भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसिकरण होतय का.?सत्ता मिळवण्यासाठी पक्ष आपली ओळख हरवत तर नाही ना.?

Submitted by ashokkabade67@g... on 31 July, 2019 - 11:11

आजच भाजपमधे निवडणुकीच्या तोंडावर आयात नेत्यांची मेगाभरती करण्यात आली त्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमय झाले काहींनी शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश केला, पण हे नेते सत्तेची कुठलीच अपेक्षा न ठेवता भाजपमध्ये आले का. तर त्याचे उत्तर नाहीच असे द्यावे लागते कारण या नेत्यांना भाजपने नक्की काहीतरी आश्वासन दिल्याशिवाय ते भाजपत आलेले नाहीत. आणि आज भाजपची आणि मोंदींची लोकप्रियता शिगेला पोहचली असतांना भाजप या नेत्यांना आयात करून भाजपचे काँग्रेसीकरण तर करत नाही ना हाएक प्रश्न आहे., कदाचित भाजपला स्वबळावर सत्ता मिळवायची नाही ना, का सेनेला शह देण्यासाठी आणि मुख्य मंत्रीपद आपल्याकडेच ठेवून सेनेशि युती तोडण्यासाठी हा डाव आहे.? का शरद पवारांनी ही खेळी खेळली आहे पण पक्ष बदलला तरी चेहरे तेच राहणार आहेत.आणि भाजपच च काँग्रेसीकरण होणार आहे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

*महाराष्ट्रातील धक्कादायक परिस्थिती...*

*गुजराती नेत्यांचे आजघडीला सर्वाधिक शुभचिंतक आणि समर्थक हे मराठी तरुण आहेत, गुजरातच मूळ असलेले नरेंद्र मोदी, अमित शहा,पियुष गोयल हे जणू आमचा भविष्यकाळच बदलणार आहेत याच अविर्भावात मराठी तरुण समाज माध्यमांवर फुलटाईम ऑनलाईन असतात...*

*परंतु हेच गुजराती नेते महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी तरुणाच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमचा हिरावून घेण्याची योजना सध्या गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आखत आहेत, महाराष्ट्राच्या बाजूची इतर राज्य म्हणजे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश देखील विकसित झाली...*

*परंतु त्यामागे महाराष्ट्राबद्दल घातकी योजना नव्हत्या, जे गुजरातमध्ये सध्या सुरु आहे. मराठी तरुणांचं वाचनच संपल्याने ते संभ्रम निर्माण करणाऱ्या पेड माध्यमांच्या हेडलाईन्समधून फसवले जात आहेत...*

*मात्र हेच मराठी तरुणांना समजावून सांगणारे राज ठाकरे त्यांच्यासाठी टिंगलटवाळीचा विषय आहे, हे धक्कादायक आहे. कारण त्यांच्या समाज माध्यमांच्या विकृतीतून इतका ब्रेनवॉश केला जात आहे की, कुणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, हे त्यांच्याशी संवाद साधल्यावर स्पष्ट होतं...*

*दुर्दैवाने त्यात सुशिक्षित मूर्खांचा अधिक भरणा आहे, हे धक्कादायक आहे, हे मुद्दाम म्हणावं लागेल, देशाची नवी आर्थिक राजधानी उभारणीचं अर्थात फायनान्शियल कॅपिटल सिटीची योजना गुजरातमध्ये आखली गेली आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ पासून त्यावर प्रत्यक्ष जोरदारपणे काम सुरु आहे...*

*स्वतः नरेंद्र मोदी त्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत, सिंगापूर आणि हॉंगकॉंगच्या धर्तीवर अहमदाबाद-गांधीनगरच्या दरम्यान निर्माण करण्यात येत असलेलं हे नवं शहर "गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी" अर्थात ‘गिफ्ट’ या नावाने उभारण्यात येत आहे...*

*या योजनेचा व महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास, मुंबईचं आर्थिक अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठीच आखली जात आहे, याचा प्रत्यय येईल, जागतिक आर्थिक संघटनेने म्हणजे ‘डब्लू.इ.एफ’ने त्याच्या अहवालात म्हटलं आहे की, सिंगापूर, हॉंगकॉंग ही शहर जगातील मोठी आर्थिक केंद्र आहेत...*

*त्यामुळे तिथेच सर्वाधिक गुंतवणुकीला पसंती दिली जाते, त्यामुळे मुंबईच भौगोलिक महत्व लक्षात घेऊन त्यावरच घाव घालून मुंबईच आर्थिक अस्तित्व प्रथम संपुष्टात आणून मुंबईतील महत्वाची केंद्र सरकारची कार्यालयं, मोठं मोठे उद्योग समूह आणि निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदरांचे महत्व कमी करून तिथलं दळणवळण गुजरातमधील अदानी बंदराकडे वर्ग करण्याची योजना अमलात आणली आहे...*

*त्याचीच उदाहरणं द्यायची झाल्यास मुंबई पोर्ट ट्रस्ट ला विकासाच्या नावावर बंद करून तेथले सर्व व्यवहार हे गुजरातमधील विविध बंदराकडे वळविण्यात आले आहेत, त्यामुळे मुंबईची रयाच गेली आहे, दक्षिण मुंबईतील पंचरत्न बिल्डिंगमधील डायमंड मार्केट, भिवंडीचे कपडा मार्केट, यार्न आणि साडी मार्केट गुजराती व्यापाऱ्यांना हाताशी धरून सुरतला घेऊन गेले...*

*बेलापूरचे रासायनिक कारखाने गुजरातमधील भरूच नजिकच्या दहेजमध्ये घेऊन गेले, तर मुंबईतील अनेक आयटी हब्स अहमदाबादमध्ये वळवले आहेत, तर टाइल्सचा उद्योग वापीला पळवला आहे...*

*महाराष्ट्र आणि गुजरातच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास पालघर आणि आसपासचा भूभाग गुजरात सीमेला लागून असल्याने सध्या गुजराती समाज इथले शेकडो एकरचे प्लॉट स्वतःच्या समाजाकडे पैसे फेकून विकत घेत आहे, बुलेट ट्रेन सत्यात उतरल्यास हा पट्टा नावाला महाराष्ट्राचा भूभाग असेल, पण इथली भाषा आणि संस्कृती केवळ गुजराती असेल यात काहीच शंका नाही...*

*याच पट्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि आगरी समाज असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा, जमिनी हडप करणारे गुजराती व्यापारी घेतांना दिसत आहेत, आजही या सीमेवरील परिसराचा फेरफटका मारल्यास इथे नावांच्या पाट्या देखील मोठ्या प्रमाणावर गुजराती भाषेत दिसतात...*

*स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने स्वतःच्या कार्यकाळात ते देशाला स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवत, वास्तविक गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’वर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे, देशातील इतर नियोजित स्मार्ट सिटी या केवळ कागदावर असतील आणि इंटरनेट दिलं म्हणजे शहर स्मार्ट झालं...*

*शहर स्मार्ट झालं, हा बिनडोक विचार तरुणांच्या माथी थोपवला आहे, दरम्यान, राज ठाकरे याच विषयावर महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळेल तिथे समजावत आहे, आणि याची पूर्ण जाणीव गुजरातच्या नेत्यांना असल्याने ते राज ठाकरेंच्या वक्तव्यावर व्यक्त होण्याच्या रणनीतीचा अवलंब करताना दिसतायेत...*

*कारण राज ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर दिली, तर विषय मोठ्याप्रमाणावर प्रकाशझोतात येईल, आणि गुजराती उद्योग नीती कचाट्यात अडकेल, हे त्यांना ठाऊक आहे, त्यामुळेच सध्या उत्तर भारतीयांपेक्षा गुजराती समाज हा राज ठाकरेंचा सर्वाधिक द्वेष करणारा झाल्याचे सहज निदर्शनास येते...*

*त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांनी हा विषय गांभीर्याने आणि अभ्यासपूर्ण समजून घेऊन राज्याच्या आर्थिक विकासाचा हा मुद्दा उचलून धरला पाहिजे...*

तुम्ही एकच कन्टेन्ट असलेले दोन धागे काढलेत. त्यातील एक डीलीट करुन घ्या भाउ. जमल तर हाच डीलीट करुन घ्या.

हा वरचा व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक फॉरवर्ड भयंकर हास्यास्पद आहे.
सध्या राज ठाकरे महाराष्ट्रातील चंद्राबाबु नायडू झालाय.

मेरे प्यारे देस वासियों - त्या दुसऱ्या धाग्यावर ह्याची चर्चा करू कारण लेखकाकडून हा धागा चुकून डबल पोस्ट झालेला दिसतो आहे.

धागाकर्ता धागा टाकुन मस्त फेरफटका मारायला जातात ते २-३ दिवसान्नी उगवतात. तोपर्यन्त शम्भर एक प्रतिसाद जमा झालेले असतात.