गटारी सेलिब्रेशन

Submitted by Dr Raju Kasambe on 24 July, 2019 - 07:47

गटारी सेलिब्रेशन

मित्रांसोबत देशी विदेशी ढोसा
अंगाला घमघमाट सुटतो कसा
डियो मारा मग फसा फसा
तरीही वास जाईना कसा?

मित्राच्या पार्टीत चांगलं ठासा
तिखट चिकन सोबत मसाला दोसा
इनो हवाबाण जेलूसील मग ठूसा
तरीही वास जाईना कसा?

कांदा लसूण खा भसा भसा
मग माव्याचा तोबरा ठूसा
मुखवास मिंट पुदिना चघळा
तरीही वास जाईना कसा?

फालतू सेलिब्रेशनच्या नादात
रिकामा नका करू खिसा
कुटूंबासोबत साजरी करा गटारी
मुलाबाळांना हसवा, तुम्हीही हसा!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults