एक सचित्र विडंबन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

3425160957_15da288818_b.jpg
(चित्रासाठी आभार श्री सुनील)

( कविवर्य श्री सुरेश भट , आशा ताई आणि पंडीत हॄदय नाथांची क्षमा मागून )

मूळ कविता : केंव्हातरी पहाटे

बघता तुझ्या बुटाला कलेजी खलास झाली
मिटला चुकून डोळा (एकच बर) हळूवार शीळ गेली

सांगू तरी कसे मी, बील खुळगे पालीशचे
अडकून श्वास माझा, दडपून बात गेली

कळले मला न केव्हा, सुटली मिठी बुटाची
कळले मला न केव्हा, फसवून नार गेली

उरले उरात काही, आवाज ठोकळ्यांचे
दिवसा तारकांचे, दर्शवून बाय गेली

कळले मला न तेव्हा, पडल्या कश्या (दंत)पंक्ती
मग चमक ती बुटांची, दाखवून लाथ गेली

(चु भू द्या घ्या)

विषय: 
प्रकार: 

सहीच रे केद्या Rofl

मग चमक ती बुटांची, दाखवून लाथ गेली > Rofl
**********************************************
/@#%^&*#@#@@!!#?\

सही.. Happy
'सचित्र कविता' आल्याचे पुसटसे आठवते. आता 'सचित्र विडंबन' या नव्या पाककृती सुरू करण्याचे क्रेडिट तुला रे भो. Proud

कुठून मिळाला हा रे भन्नाट फोटू?

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

साजिरा, तो फोटो मी कुठून आणला ते शिक्रेट आहे!!

बाकी विडंबन ठीक पण गझलेचे यमकाचे नियम बरेच सैल केलेले आहेत!

धन्यवाद दीप्या, कॄ, साजीरा, विशाल Happy

योग : ती तरुणी उंच आहे खरी Happy

मिल्यादादा, सुनील : मी चांगल लिहायचा प्रयत्न करीन. सुनील म्हणतो तस हे बरचस स्वैर विडंबन झालय Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केद्या काय केलस रे हे Lol
मस्तच !

गुरू !! जबरी !!

Lol Lol Lol

सुन्या , प्रकाश धन्यवाद Happy

असामी Lol
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

फोटो झकास आहे पण कविता ओढून ताणून केल्यासारखी वाटली

खरच फोटो लै भारी...केदार पुन्हा हात फिरव जरा विडंबन पण भारी होईल बघ Happy

मिलिंदा , श्या बरोबर आहे तुमच Happy

अधिक योग्य प्रयत्न करायला हवाय Happy

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

कुठे कुठे मीटर मध्ये बसत नाहिये, पण शेवटच्या दोन कडव्यांचा आशय धम्माल आहे Lol
माझ्यातर्फेही चित्रासाठी सर्व त्रुटी माफ.