनात मनातल्या मनाच्या नखशिंखात मी रूजवला होता...तेव्हाही तु माझ्याशी बोलत नव्हतीस पण आजूबाजुला होतीस..तेवढचं थोडं सुख साचलेल होतं...तुला भिजताना पाहताना मनात तेव्हा सुखद गारवा जाणवला होता...आपण तेव्हा मित्रही नव्हतो की, अनोळखीही नव्हतो काही का असेना पण एकत्र येण्याची औपचारिकता मात्र होती...तुझ्या माझ्या काॅमन मित्रांत तेव्हा आपण दोघेच अनकाॅमन होतो....एकत्र असूनही एकत्र नाही...तु बोलायला लागलीस की, मी थांबयचो आणि मी बोलायला लागलो की, तु....महत्वाचा संवाददेखिल दुसर्या कुणाच्यातरी मार्फतच व्हायचा...

भिजून झाल्यानंतर गरम कांदाभजी खाताना तुला ठसका लागला..नकळत माझ्याही मी पाण्याची बाॅटल पुढे केली..तेव्हा तु माझ्याकडे एकटक पाहीलसं आणि दुसर्यानी पुढे केलेली बाॅटल घेतलीस..खुप लागलं मनाला. अगदी माझ्या हातचं पाणीही तुला प्यावसं वाटत नाही.. कधीकाळी ह्याच हातांनी तु लाडाने भरवून घेतलं होतसं..माझं मला हसूच आलं..खरंतरं ह्यावेळी माझे अश्रू ओघाळयाला हवे होते पण नाही ग..जे मला वाटलं ना आणि ती जी भावना होती ना ती अशी अश्रूमार्फत वाहवत जाऊच शकली नसती..खरंतरं जखमा भरल्या जाऊ शकतात पण व्रण राहतातच ना.

कित्येक अशा छोट्या मोठ्या भावनांचे व्रण घेऊन मी जगतोय..
आजही केवळ तुला पाहता यावं म्हणून मी आलेलो..
मित्रांनी फोर्स केलं म्हणून नाही पण तुला आज असं पाहताना मला खरी जाणिव झाली...एकदा वार्याने तुटलेलं फूल पुन्हा कधीही परत झाडावरची ती जागा घेऊ शकत नाही..

आणि आता मला काय वाटतं हे मी सांगू शकत नाही,एकदा प्रयत्न केला पण तु नाकारलसं..वाटलं होतं प्रेम स्विकारू शकली नाहीस तरी मैत्री कायम राहील पण तु दोन्हीही धुडकावलसं...क्षणात विसरलीस..कदाचित माझचं चुकलं..मी रेषा ओलांडली किंवा ती माझ्याकडून ओलांडली गेली...रेषेच्या त्या पलीकडे जग होतं माझं आणि ह्या पलीकडेदेखिल जगच आहे पण त्यात तु नाहीस.
तु नसतानाची जी जाणिव असते ना तिची सवय करून घेतोय हळूहळू..थोडा वेळ लागेल पण होईल सवय..

हे शेवटचं पाहणं तुला..हा ओझरता पाऊस .तुझ्या ओल्या आठवणी आणि माझ्यातला हा असा "मी" इथेच सोडून जातोय...ह्या निर्जन वाटेवर पुन्हा येणं नाही पण ज्या भावना आहेत त्या कदाचित नाही सोडता येणार मला...कधी असाच पाऊस आला आणि नकळत मनाला शब्द फुटले तर कविता लिहीन मी..तुला न पोहचलेली पत्रे लिहिन मी...आयुष्याच्या संध्याकाळी मी ते वाचेल आणि तेव्हा मात्र डोळे मिटताना हा देह, हे मन, ह्या भावना आणि हे प्रेम इथेच सोडून जाईल मी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो डायरीचीच पाने आहेत ताई...तिच्याविषयी लिहलेली ...आता माझ्या आयुष्यात ना ती डायरी आहे ना "ती".....हे शेवटचं अवशेष उरलं होतं...

छान लिहिलंय.

तिच्याविषयी लिहलेली ...आता माझ्या आयुष्यात ना ती डायरी आहे ना "ती".....हे शेवटचं अवशेष उरलं होतं
- be positive Every ending is always a new beginning. .

धन्यवाद डाॅ ऋशी..
धन्यवाद सिद्धी ..

Positivelych घेतोय सगळं पण कधी कधी नकळत असं negative feel होतं....

छान.. प्रत्येकाच्या आयुष्यात एक " ती " असतेच.. मैत्रीण, सखी, जिवलग.. आपले आयुष्य नाहि बनत ती पण आयुष्यभरासाठी आठवण बनून राहते..