बाळासाठी ' स्वानंदी' अर्थाचं नाव सुचवा

Submitted by माउ on 23 July, 2019 - 12:43

मायबोलीकरांनो,
मला मुलीसाठी "स्वानंदी- स्वतःचा आनंद शोधणारी" ह्या अर्थाचं नाव हवं आहे. स्वानंदी ठेवता येत नाही कारण तिच्या चुलत बहिणीचं नाव आहे.
या अर्थाची अजून नावे असतील तर सुचवा प्लीज!!
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खुशी

आनंदी
मोदिका
सुहासिनी
मधुरा
स्वीटी
सुभाषिनी
सुकेशा
स्वरूपा
खुशी
मुग्धा

हर्षदा, हर्षिता, प्रमोदा, प्रमोदिनी, प्रमुदिता, आनंदिनी, आनंदिता, सदानंदी, नित्यानंदी सिद्धानंदी, नंदिता , चिदानंदी

ठेवा काहीही नाव. काही फरक पडणार नाही. वीस पंचवीस वर्षापूर्वी आपल्या पोटच्या गोळ्यांची अशीच लाडाने नावे ठेवली असतील ना त्यांच्या आईवडीलानी? दिपाली रुपाली वैशाली सोनाली वगैरे वगैरे. काय झालं त्या मुलींचं? पुरुषप्रधान समाजव्यवस्था आहे. नाव कायपण ठेवा. शेवटी कोणतरी रेडका प्रमोद, मुकुंद, अशोक भेटतो त्यांना. कुठेतरी टीनपाट लांडगापुरात राहणारा. पोरं काढतो. तिच्यावर नजर ठेवतो (तेच त्याचं कर्तृत्व). आणि उरलेलं आयुष्य त्याच्या तालावर नाचत काढतात त्या बिचाऱ्या. कशाचा स्वानंद आणि काय घेऊन बसला तुम्ही? मोकळीक आहे का मुलीना आपला स्वत:चा आनंद मिळवायची ह्या समाजात?

समस्या काय आणि लोक समाधान कशात शोधायला लागलेत.

माफ करा तुम्हाला व्यक्तिगत नाही बोलत. पण हीच शोकांतिका आहे समाजाची. तरीही तुम्हाला वाटत असेल नाव छान ठेवल्यानं मुलगी आनंदी राहते तर तुम्ही आणि तुमच्या समजुती.

आत्मजा नवीन आणि अर्थपूर्ण नाव.>>>>>नाव आहे अर्थपूर्ण पण नंतर त्याचा अपभ्रंश होऊन" आत मजा" असं चिडवले जाउ शकतं. वर दिलेल्या नावांपैकी बरीच नावं छान आहेत. आनंदिता सगळ्यात आवडलं.

स्मिता.

खरेतर स्वानंदीच ठेवा आनी त्या दुसर्‍या मुलीला नाव बदलू दे हवे तर हे काय.

स्वानंदी ठेवता येत नाही कारण तिच्या चुलत बहिणीचं नाव आहे. >>>>> "स्वानंदी" च ठेवा कि मग किती छान आहे हे नाव. आणि चुलत बहिणीचेच आहे ना... ती जर तुमच्या सोबत राहणारी नसेल तर चालतंय कि.

माउ , तुम्हाला मनापासून स्वानंदी हे नाव आवडत असेल तर तेच ठेवा. चुलत बहिणीचे असेल तरी चालेल.
माझ्या बहिणीच्या मुलाचे नाव इशान आहे तसेच माझ्या चुलत बहिणीच्या मुलाचे सुद्धा. आम्हीही खूप विचार केला पण तेच नाव बहिणीला आवडलेले सो तिने ठेवले. Happy

आनंद पर्यायवाचक - क्षेमा, सुखिता, हर्षा , श्रिया , श्रेया , श्रेयसी, सौख्या, सुखदा, कुशला, शमा, अनुराधा, दिष्टी, नंदिता , मुदिता

Pages